Red Fort : पंतप्रधान मोदी आज लाल किल्ल्यावरुन संबोधित करणार; भाजपसाठी ते महत्वाचंच! कारण…

Narendra Modi Red fort Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या संबोधनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. नरेंद्र मोदी यांचं आजचं (21 एप्रिलचं) संबोधन भाजपसाठीही तितकंच महत्त्वाचं आहे.

Red Fort : पंतप्रधान मोदी आज लाल किल्ल्यावरुन संबोधित करणार; भाजपसाठी ते महत्वाचंच! कारण...
शीख गुरू तेग बहादूर सिंह यांच्या प्रकाश पर्वानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 6:44 AM

नवी दिल्ली : शीख गुरू तेग बहादूर सिंह (Sikh Guru Teg Bahadur Singh) यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त (parkash purab) पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून  देशाला संबोधित करणार आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधन करतील. मोदी यावेळी काय बोलतात, याकजडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी शीख समाजाबरोब आपलं भावनिक नातं जोडण्याचा प्रयत्न करणार आहेत. कर्तारपूर कॉरिडॉर उघडण्याच्या निर्णयापासून ते तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी गुरुपर्वाचाच दिवस निवडला गेला आणि आता गरु तेग बहादूर यांच्या प्रकाश पर्वावर राष्ट्राला संबोधित करण्यासाठीही लाल किल्ल्याचीच (Lal fort)निवड केली गेली आहे.

शीख गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी 21 एप्रिल रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेतच पण त्याच बरोबर यावेळी पंतप्रधान मोदी गुरु तेग बहादूर यांच्या नावाने एक नाणे आणि टपाल तिकीटाचे ही अनावरण करणार आहेत.

लाल किल्ल्यावरुन पहिलाच धार्मिक कार्यक्रम

या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी हे पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून बोलणार आहेत. ज्या लाल किल्ल्यावरुन ते बोलणार आहेत, त्या ठिकाणांपासून अगदी हाकेच्या अंतरावर गुरू तेग बहादूर यांच्या स्मरणार्थ शिशगंज गुरुद्वारा आहे. त्याच ठिकाणी ते शहीद झाले होते.

वयाच्या 14 व्या वर्षी शौर्य गाजवले

गुरू हरगोविंद सिंह जी यांचे पाचवे पुत्र गुरू तेग बहादूर हे शिखांचे 9 वे गुरू. ज्यांनी वयाच्या 14 व्या वर्षी मुघलांच्या हल्ल्याविरुद्धच्या युद्धात आपल्या वडिलांसोबत शौर्य गाजवले होते.

इस्लामचा स्वीकार नाही

मुघल शासक औरंगजेबाच्या सर्व प्रयत्नांना न जुमानता, गुरु तेग बहादूर यांनी इस्लामचा स्वीकार केला नाही आणि मुघल सम्राटासमोर डोके टेकवण्याऐवजी हौतात्म्य पत्करणे पसंत केले होते. एवढा मोठा त्या ठिकाणी वारसा सांगणाऱ्या व्यक्तीबद्दल पंतप्रधान मोदी गुरु तेग बहादूर यांच्या प्रकाश पर्वावर लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. या वेळी ते त्यांचा त्याग आणि राष्ट्रप्रेम याचा उल्लेख ते करणार हे नक्की आहे.

प्रकाश पर्वानिमित्त राष्ट्राला संबोधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी शीख समाजाबरोबर आपले नाते कसे भावनिक आहे हे ते सातत्याने प्रयत्न करत असतात. पंजाबमधील करतारपूर कॉरिडॉर उघडण्याचा निर्णय असो किंवा कृषीविषयक तीन कायदे मागे घेण्यासाठी गुरु परबचा दिवस निवडणे असो आणि आता त्यांनी गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त राष्ट्राला संबोधित करण्यासाठी लाल किल्ल्याची निवड करणे असो, त्यापाठीमागे त्यांचा राजकीय स्वार्थाचा अर्थ नक्कीच शोधला जाणार आहे.

पहिल्या पंचप्यारांपैकी एक गुजरातचेच

पंजाब निवडणुकीच्या एक दिवस आधी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या निवासस्थानीच शीख समुदायाच्या नेत्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी सत्तेत आल्यानंतर शीख समुदायासाठी काय काय केले आहे हे सांगितले होते. त्यावेळी त्यांनी पंजाबबरोबर आपले रक्ताचे नाते असल्याचेही सांगितले होते. गुरु गोविंद सिंग यांच्या पहिल्या पंचप्यारांपैकी एक गुजरातचे होते, याचाही उल्लेख ते सांगितील हे नक्की आहे.

शिखांची श्रद्धा लक्षात आहे

यादरम्यान, करतारपूर कॉरिडॉरबद्दल बोलताना पीएम मोदी म्हणाले होते की, ज्या ठिकाणी गुरु नानक यांनी आपले आयुष्य व्यतीत केले आहे. त्या ठिकाणी न जाणे खूप दुःखदायक आहे. अशा परिस्थितीत शिखांची श्रद्धा लक्षात घेऊन काहीतरी केले पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात कायम होता. कर्तारपूर कॉरिडॉरचे काम त्यांच्या सरकारने अल्पावधीत पूर्ण केले आहे असंही ते वारंवार सांगत असतात.

