‘दोषींना सोडणार नाही’, रेल्वे अपघातग्रस्तांना भेटून पंतप्रधान मोदी विव्हळले

ओडिशाच्या बालासोर येथे घडलेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी आज घटनास्थळी जावून पाहणी केली. तसेच जखमींसोबत बातचित केली. यावेळी मोदी स्वत: भावूक झालेले बघायला मिळाले. आपण शब्दांत वेदना व्यक्त करु शकत नाही, असं ते म्हणाले.

'दोषींना सोडणार नाही', रेल्वे अपघातग्रस्तांना भेटून पंतप्रधान मोदी विव्हळले
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 6:40 PM

बालासोर (ओडिशा) : ओडिशाच्या बालासोर येथे भीषण रेल्वे अपघात घडलाय. या अपघातात आतापर्यंत 288 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण देश हादरला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बालासोर येथे जावून अपघात जिथे घडला त्या ठिकाणाची पाहणी केली. त्यानंतर ते बालासोर मेडिकल कॉलेज येथे दाखल असलेल्या जखमींच्या भेटीसाठी गेले. तिथे त्यांनी जखमी प्रवाशांची विचारपूस केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप अस्वस्थ झालेले बघायला मिळाले.

घटनास्थळावरची परस्थिती आणि जखमींच्या नातेवाईकांशी बातचित केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये काहूर माजलेला होता. त्यामुळे ते प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आपण या विषयावर शब्दांमध्ये जास्त बोलू शकत नाही. पण या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

‘आम्ही ज्यांना गमावलंय ते परत येणार नाहीत’

“अनेक राज्यांचे नागरीक या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करत होते. आम्ही काही जणांना गामवलं आहे. ज्या लोकांनी आपलं जीवन गामवलं आहे हे खूप मोठं आणि वेदनादायी, मनाला विचलित करणारं आहे. जे जखमी जाले आहेत त्यांच्या चांगल्या उत्तम स्वास्थासाठी देखील सरकार कोणतीच कसर सोडणार नाही. आम्ही ज्यांना गमावलंय ते परत येणार नाहीत. पण सरकार त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘प्रत्येक प्रकारच्या चौकशीचे आदेश दिलेत’

“सरकारसाठी ही घटना अत्यंत गंभीर आहे. प्रत्येक प्रकारच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जो दोषी असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा होईल. त्याला सोडलं जाणार नाही. मी ओडिशा सरकार, इथलं प्रशासन, अधिकारी ज्यांनी लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला, मी इथल्या नागरिकांचा देखील आभार मानतो, त्यांनी रक्तदानपासून अनेक गोष्टींसाठी मदत केली आहे. या क्षेत्रातील युवकांनी रात्रभर मदत केली आहे. त्यांच्या सर्वच्या सहकार्याने रेस्क्यू ऑपरेशन लवकर पार पडलं”, असं मोदींनी सांगितलं.

‘वेदनेला प्रकट करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत’

“रेल्वे विभागाने रेस्क्यू ऑपरेशनसाठी आपली सर्व शक्ती लावली होती. वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरु आहे. मी घटनास्थळी जावून आलोय. मी रुग्णालयात जावून जखमी नागरिकांना भेटून आलो. या वेदनेला प्रकट करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. पण परमात्मा आपल्या सर्वांना शक्ती देवो की, आपण लवकरात लवकर या शोककाळातून बाहेर पडू”, अशा संवेदना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.