भारताने कोरोनाला कसं हरवलं? ‘दावोस अजेंडा’मधील पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'दाओस अजेंडा' संमेलनात संबोधित केलं (PM Narendra Modi speech in Davos agenda summit 2021).

भारताने कोरोनाला कसं हरवलं? 'दावोस अजेंडा'मधील पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 6:34 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘दाओस अजेंडा’ संमेलनात संबोधित केलं. या कार्यक्रमात जगभरातील उद्योग जगतातील 400 संस्था सहभागी झाल्या होत्या. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात कोरोनाच्या भयानक संकट काळात अर्थव्यवस्थेला भारताने कसं जीवंत ठेवलं, याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर भारताने कोरोना संकटावर कशी मात केली, याबाबत त्यांनी भाष्य केलं (PM Narendra Modi speech in Davos agenda summit 2021).

पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

“मी 130 कोटी भारतीयांच्या वतीने जगाला विश्वास आणि सकारात्मकता आणि आशांचा संदेश घेऊन आलो आहे. जेव्हा कोरोना आला तेव्हा भारतासमोरही अनेक आव्हानं होती. गेल्या वर्षी फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यात जगभरातील अनेक नामांकित संस्थांनी बरेच काही दावे केले होते”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले (PM Narendra Modi speech in Davos agenda summit 2021).

“जगभरातील तज्ज्ञांनी कोरोनाचा सर्वात मोठा फटका भारताला बसेल, असा दावा केला होता. भारतात कोरोना संसर्गाची त्सुनामी येणार, कुणी 70 कोटी ते 80 कोटी लोकांना कोरोना संसर्ग होणार असल्याचा दावा केला तर कुणी 2 कोटी पेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूचा अंदाज वर्तवला होता. त्यावेळी आमची काय मनस्थिती असेल याचा तुम्ही अंदाज बांधू शकता. पण भारत नैराशाच्या बळी गेला नाही. भारत लढत राहिला”, असं मोदी म्हणाले.

“आम्ही कोव्हिड स्पेसिफीक हेल्थ इन्फ्र्रास्ट्र्क्चर डेव्हलप करण्यावर भर दिला. अनेकांना ट्रेन केलं. टेस्टिंग आणि ट्रेकिंगवर भर दिला. या कालावधीत भारताच्या प्रत्येक व्यक्तीने धैर्याने आपल्या कर्तव्याचं पालन केलं. कोरोना विरोधातील लढाईला एक जनआंदोलनात बदललं. आज भारत जगभरातील त्या देशांमध्ये आहे जे देश आपल्या सर्वाधिक नागरिकांना वाचवण्यात यशस्वी ठरले”, असा दावा मोदी यांनी केला.

“भारतात आज कोरोना रुग्णांची संख्या वेगाने घटत आहे. भारताच्या यशाची तुलना कोणत्या देशाशी करणं योग्य राहणार नाही. सुरुवातीच्या काळात पीपीई किट, मास्क सारख्या इतर वस्तू आम्ही बाहेरुन मागवत होतो. मात्र आज या सर्व वस्तूंच उत्पादन करुन इतर देशांची सेवा करत आहोत. आज भारतात लसीकरण सुरु आहे. सुरुवातीच्या फक्त 12 दिवसांमध्ये 2.3 मिलियन पेक्षा जास्त हेल्थ वर्कसला लस देण्यात आली आहे”, असं मोदींनी सांगितलं.

“भारताने आपल्या वैश्विक जबाबदारीला निभावलं आहे. भारताने 150 पेक्षा जास्त देशांना औषधं दिली. आज भारत इतर देशांमध्ये कोरोना लस पाठवून लोकांचे प्राण वाचवत आहे. आतापर्यंत दोन लसी आल्या आहेत. मात्र आगामी काळात आणखी काही लसी भारतातून येणार आहेत”, असंदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं.

संबंधित बातमी : भारत पुन्हा पूर्वपदावर येणार, देशाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, सक्रिय रुग्णांची संख्या पावणे दोन लाखावर

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.