जम्मू-काश्मीरमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, नरेंद्र मोदी यांचा नेमका दावा काय?

"मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर जम्मू-काश्मीरमध्ये जेवढे पक्ष निवडणूक लढत होते त्यामध्ये मतांच्या आकडेवारीनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे", असा मोठा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

जम्मू-काश्मीरमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, नरेंद्र मोदी यांचा नेमका दावा काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Oct 08, 2024 | 8:58 PM

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं. दिल्लीत भाजपच्या कार्यालयाबाहेर भव्य जल्लोषाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी मतांच्या टक्केवारीनुसार भाजप हाच सर्वात मोठा पक्ष ठरला, असा दावा केला. “नवरात्रीचा सहावा दिवस आहे. देवीच्या प्रार्थनेचा दिवस आहे. देवी वाघावर विराजमान आहे आणि देवीच्या हातात कमळ आहे. देवी आपल्या सर्वांना आशीर्वाद देत आहे. अशा पवित्र दिवशी हरियाणाता सलग तिसऱ्यांदा कमळ फुललं आहे. गीताच्या भूमीवर सत्य, विकास आणि सुशासनची जीत झाली आहे. प्रत्येत जाती आणि वर्णाच्या लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कित्येक दशकांच्या प्रतिक्षेनंतर अखेर शांततेत निवडणूक पार पडली आहे. मतमोजणी झाली, निकाल समोर आले की, भारतीय संविधानाची जीत आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“भारताच्या लोकशाहीची जीत आहे. जम्मू-काश्मीरच्या नागरिकांनी नॅशनल कॉन्फरन्स आणि त्यांच्या आघाडीला जास्त जागा दिल्या आहेत. मी त्यांनाही शुभेच्छा देत आहे. मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर जम्मू-काश्मीरमध्ये जेवढे पक्ष निवडणूक लढत होते त्यामध्ये मतांच्या आकडेवारीनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे”, असा मोठा दावा नरेंद्र मोदी यांनी केला.

“मी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विजय मिळवणाऱ्या सर्व उमेदवारांनादेखील खूप खूप शुभेच्छा देतो. मी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या जनेतलाही शुभेच्छा देतो. मी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांच्या तप आणि तपश्चर्यासाठी नमन करतो. हरियाणाचा हा विजय कार्यकर्त्यांच्या अफाट परिश्रमाचा परिणाम आहे. हा विजय राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि हरियाणाच्या टीमच्या परिश्रमाने मिळाला आहे. अतिशय नम्र आणि विनम्र मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्याचा हा विजय आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

‘जनतेने एक नवा इतिहास रचला’

“हरियाणाच्या जनतेने एक नवा इतिहास रचला आहे. हरियाणाची निर्मिती 1966 मध्ये झाली होती. इतक्या वर्षात अनेक मोठमोठ्या दिग्गजांनी या राज्याचं नेतृत्व केलं, ज्यांना संपूर्ण देश ओळखायचा. हरियाणाच्या त्या दिग्गज नेत्यांचं नाव संपूर्ण देशात चर्चेत असायचं. हरियाणात आतापर्यंत 13 निवडणुका झाल्या. त्यापैकी प्रत्येकी 10 निवडणुकीत हरियाणाच्या जनतेने दर पाच वर्षात सरकार बदललं. पण यावेळी हरियाणाच्या जनतेने जे केलं ते अभूतपूर्व आहे. ते आधी कधीच घडलं नाही”, असा दावा नरेंद्र मोदी यांनी केला.

“पहिल्यांदाच असं झालं आहे, जेव्हा दोन कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या कोणत्या सरकारला हरियाणात पुन्हा संधी मिळाली आहे. भाजपला तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे. इथल्या लोकांनी तिसऱ्यांचा आपलं सरकार बनवलं नाही तर मते आणि जागाही जास्त दिल्या आहेत. हरियाणाच्या नागरिकांनी छप्पर फाड मते दिली आहे. या जनादेशाचा आवाज दूरपर्यंत जाणार”, असादेखील दावा नरेंद्र मोदी यांनी केला.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.