‘आमचे रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत, दिव्य मंंदिरात राहतील’, नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बहुप्रतिक्षित अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं लोकार्पण पार पडलं. अतिशय भक्तीमय वातावरणात राम मंदिराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 'आमचे रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत, दिव्य मंंदिरात राहतील', असं मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

'आमचे रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत, दिव्य मंंदिरात राहतील', नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य
Follow us
| Updated on: Jan 22, 2024 | 2:27 PM

अयोध्या | 22 जानेवारी 2024 : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा लोकार्पणाचा सोहळा आज पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं उद्घाटन झालं. अतिशय भक्तिमय वातावरणात, दिग्गज महंतांच्या मंत्रोच्चारात, शंखनादात रामलल्ला मंदिरात विराजमान झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भावूक झालेले बघायला मिळाले. आता आमचा राम तंबूत नाही तर भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत, असं नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.  “या शुभ घडीच्या सर्व देशवासीयांना खूप शुभेच्छा. किती सारं सांगण्यासारखं आहे. पण कंठ नि:शब्द झालाय. माझं शरीर अजूनही स्तब्ध आहे. चित्त अजूनही त्या क्षणात लीन आहे. आमचे रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत. आमचे रामलल्ला आता दिव्य मंदिरात राहतील”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“मला पक्का विश्वास आहे, अपार श्रद्धा आहे, जे झालं आहे त्याची अनुभती विश्वाच्या कानाकोपऱ्यात रामभक्ताला झालीय. हा क्षण खूप पवित्र आहे. हे वातावरण, ही ऊर्जा, ही घडी प्रभू श्रीरामांचा आमच्या सर्वांवर आशीर्वाद आहे. 22 जानेवारी 2024 चा हा सूर्य एक अद्भूत दिवस घेऊन आला आहे. ही कॅलेंडरवरील एक तारीख नाही तर एक नव्या काळाचा उगम आहे”, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

नरेंद्र मोदी भाषणात नेमकं काय म्हणाले?

“सियावर रामचंद्र की जय… सियावर रामचंद्र की जय! सर्वांना प्रणाम आणि सर्वांना राम राम… आज आपले राम आले आहेत. शतकाच्या प्रतिक्षेनंतर आपले राम आले आहेत. शतकाच्या अभूतपूर्व धैर्य अगणित बलिदान त्याग आणि तपस्येनंतर आपले प्रभू राम आले आहेत. या शुभ प्रसंगाची आपल्या सर्वांना, संपूर्ण देशाला शुभकामना. अभिनंदन”, असं नरेंद्र मोदी सुरुवातीला म्हणाले.

“आता मी गर्भ गृहात ईश्वरीय चेतनेचा साक्षी बनून तुमच्यासमोर उपस्थित झालो आहे. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पण कंठ दाटून येतोय. माझं शरीर अजूनही स्पंदीत आहेत. मन अजूनही त्या क्षणात लीन आहे. आपले रामलल्ला आता टेंटमध्ये राहणार नाहीत. आपले रामलल्ला आता दिव्य मंदिरात राहतील. माझा पूर्ण विश्वास आहे, अपार श्रद्धा आहे, जो घटीत झाला आहे, त्याची अनुभूती देशातील विश्वाच्या कोपऱ्यातील रामभक्तांना होत असेल. हा क्षण अलौकीक आहे. क्षण पवित्र आहे. माहौल, वातावरण क्षण प्रभू रामाचा आपल्या सर्वांवर आशीर्वाद आहे. २२ जानेवारी २०२४चा हा सूर्य अद्भूत आभा घेऊन आला आहे. ही कॅलेंडरवरील तारीख नाही. ही एक नव्या कालचक्राचा उद्गम आहे. राम मंदिराच्या भूमीपूजनानंतर प्रत्येक दिवस संपूर्ण देशात उमंग आणि उत्साह वाढत जात होता”, अशा भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.