PM Narendra Modi Speech : ‘EVM जिवंत आहे की मेलं’ काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
PM Narendra Modi Speech : "इंडिया आघाडीचे नेते ईव्हीएमला विरोध करतात. त्यांच्यासाठी टेक्नोलॉजीच महत्त्व नाही. ते टेक्नोलॉजी स्वीकारायला तयार नाहीत. इंडिया आघाडीवाले मागच्या शतकातले लोक आहेत. प्रगती, आधुनिकता आणि टेक्नोलॉजीला त्यांचा विरोध आहे" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भाजप्राप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय नेतेपदी निवड झाली. त्यानंतर त्यांनी उपस्थित खासदारांना मार्गदर्शन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी EVM वरुन इंडिया आघाडीवर निशाणा साधला. “4 जूनला निकाल येत होते, तेव्हा मी कामात व्यस्त होतो. त्यावेळी मी कोणाला तरी विचारलं, आकडे वैगेरे ठीक आहेत. पण मला सांग, EVM जिवंत आहे की मेलं. कारण या लोकांनी आधीच ठरवलेलं भारताच्या लोकशाहीवरचा विश्वास उडाला पाहिजे, म्हणून ईव्हीएमला शिव्या घातल होते. पण 4 जूनच्या संध्याकाळी त्यांना टाळी लागली. EVM ने त्यांना शांत केलं” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“ही भारताच्या लोकशाहीची, निष्पक्षतेची, निवडणूक आयोगाीची ताकद आहे. मी आशा करतो आता पुढची पाच वर्ष EVM चा आवाज ऐकू येणार नाही. 2029 मध्ये पुन्हा EVM घेऊन येतील. निवडणूक काळात मी पाहिलं, प्रत्येक तिसऱ्यादिवशी निवडणूक आयोगाच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न सुरु होता. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. हे सर्व करणारी एकच टोळी होती. हे सर्व तेच लोक होते, ज्यांचा लोकशाहीवर अविश्वास आहे” अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
‘ताकदीचा मोठा हिस्सा तिथे खर्च झाला’
“सुप्रीम कोर्टाचा वापर करुन अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाच्या ताकदीचा मोठा हिस्सा तिथे खर्च झाला. बरीच निराशा घेऊन ते मैदानात उतरले होते. निवडणूक आयोगावर हल्ला केला. निकाल काहीही लागो, भारताला बदनाम करणं हे त्यांच षडयंत्र होतं. देश त्यांना कधीही माफ करणार नाही” असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
#WATCH | Prime Minister Narendra Modi says, “The mandate of 2024 is strengthening one thing again and again that in today’s scenario, the country trusts only NDA. When there is such unbreakable trust, it is natural for the expectations of the country to increase. I consider this… pic.twitter.com/QDlPIEx1Qq
— ANI (@ANI) June 7, 2024
‘इंडिया आघाडीवाले मागच्या शतकातले’
“इंडिया आघाडीचे नेते ईव्हीएमला विरोध करतात. त्यांच्यासाठी टेक्नोलॉजीच महत्त्व नाही. ते टेक्नोलॉजी स्वीकारायला तयार नाहीत. इंडिया आघाडीवाले मागच्या शतकातले लोक आहेत. प्रगती, आधुनिकता आणि टेक्नोलॉजीला त्यांचा विरोध आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.