Gujarat Election 2022: मतदानाआधी PM मोदींनी घेतली आईची भेट, विजयासाठी मागितला आशीर्वाद
गुजरात निवडणुकीसाठी उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. पंतप्रधान मोदी उद्या मतदान करणार आहेत. त्याआधी त्यांनी आईची भेट घेतली.
Gujarat Election 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujrat Election 2022) दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी उद्या मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्या मतदान करणार आहेत. याआधी त्यांनी गांधीनगर (Gandhinagar) येथे जाऊन आईचा आशिर्वाद घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आईचा आशिर्वाद घेण्यासाठी नेहमीच त्यांच्या निवासस्थानी जात असतात.
याआधी २७ ऑगस्ट रोजी गुजरात दौऱ्यावर असताना देखील पंतप्रधान मोदी आईचा आशिर्वाद घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते. साबरमती नदीवर अटल पूलचं उद्घाटन करण्यासाठी ते गुजरात दौऱ्यावर गेले होते. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर ते आपली आईची भेट घेण्यासाठी पोहोचले होते.
Gujarat | Prime Minister Narendra Modi meets his mother Heeraben Modi at her residence, in Gandhinagar. pic.twitter.com/3Rtg3gJ3ON
— ANI (@ANI) December 4, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साबरमती (Sabarmati) मतदारसंघातील मतदार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मतदान सकाळी ८ वाजेपासून सुरु होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १४ जिल्ह्यातील ९३ मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ८९ जागांवर मतदान पूर्ण झाले आहे.
दुसऱ्या टप्प्यात गुजरातमधील २.५४ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात एकून २६,४०९ बूथवर मतदान होत आहे. यासाठी जवळपास ३६००० इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ईव्हीएम) चा वापर केला जाणार आहे.