BJP Foundation Day 2022: नियत, नीती ते घराणेशाही; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील 5 मुद्दे

BJP Foundation Day 2022: भाजपच्या स्थापना दिनाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. घराणेशाहीच्या मुद्द्यावरून मोदींनी नाव न घेता काँग्रेसवर हल्ला चढवला.

BJP Foundation Day 2022: नियत, नीती ते घराणेशाही; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील 5 मुद्दे
पंतप्रधान मोदींच्या सभा ठिकाणाच्या आवारात दोन संशयित दिसलेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 12:26 PM

नवी दिल्ली: भाजपच्या (bjp) स्थापना दिनाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी काँग्रेसवर (congress) जोरदार हल्ला चढवला. घराणेशाहीच्या मुद्द्यावरून मोदींनी नाव न घेता काँग्रेसवर हल्ला चढवला. तसेच कोरोनाच्या संकटातही भाजप सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडतानाच जागतिक स्तरावर देशाची मान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांची माहितीही मोदींनी दिली. केंद्र सरकारकडे नियतही आहे आणि नीतीही आहे, असं मोदींनी सांगितलं. आपण देशाचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. यातून प्रेरणा घेण्याची मोठी संधी आहे. तसेच जागतिक स्तरावर मोठे बदल होत आहेत. ग्लोबल ऑर्डर बदलत आहे. त्यामुळे भाजपसाठी मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्याशिवाय चार राज्यात पुन्हा एकदा भाजपचं सरकार आलं आहे. याशिवाय पहिल्यांदाच राज्यसभेतील एखाद्या पक्षाची सदस्य संख्या 100 झाली आहे, अशी माहितीही नरेंद्र मोदी यांनी दिली.

निर्णय आणि निश्चय शक्ती भारताकडे

राष्ट्रहिताच्या दृष्टीने आपलं सरकार काम करत आहे. आपल्या सरकारकडे निर्णय शक्ती आणि निश्चय शक्तीही आहे. आपल्या सरकारकडे नीतीही आहे आणि नियतही आहे. त्यामुळेच आपण लक्ष्य गाठू शकत आहोत. तसेच हे लक्ष्य पूर्णही करत आहोत, असं मोदी म्हणाले. काही दिवसांपूर्वीच भारताने 400 बिलियन डॉलर म्हणजे 30 लाख कोटी रुपये उत्पादनाचं लक्ष्य पूर्ण केलं आहे. कोरोना महामारीच्या काळात एवढं मोठं लक्ष्य गाठल्या गेलं. यावरून भारताचं सामर्थ्य किती मोठं आहे हे दिसून येतं.

भाजप कार्यकर्ता स्वप्नांचा प्रतिनिधी

भाजप कार्यकर्ता हा स्वप्नांचा प्रतिनिधी आहे. भाजप कार्यकर्त्यांचं कर्तव्य हे काल आहे. देश बदलत आहे. देश पुढे जात आहे. देश आपल्या हितासाठी ठाम आहे. कश्मीर पासून कन्याकुमारी, कच्छपासून कोहिमापर्यंत भाजप एक भारत, श्रेष्ठ भारतचा संकल्प सातत्याने सशक्त करत आहे. मोदींनी सुरुवातीला आपल्या भाषणात भारत माता की जयच्या घोषणा दिल्या.

जगणं सुसह्य व्हावं म्हणून प्रयत्न

देशातील लोकांचं जगणं सुसह्य व्हावं यासाठी भाजपच्या राज्यातील सरकारांनी प्रयत्न केले आहेत. हेच आपलं प्राधान्य राहिलं आहे. गरीबांना पक्की घरे देण्यापासून ते शौचालयांची निर्मिती करण्यापासून, आयुष्यमान योजनेपासून ते उज्ज्वला योजनेपर्यंत आणि प्रत्येक घराला पाणी देण्यापासून ते गरीबांच्या बँक खात्यात पैसे देण्यापर्यंत अनेक कामे झाली आहेत. या कामांची चर्चा केली तर अनेक तास निघून जातात. आमचं सरकार दिवस रात्र मेहनत करत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

जग संकटात सापडलेलं आहे. पण अशावेळी भारत 80 कोटी गरीब आणि वंचितांना मोफत राशन देत असल्याचं संपूर्ण जग पाहत आहे. गेल्या 100 वर्षातील हे सर्वात मोठं संकट आहे. लोकांना उपाशीपोटी झोपावे लागत आहे. मात्र, केंद्र सरकारने गरीबांसाठी 35 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत.

मतांचं राजकारण

पंतप्रधानांनी यावेळी काही राजकीय पक्षांवर नाव न घेता टीका केली. आपल्या देशातील काही राजकीय पक्षांनी केवळ मतांचं राजकारण केलं. गेल्या काही वर्षांपासून हेच सुरू होतं. आश्वासने द्यायची आणि लोकांना ताटकळत ठेवायचं हे धोरण काही लोकांनी अवलंबलं. त्यामुळे भ्रष्टाचार आणि भेदभाव वाढला. भ्रष्टाचार आणि भेदभाव हे या राजकारणाचे साईड इफेक्ट्स आहेत. त्यामुळे देशाचं नुकसानच झालं आहे. आमच्या सरकारने हा भेदभाव संपुष्टात आणला. लांगूलचालन बंद केलं. आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवण्याचं काम केलं, असं मोदी यांनी सांगितलं.

घराणेशाहीवर हल्लाबोल

मोदींनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा काँग्रेसला घेरलं. देशात दोन प्रकारचं राजकारण सुरू आहे. एक राजकारण केवळ कुटुंबाभोवती सुरू आहे. तर दुसरं देशभक्तीचं राजकारण सुरू आहे. काही राजकीय पक्ष घराणेशाहीवर चालतात. केवळ आपल्या कुटुंबाचाच स्वार्थ पाहतात. आम्ही या घराणेशाहीविरोधात बोलण्यास सुरुवात केली. घराणेशाही हा राजकीय मुद्दा बनवला. घराणेशाही असलेले हे पक्ष देशाचे दुश्मन आहेत. त्यांना संविधानाशी काहीही घेणंदेणं नाही हे एव्हाना जनतेच्या लक्षात आलं आहे, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

BJP Foundation Day 2022: घराणेशाही जोपासणारे पक्ष लोकशाहीचे शत्रू; नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

BJP Foundation Day: 42 वर्षांचा झाला भाजपा, पंतप्रधान मोदी संबोधीत करणार, महाराष्ट्रासह देशभर पहिल्यांदाच शोभायात्रा

Nitin Gadkari : गडकरींनी असं काय केलं की ट्विटरवर ट्रेंड झालेत, 15 हजारपेक्षा जास्त ट्विटस्, एकीकडे पवार-राऊत भेट, दुसरीकडे काश्मीर फाईल्सवर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.