‘काम न करणं हेच आधीच्या सरकारला सोपं काम वाटत होतं’; काँग्रेसच्या वर्क कल्चरवर मोदींचा हल्लाबोल

"आमची सरकार नेशन फर्स्टच्या सिद्धांतावर चालत होतो. आधीच्या सरकारला काम न करणं हे सोपं काम बनलं होतं. अशा वर्क कल्चरमुळे देश कधीच पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही देशाच्या हिताचे निर्णय घेतले", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

'काम न करणं हेच आधीच्या सरकारला सोपं काम वाटत होतं'; काँग्रेसच्या वर्क कल्चरवर मोदींचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Feb 26, 2024 | 10:41 PM

नवी दिल्ली | 26 फेब्रुवारी 2024 : ‘न्यूज9 ग्लोबल समीट’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या वर्क कल्चरवर टीका केली. “अभाव असतो तिथे करप्शन होतं. भेदभाव होतो. जेव्हा सॅच्युरेशन असतं तेव्हा संतुष्टी असते. सद्भाव असतो. आज सरकार घरोघरी जाऊन लाभार्थींना सुविधा देत आहे. देशात पूर्वी सरकारचे अधिकारी गावागावात गेले नाही. सरकारच्या योजनांचा लाभ मिळाला की नाही हे अधिकारी विचारत आहेत. आम्हीही सरकारी योजनांचा लाभ घ्या असं सांगत आहोत. त्यामुळेच सॅच्युरेशनमुळे भेदभाव संपुष्टात येतो. म्हणूनच आम्ही राजनीती नव्हे तर राष्ट्रनीती करणारे लोक आहोत. आमची सरकार नेशन फर्स्टच्या सिद्धांतावर चालत होतो. आधीच्या सरकारला काम न करणं हे सोपं काम बनलं होतं. अशा वर्क कल्चरमुळे देश कधीच पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही देशाच्या हिताचे निर्णय घेतले. जुनी आव्हाने संपुष्टात आणली. आर्टिकल ३७० रद्द केलं”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“मी सिनेमाबद्दल बोलत नाही. राम मंदिर निर्माण पर्यंत ट्रीपल तलाकच्या अंतापर्यंत महिला आरक्षणापर्यंत वन रँक वन पेन्शन पासून चीफ ऑफ डिफेन्स पर्यंत आम्ही सर्व अर्धवट काम पूर्ण केले. २१ व्या शतकातील भारताला येणार्या दशकासाठी तयार करायचं आहे. भारत आज भविष्यातील योजनासाठी वेगाने पुढे जात आहे. भारत सर्वच क्षेत्रात जगाच्या पहिल्या रांगेत पोहोचला आहे”, असा दावा नरेंद्र मोदी यांनी केला.

“भारत आज ग्लोबल वर्ल्डमध्ये डिजीटल पेमेंट करणारा सर्वात मोठी ताकद आहे. भारत चंद्रमाच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा पहिला देश आहे, फायजीमध्ये युरोपलाही मागे टाकलं आहे. आज भारत उज्वल भविष्यासाठी मेहनत करत आहे. भारत भविष्याकडे पाहत आहे. म्हणूच लोक म्हणत आहेत इंडिया इज फ्युचर. त्यामुळे येणारे पाच वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहेत. आमच्या तिसऱ्या कार्यकाळात आपल्याला भारताच्या सामर्थ्याला नव्या उंचीवर न्यायचं आहे. विकसीत भारताची प्रगती करायची आहे. हे प्रगती आणि प्रशस्तीचं काम आहे. तुम्ही बिग लीपचा कार्यक्रम ठेवला. त्यामुळे मलाही माझी लीप उघडायला संधी मिळाली”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.