Live PM Narendra Modi : गुरु तेग बहादुर यांचं 400वं प्रकाश पर्व; पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरुन संबोधन

| Updated on: Apr 24, 2022 | 7:48 PM

स्वातंत्र्य दिन आणि गणराज्य दिनाच्याच दिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत असतात. यंदा प्रथमच ते आज पंतप्रधान लाल किल्ल्यावरून संबोधित करणार असल्याने साऱ्या देशाचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे आहे.

Live PM Narendra Modi : गुरु तेग बहादुर यांचं 400वं प्रकाश पर्व; पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरुन संबोधन
Image Credit source: Twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लाल किल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून बोलणार आहेत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. यावेळी गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानिमित्ताने खास नाणं आणि टपाल तिकीटाचे अनावरण केले जाणार आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि गणराज्य दिनाच्याच दिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत असतात. यंदा प्रथमच ते आज पंतप्रधान लाल किल्ल्यावरून संबोधित करणार असल्याने साऱ्या देशाचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Apr 2022 07:48 PM (IST)

    गणेश नाईक नॉट रिचेबल

    ऐरोली आमदार गणेश नाईक नॉट रिचेबल आहेत

  • 21 Apr 2022 11:17 PM (IST)

    6 चेंडूत 17 धावांची आवश्यकता

    जसप्रीत बुमराहच्या 19 व्या षटकात ड्वेयन प्रिटोरियसने दोन चौकार लगावले. चेन्नईच्या 139./6 धावा झाल्या आहेत.

  • 21 Apr 2022 11:12 PM (IST)

    चेन्नईला विजयासाठी 12 चेंडूत 28 धावांची आवश्यकता

    चेन्नईच्या 18 षटकात सहाबाद 128 धावा झाल्या आहेत. धोनी खेळपट्टीवर आहे. तो 11 रन्सवर खेळतोय. प्रिटोरियस त्याला 12 धावांवर साथ देतोय.

  • 21 Apr 2022 10:41 PM (IST)

    मुंबईला मिळाली चेन्नईची मोठी विकेट

    शिवम दुबे 13 धावांवर बाद झाला. डॅनियल सॅम्सच्या गोलंदाजीवर इशान किशनने यष्टीपाठी जबरदस्त झेल घेतला. चेन्नईच्या 13 षटकात चार बाद 88 धावा झाल्या आहेत. चेन्नईला विजयासाठी 42 चेंडूत 68 धावांची आवश्यकता आहे.

  • 21 Apr 2022 10:23 PM (IST)

    आपल्या अस्मितेचा अभिमान असायला हवा; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आज देशाचा संकल्प

    पंजाबमधील शीख समाजाची खरी ओळख ही नवीन विचार, सतत मेहनत आणि 100 टक्के समर्पण देणे हीच आजही आपल्या शीख समाजाची ओळख आहे. आपल्या अस्मितेचा अभिमान असायला हवा हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आज देशाचा हा संकल्प आहे. स्वावलंबी भारत घडवायला हवा आपल्या भारतासारखा आदर्श पाहिजे.

  • 21 Apr 2022 10:19 PM (IST)

    भारताने कधीही कोणत्याही देशाला आणि समाजाला धोका दिला नाही

    भारताने कधीही कोणत्याही देशाला किंवा समाजाला धोका दिला नाही. आजही अखंड जगाच्या कल्याणाचा विचार भारत करत असतो. जर आपण स्वावलंबी भारताबद्दल बोलत असू तर आपण संपूर्ण जगाची प्रगती होण्यासाठी प्रयत्नशील असण्याचेच स्वप्न आपण बाळगत असतो.

  • 21 Apr 2022 10:15 PM (IST)

    गुरू तेग बहादूरजींच्या बलिदानामुळे देशाला प्रेरणा, देशाला त्यांचा विचारांमुळे नव्या वाटा मिळाल्या

    श्री गुरू तेग बहादूरजींच्या बलिदानामुळे देशाला प्रेरणा मिळाली आहे, अनेक शक्तींनी भारताला तोडण्याची भाषा केली मात्र या भारताला श्री गुरू तेग बहादूरजींचा वारसा मिळाला आहे. त्यामुळे देशाला नव्यानव्या वाटा मिळत आहेत. देशाला एकसूत्रता मिळण्यासाठी गुरुंच्या रुपात गुरु तेग बहादूरजींचा विचार मिळला आहे.