रिक्त जागांकडे विरोधकांचे लक्ष

शेतकरी आंदोलनाचा परिणाम खरं तर उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत दिसला नाही, पण पंजाबाच्या निकालातून तो दिसून आला. उत्तराखंडमध्ये सीएम पुष्कर सिंह धामी यांच्या पराभवात फक्त शीख मतदारांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने ज्या प्रकारे विरोधकांना धूळ चारली आहे ती यामुळेच. त्यामुळे पंजाबचा शीख समुदाय काँग्रेस-अकाली दल सोडून नवीन नेतृत्वाच्या शोधात असल्याचे नवीन गणित कळाले आहे. या अशा परस्थितीत भाजप आता शीख समाजाच्या मनात एक आढळ स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

पंजाबमधील सुमारे 58 टक्के लोक शीख धर्मावर विश्वास ठेवतात तर हिंदूची 38.49 टक्केवारी आहे, मात्र यामध्ये समाजातील एक मोठा वर्ग शीख धर्माकडे अधिक आकर्षिला गेला आहे.

अकाली दलाचा सर्वाचा मोठा प्रभाव

शीख धर्माच्या राजकारणात अकाली दलाचा सर्वाचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे पंजाबमध्ये इतर कोणत्याही धर्माची राजकीय ताकद कायमच नगण्य राहिली आहे. मात्र, सध्या पंजाबची राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. पंजाब निवडणुकीच्या निकालांवरून हे स्पष्ट झाले आहे की, शीख समुदायातील अकाली दलाची पकड आता कमकुवत झाली आहे, त्यामुळे भाजपला आता तिथे पर्याय पाहिजे आहे. पंजाबमध्ये भाजप आता अकाली दलावर अवलंबून नाही. अकालींसोबतच्या करारामुळे, पंजाबमध्ये स्वतंत्र विकासाबाबत कोणतीही ठोस रणनीती त्यांनी कधीच स्वीकारली नाही. परंतु युती तुटल्यामुळे 2024 नजरेसमोर ठेऊन भाजप आपला विस्तार वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

पंजाबमध्ये संघाच्या हजारो शाखा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमीच असा विश्वास बाळगला आहे की शीख हे हिंदू धर्मापासून वेगळा नाही, तर जैन हे बौद्ध धर्माप्रमाणेच एक वेगळा पंथ आहे. पंजाबमधील शीख समुदायामध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी संघाने राष्ट्रीय शीख संघाची स्थापना केली आहे. पंजाबमध्ये संघाच्या हजारो शाखा सतत कार्यरत आहेत आणि संघाशी संलग्न इतर संघटनाही कार्यरत आहेत. पंजाबची सीमा पाकिस्तानला लागून आहे, त्यामुळे येथे आरएसएसच्या राष्ट्रवादाचा मुद्दा अधिक धारदार झाला आहे.

भाजपला फक्त दोन शीख जागा

दिल्लीतही शीख मतदारांची मोठी ताकद आहे पंजाबपाठोपाठ हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि दिल्लीतही MACD निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये शीख मतांची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. दिल्लीतील लोकसंख्येच्या 12 टक्के असलेला शीख समुदाय डझनभर विधानसभेच्या जागा आणि सुमारे 60 महापालिका जागांवर महत्त्वाची भूमिका बजावत आहे. दिल्लीचे राजौरी गार्डन, हरिनगर, टिळकनगर, जनकपुरी, मोतीनगर, राजेंद्रनगर, ग्रेटर कैलाश, जंगपुरा आणि गांधीनगर हे पंजाबी बाग, चांदनी चौक, कालकाजी असे भाग आहेत, त्या ठिकाणी शीख बहुसंख्येने आहेत. पण विधानसभा निवडणुकीत भाजपला फक्त दोन शीख बहुसंख्य जागा जिंकता आल्या, उर्वरित जागा आम आदमी पक्षाच्या वाट्याला गेल्या आहेत.

शीख मतांसाठी प्रयत्न

आर. पी सिंग आणि तेजिंदर सिंग बग्गा यांच्यानंतर दिल्लीतील शीख समुदायाची सेवा करण्यासाठी मनजिंदर सिंग सिरसा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, पण ज्यांना पंजाब आणि दिल्लीतही भाजपकडून शीख नेता म्हणून बढती दिली आहे. त्या आर. पी सिंग आणि मनजिंदर सिंग यांची प्रतिमा धीरगंभीर नेत्याची आहे, तर बग्गा फायर ब्रँड हा युवा नेता आहे. या माध्यमातून दिल्लीतील भाजप शीख मते आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठीच लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचे भाषण करणे म्हणजे शीख समुदायामध्ये थेट पोहचण्यातीलच हा प्रकार आहे.

संबंधित बातम्या

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांचा काँग्रेससाठी नवा फॉर्म्युला, रोडमॅपमुळे काँग्रेसचे कमबॅक होणार?; वाचा स्पेशल रिपोर्ट

Amol Mitkari on Raj Thackeray: राज ठाकरेंना फुले, शाहू, आंबेडकरांची अ‍ॅलर्जी का? अमोल मिटकरींचा सवाल; खाज ठाकरे म्हणूनही उल्लेख

पोट खाजवत असणारे मंत्री महोदय व्हायरल! व्हिडीओ पाहून पाकिस्तानी अभिनेत्री म्हणते, ‘माणूस बना, माकड नाही!’

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.