’21व्या शतकातील भारताने संकुचित विचार करणं सोडलंय’; नरेंद्र मोदी यांचं रोखठोक प्रतिपादन

"भारतात सामान्य माणसाची बायोग्राफी हाच इतिहास आहे. तेच देशाचं खरं सामर्थ्य आहे. मोठे लोक येतात निघून जातात. देश अजरामर असतो. पराभूत मनाने विजय मिळणं कठिण आहे. त्यामुळे गेल्या 10 वर्षात माइंडसेटमध्ये जो बदल झालाय, जी झेप आम्ही घेतलीय ती अद्भूत आहे", अशी भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

'21व्या शतकातील भारताने संकुचित विचार करणं सोडलंय'; नरेंद्र मोदी यांचं रोखठोक प्रतिपादन
Follow us
| Updated on: Feb 26, 2024 | 10:48 PM

नवी दिल्ली | 26 फेब्रुवारी 2024 : “दशकापर्यंत ज्यांनी सरकार बनवलं त्यांचा भारतीयतेच्या सामर्थ्यावर विश्वास नव्हता. त्यांनी भारतीयांना अंडरइस्टिमेट केलं. त्यांनी त्यांच्या सामर्थ्याला कमी लेखलं. तेव्हा लालकिल्ल्यावरून सांगितलं जायचं भारतीय निराशावादी आहे. पराजय भावनेला स्वीकारणारे आहोत. लालकिल्ल्यावरून भारतीयांना आळशी संबोधलं गेलं. कामचुकार म्हटलं गेलं. जेव्हा देशाचं नेतृत्वच नैराश्याने भरलेलं असेल तर देशात आशेचा संचार कसा होईल? त्यासाठी देशातील लोकांनीही ठरवलं होतं, आता देश असाच चालेल. त्यात भ्रष्टाचार, घोटाळे, पॉलिसी पॅरालिसीस, घराणेशाही या सर्वांनी देशाचं कंबर तोडलं. गेल्या दहा वर्षात आम्ही या भयावह स्थितीतून देशाला बाहेर काढलं आहे. केवळ दहा वर्षात भारत जगाची टॉप फाईव्ह अर्थव्यवस्थेत आला आहे. आज देशात गरजेची धोरणं वेगाने होतात आणि निर्णय त्याच वेगाने घेतले जातात. माइंडसेटच्या बदलाने हे घडवून आणले,. २१ व्या शतकातील भारताने संकुचित विचार करणं सोडलंय”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला टोला लगावला. ‘न्यूज9 ग्लोबल समीट’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर नाव न घेता निशाणा साधला.

“आपल्या इथे जुन्या काळात युद्धात जाण्यापूर्वी जोरात शंख वाजवला जायचा कारण जाणारा जोशात जावा. थँक्यू दास”, असं नरेंद्र मोदी म्हणाले. “टीव्ही9 च्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार आणि उपस्थितांनाही. मी नेहमीच भारताच्या डायव्हर्सिटीची चर्चा करतो. या डायव्हर्सिटीला टीव्ही9च्या न्यूज रुममध्ये दिसून येते. टीव्ही9च्या अनेक भारतीय भाषात तुम्ही भारताची व्हायब्रंट लोकशाही त्याचे प्रतिनिधीही आहात. मी विविध राज्यात, विविध भाषेत टीव्ही9 मध्ये काम करणाऱ्या सर्व पत्रकारांचा, तुमच्या टेक्निकल टीमचं अभिनंदन करतो”, असं मोदी म्हणाले.

‘मन के हारे हार है’

“मित्रांनो, आज टीव्ही9च्या टीमने या समीटसाठी मोठा इंटरेस्टिंग टॉपिक निवडला आहे. बिग लीप तर आम्ही तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा आपण जोशात असू. ऊर्जाने भरलेलो असेल. कोणी हताश, निराश देश असो की व्यकीत बिग लीपच्या बाबत विचार करू शकत नाही. ही थीमच सर्व सांगण्यासाठी पुरेशी आहे की, आजच्या भारताचा आत्मविश्वास किती उंचावर आहे. आकांक्षा काय आहेत. आज जगाला वाटतंय भारत एक मोठी झेप घ्यायला तयार आहे. तर त्याच्या पाठी दहा वर्षाचा पॉवर फुल लॉन्च पॅड आहे. दहा वर्षात असं काय बदललं. की आज आम्ही इथपर्यंत आलोय. हा बदल माइंडसेटचा आहे, हा बदल सेल्फ कॉन्फिडन्स आणि ट्र्स्टचा आहे. हा बदलाव गुड गव्हर्नेन्सचा आहे. एक जुनी म्हण आहे, मन के हारे हार है, मन के जीते जीत है”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“‘टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांचं एक कोट ऐकत होतो. मी त्यात थोडा बदल करतो. त्यांनी सांगितलं इतिहास हा एकप्रकारचा महान व्यक्तींचं आत्मचरित्र असतं. पश्चिमेत तसा विचार असू शकतो. पण भारतात सामान्य माणसाची बायोग्राफी हाच इतिहास आहे. तेच देशाचं खरं सामर्थ्य आहे. मोठे लोक येतात निघून जातात. देश अजरामर असतो. पराभूत मनाने विजय मिळणं कठिण आहे. त्यामुळे गेल्या 10 वर्षात माइंडसेटमध्ये जो बदल झालाय, जी झेप आम्ही घेतलीय ती अद्भूत आहे”, अशी भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.