  • 21 Apr 2022 10:08 PM (IST)

    गुरू तेग बहादूरजींच्या नावाला गौरवपूर्ण इतिहासाची परंपरा

    भारताला ऋषी आणि मुनीनी वारसा लाभला आहे, त्यांच्या वारसा मिळाल्याने भारत समृद्ध झाला आहे. समाज आणि संस्कृतीची जिम्मेदारी उठवली आहे. श्री गुरू तेग बहादूरजींच्या नावाला गौरवपूर्ण इतिहासाची परंपरा आहे.

  • 21 Apr 2022 10:03 PM (IST)

    नाणे आणि टपाल तिकीटाचे अनावरणाची मला संधी मिळाली, मी माझं भाग्य समजतो

    श्री गुरू तेग बहादूरजींच्या 400 व्या प्रकाश पर्व निमित्त एक स्मरणार्थ नाणे आणि टपाल तिकीटाचे अनावरण करण्याची मला संधी मिळाली हे माझं मी भाग्य समजतो. या प्रकाशवर्षाचे मी सगळ्यांना शुभेच्छा देतो.

  • 21 Apr 2022 09:59 PM (IST)

    गुरू तेग बहादूरजींच्या एक स्मरणार्थ नाणे आणि टपाल तिकीटाचे अनावरण

    या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्र्यायलयाकडून आयोजन केल्याबद्दल सांस्कृतिक मंत्र्यालयाचे आभार मानण्यात आले आहे.यावेळी श्री गुरू तेग बहादूरजींच्या एक स्मरणार्थ नाणे आणि टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले आहे.

  • 21 Apr 2022 09:43 PM (IST)

    लाल किल्ल्यावरुन चारशे कलाकारांची अदाकारी; गुरू तेग बहादूरजींचा कलाकारांकडून गौरव

    श्री गुरू तेग बहादूरजींच्या 400 व्या प्रकाश पर्व निमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार तर आहेच पण आज लाल किल्ल्यावरुन शीख समाजातील 400 कलाकार आपली कला सादर करत आहेत.

  • 21 Apr 2022 09:25 PM (IST)

    दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन; कार्यक्रमाला प्रारंभ

    दिल्लीतील लाल किल्ल्यावरील श्री गुरू तेग बहादूरजींच्या 400 व्या प्रकाश पर्व निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला प्रारंभ, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आगमन झाले असून, कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.

  • 21 Apr 2022 09:19 PM (IST)

    तिलक वर्माची हाफ सेंच्युरी, चेन्नईला विजयासाठी 156 धावांच टार्गेट

    तिलक वर्माचं नाबाद अर्धशतक 51, सूर्यकुमार यादव 32, शौकीन 25 आणि जयदेव उनाडकटच्या नाबाद 19 धावांच्या बळावर मुंबई इंडियन्सने सात बाद 155 धावा केल्या आहेत. सीएसकेला विजयासाठी 153 धावांच टार्गेट दिलं आहे.

  • 21 Apr 2022 09:17 PM (IST)

    केंद्रातील अनेक मंत्र्यांची प्रकाश पर्व निमित्त लाल किल्ल्यावर उपस्थिती

    श्री गुरू तेग बहादूरजींच्या 400 व्या प्रकाश पर्व निमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. त्यानिमित्त गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन मंत्री जी कृष्ण रेड्डी, केंद्रीय संसदीय कार्य आणि सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि अधिकारी उपस्थित असल्याचे ट्विविट मिनाकक्षी लेकी यांनी केले आहे.

  • 21 Apr 2022 09:07 PM (IST)

    सात बाद 132 धावा

    मुंबई इंडियन्सच्या 18.2 षटकात सात बाद 132 धावा झाल्या आहेत.

  • 21 Apr 2022 09:05 PM (IST)

    श्री गुरू तेग बहादूरजींच्या स्मरणार्थ नाणे आणि टपाल तिकीटाचे अनावरण

    खासदार प्रकाश जावडेकर यांनी श्री गुरू तेग बहादूरजींच्या 400 व्या प्रकाश पर्व निमित्त एक स्मरणार्थ नाणे आणि टपाल तिकीटाचे अनावरण होत असल्याचे ट्विट केले आहे. हा महान श्री गुरु तेग बहादूरजींचा देशाचा गौरव होत असल्याचे प्रकाश जावेडकर यांनी म्हटले आहे.

Published On - Apr 21,2022 8:50 PM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.