Punjab Charanjit Channi : आपकी असुविधा के लिए हमे खेद है’, मोदींचा आदर करण्यासोबत आणखी काय म्हणाले पंजाबचे सीएम?
पंतप्रधान मोदी यांनी पंजाबमधील प्रकाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय. तर भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पंजाब सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांनी पत्रकार परिषद घेत घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्यानं त्यांना पंजाब (Punjab) दौरा रद्द करावा लागला. या प्रकारानंतर राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. खुद्द पंतप्रधान मोदी यांनी या प्रकाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय. तर भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांनी पंजाब सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी (CharanjitSingh Channi) यांनी पत्रकार परिषद घेत घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.
आज फिरोजपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी यांना परतावं लागलं त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. आम्ही आमच्या पंतप्रधानांचा आदर करतो, असं चन्नी यांनी म्हटलंय. तसंच सुरक्षेत काही चूक नव्हती. आम्ही खराब हवामानामुळे मोदींचा दौरा रद्द करण्याची विनंती पीएमओला केली होती. पण त्यांनी मार्ग बदलला. आम्हाला कळवलंही नाही, असं चन्नी म्हणत आहेत.
I express regret that PM Modi had to return during his visit to Ferozepur district today. We respect our PM: Punjab CM Charanjit Singh Channi on security breach during PM’s visit to the state pic.twitter.com/YaQlylGvyw
— ANI (@ANI) January 5, 2022
त्याचबरोबर मला आज भटिंडा येथे पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी जायचं होतं. पण ज्यांना माझ्यासोबत जायचं होतं त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे मी पंतप्रधान यांच्या स्वागतासाठी जाऊ शकलो नाही, असंही चन्नी यावेळी म्हणाले.
We had asked them (PMO) to discontinue the visit due to bad weather conditions & protests. We had no information of his (Prime Minister Narendra Modi) sudden route change. There was no security lapse during the PM visit: Punjab CM Charanjit Singh Channi pic.twitter.com/TYxRlNL5lt
— ANI (@ANI) January 5, 2022
पंजाबमध्ये नेमकं काय घडलं?
पंतप्रधान मोदी हे आज पंजाब दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत काही त्रुटी झाल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींचा ताफा द्या मार्गावरुन जाणार असतो तो मार्ग पूर्ण रिकामा करण्यात येतो. मात्र, पंतप्रधान मोदींच्या मार्गावर काही शेतकरी आंदोलक आंदोलन करत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे मोदींना काही वेळ आपल्या गाडीतच थांबून राहावं लागलं. त्यानंतर मोदींनी आपल्या पंजाब दौरा रद्द करत ते पुन्हा भटिंडा विमानतळावर पोहोचले. तिथे त्यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ‘आपल्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी भटिंडा विमातळावर जिवंत पोहोचू शकलो’, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी संताप व्यक्त केल्याचं समजतं.
Officials at Bhatinda Airport tell ANI that PM Modi on his return to Bhatinda airport told officials there,“Apne CM ko thanks kehna, ki mein Bhatinda airport tak zinda laut paaya.” pic.twitter.com/GLBAhBhgL6
— ANI (@ANI) January 5, 2022
इतर बातम्या :