‘आम्ही वोटबँक पॉलिटिक्सचं पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्समध्ये रुपांतर केलंय’; मोदी यांचा काँग्रेसला टोला
"आम्ही तुष्टीकरण केलं नाही. आम्ही देशावासियांच्या संतुष्टीकरणाचा मार्ग निवडला. गेल्या १० वर्षातील आमचा हाच एक मंत्र आहे, हाच आमचा विचार आहे. आम्ही वोट बँक पॉलिटिक्सला पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्समध्ये बदलंलय", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
नवी दिल्ली | 26 फेब्रुवारी 2024 : “पूर्वी ज्या कुटुंबाची संपूर्ण शक्ती अन्न मिळवण्यात जात होती. त्यांचे आज सदस्य सर्व वस्तूंवर पैसे खर्च करत आहेत. पूर्वीचे सरकार देशातील जनतेला अभावात ठेवायचे. अभावत राहिलेल्या लोकांना निवडणुकीत थोडंफार द्यायचे. त्यातून व्होट बँकचं राजकारण सुरू झालं. जे मतदान करायचे त्यांच्यासाठीच सरकार काम करत होते. आम्ही हा माइंडसेट सोडला. आम्ही विकासाचा लाभ सर्वांना समान द्यावा हे ठरवलं. आम्ही तुष्टीकरण केलं नाही. आम्ही देशावासियांच्या संतुष्टीकरणाचा मार्ग निवडला. गेल्या १० वर्षातील आमचा हाच एक मंत्र आहे, हाच आमचा विचार आहे. आम्ही वोट बँक पॉलिटिक्सला पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्समध्ये बदलंलय”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ‘न्यूज9 ग्लोबल समीट‘ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
“आपण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या औद्योगिक क्रांतीत मागे राहिलो. आपल्याला आता चौथ्या औद्योगिक क्रांतीत जगाचं नेतृत्व करायचं आहे. भारतात रोज दोन नवे कॉलेज उघडले आहे, प्रत्येक आठवड्यााला एक विद्यापीठ उघडलं आहे, भारतात रोज ३६नवे स्टार्टप बनले आहेत. भारतात रोज १६ हजार कोटी रुपयांचे यूएआय ट्रान्जेक्शन झालं आहे. भारतात रोज १४ किलोमीटर रेल्वे ट्रॅकचं निर्माण झालं आहे. भारतात रोज ५हजार हून अधिक एलपीजी गॅस कनेक्शन दिलं गेलं आहे, भारतात प्रत्येक सेकंदाला एका नळातून कनेक्शन दिलं गेलं आहे. भारतात रोज ७५ हजार लोकांना गरीबीतून बाहेर काढलं आहे. आपण नेहमीच गरिबी हटावचे नारे ऐकले. दहा वर्षात २५ कोटी लोक दारिद्र्य रेषेतून बाहेर येतील याचा कुणी विचार केला होता. पण हे झालं आहे. आमच्याच सरकारमध्ये झालं आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
‘गेल्या दहा वर्षात गावात कन्झम्प्शन अधिक वाढलं’
“भारतात कन्झम्प्शनबाबतचा रिपोर्ट आला आहे. त्यातून नवा ट्रेंड कळतो. भारतातील गरिबी आता सिंगल डिजीटला आली आहे. या डेटा नुसार कन्झम्प्शन अडीच टक्के वाढलं आहे. गेल्या दहा वर्षात गावात कन्झम्प्शन अधिक वाढलं आहे. म्हणजे गावातील लोकांचं आर्थिक सामर्थ वाढत आहे. हे असंच झालं नाही. २०१४ नंतर आमच्या सरकारने गावाला समोर ठेवून इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं. महिलांचं उत्पन्न वाढण्यासाठी प्रयत्न केला. विकासाच्या या मॉडेलमुळे भारत सशक्त झाला आहे”, असं मोदी म्हणाले.
“अभाव असतो तिथे करप्शन होतं. भेदभाव होतो. जेव्हा सॅच्युरेशन असतं तेव्हा संतुष्टी असते. सद्भाव असतो. आज सरकार घरोघरी जाऊन लाभार्थींना सुविधा देत आहे. देशात पूर्वी सरकारचे अधिकारी गावागावात गेले नाही. सरकारच्या योजनांचा लाभ मिळाला की नाही हे अधिकारी विचारत आहेत. आम्हीही सरकारी योजनांचा लाभ घ्या असं सांगत आहोत. त्यामुळेच सॅच्युरेशनमुळे भेदभाव संपुष्टात येतो. म्हणूनच आम्ही राजनीती नव्हे तर राष्ट्रनीती करणारे लोक आहोत. आमची सरकार नेशन फर्स्टच्या सिद्धांतावर चालत होतो. आधीच्या सरकारला काम न करणं हे सोपं काम बनलं होतं. अशा वर्क कल्चरमुळे देश कधीच पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही देशाच्या हिताचे निर्णय घेतले”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.