TV9 WITT Summit 2024 : दिल्लीत TV9 नेटवर्कची ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ ग्लोबल समीट; पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार
टीव्ही9 नेटवर्कने राजधानी दिल्लीत 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' ग्लोबल समीटचं आयोजन केलं आहे. 25 तारखेपासून ही समीट सुरू होणार असून 27 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहे. यावेळी मोदी त्यांचं 2047पर्यंतच मजबूत आणि सर्वसमावेशक भारताचं व्हिजन आणि अमृतकालच्या मुख्य मुद्द्यांवर भाष्य करणार आहेत.
नवी दिल्ली | 20 फेब्रुवारी 2024 : टीव्ही 9 नेटवर्कने वार्षिक फ्लॅगशिप कॉन्क्लेव्ह ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ ग्लोबल समीटचं आयोजन केलं आहे. ही समीट आयोजित करण्याचं टीव्ही9 नेटवर्कचं हे दुसरं वर्ष आहे. देशाच्या राजधानीत दिल्लीत 25 तारखेपासून ही समीट सुरू होणार असून 27 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहे. यावेळी मोदी त्यांचं 2047पर्यंतच मजबूत आणि सर्वसमावेशक भारताचं व्हिजन आणि अमृतकालच्या मुख्य मुद्द्यांवर भाष्य करणार आहेत.
“भारत : अगली बड़ी छलांग के लिए तैयार” हा टीव्ही9 नेटवर्कच्या दोन दिवसीय शिखर संमेलनचा महत्त्वाचा विषय आहे. या समीटमधून काही प्रतिभावंत मान्यवरांमध्ये आचारविचारांचं अदानप्रदान व्हावं आणि त्यांतून कार्यवाही व्हावी यासाठी एक मंच निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आम्हीच नव्हे तर संपूर्ण जग आज भारताच्या प्रगतीसाठी पुढे येत आहे. टीव्ही9 नेटवर्कचे सीईओ आणि एमडी बरुण दास म्हणाले की, भारताने जगाला महान नेतृत्व दिलं आहे. यावेळी बरूण दास यांनी आगामी मेगा थॉट फेस्टचं स्वरुप आणि सारही समजावून सांगितलं.
मोदी संबोधित करणार
26 फेब्रुवारी रोजी न्यूज 9 ग्लोबल समीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुख्य भाषण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या परराष्ट्र धोरणाचे पाच स्तंभ सन्मान, संवाद, समृद्धी, सुरक्षा, संस्कृती आणि सभ्यतेच्या माध्यमातून भारताची सांस्कृतिक कुटनीतीला यशस्वीरित्या पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळेच देशाची प्रतिष्ठा जगात सर्वोच्च स्थानी पोहोचली आहे.
2014मध्ये देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला पावर हाऊस बनवलं आहे. संस्कृती, तत्त्वज्ञान वगैरेचा सॉफ्ट पॉवर म्हणून अप्रतिम उपयोग करण्यात आला आहे. भारत एक प्रमुख विश्वशक्ती बनला आहे. पूर्वी फारच थोडे देश वैश्विक नेते आणि आंतरराष्ट्रीय पॉवर ब्रोकरची भूमिका बजावत होते. पण आज मोदींनी भारताला वैश्विक नेता बनवले आहे. आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवणे, वैश्विक आर्थिक विकासाला प्रोत्साहन देणे, मानव विकासाला पुढे नेणे, भ्रष्टाचार विरोधी आणि सामाजिक एकीकरणाच्या प्रयत्नांच्या माध्यमातून लोकशाहीबाबत त्यांचं अतूट समर्पण आहे.
त्यांच्या कार्यकाळात ते द्विपक्षीय, प्रादेशिक आणि बहुपक्षीय समीटमध्ये समील झाले होते. यावेळी त्यांनी आर्थिक संबंधांवर लक्ष्य केंद्रीत केलं होतं. तसेच भारताने राजनैतिक संबंध तयार करण्यासाठी सॉफ्ट पॉवरचा वापर केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या आणि मध्यम शक्तींसोबतचे संबंध मजबूत करून रणनीतीक शक्तीच्या रुपाने भारताचा पारंपारिक दृष्टीकोण मोठ्या खुबीने बदलला. मोदी सरकारने चीनच्या उदयाचा सामना करतानाच क्षेत्रीय खुल्या स्वायत्ततेला बळ देण्यासाठी प्रमुख देशांशी असलेले संबंध मजबूत केले.
जगभरात यूपीआय सेवा
पश्चिम आशियासोबतचे संबंध सुधारणे ही भारताची मोठी जमेची बाजू आहे. आखाती देश भारताच्या राजनैतिक संबंधाचं एक अभिन्न अंग बनलं आहे. नेपाळ, सिंगापूर, फ्रान्स, मॉरिशस आणि श्रीलंकेनंतर यूएई सुद्धा भारताचे यूपीआय सेवा घेणारा सातवा देश बनला आहे. पंतप्रधान मोदी यांनी अबू धाबीत यूपीआय आणि रुपे कार्डची सेवा सुरू करण्यात आली. ही भारताची एक मोठी जमेची बाजू आहे.
याशिवाय पश्चिमी जगात पीएम मोदी यांची सक्रिय कूटनीती भारताला एक प्रमुख महासत्तेच्या रुपात पाहणं हा मोदी यांच्या दृष्टीकोणाचा परिपाक आहे. आंतरराष्ट्रीय कूटनीतीला प्रभावित करू शकला असता आणि एक प्रमुख डिप्लोमॅट म्हणून मध्यस्थाच्या रुपाने ते काम करू शकले असते, अशा वैश्विक नेत्याची भूमिका मोदींनी निभावली आहे.
मोदींच्या नेतृत्वात भारत सॉफ्ट पॉवर
भारताचे पंतप्रधान म्हणून मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशाचे आंतरिक मूल्य, रितीरिवाज आणि सांस्कृतिक वारसावर जोर देऊन भारताची कूटनिती यशस्वी होईल यांची खात्री दिली आहे. मोदी सरकारच्या भारतीय संस्कृतीच्या सक्रिय प्रचाराने केवळ देशाची राष्ट्रीय प्रतिमा आणि प्रभाव वाढला नाही, तर भारताबाबतच्या सकारात्मक वैश्विक दृष्टीकोणाला उत्तेजनही दिलं आहे. धान्याला लोकप्रिय करण्याच्या मोदींच्या अहवानानुसार, 2023ला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय बाजरा वर्ष साजरं केलं.
गेल्या दहा वर्षात भारताने पीडित देशांसाठी महत्त्वाचे प्रयत्न केले आहेत. कोव्हिड 19 महामारीकडे पाहिले असता ते अधिकच महत्त्वाचे झाले आहे. भारताने सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीने जगाला मंत्रमुग्ध केलं आहे. मोदी सरकारने 100 हून अधिक देशांना कोट्यवधी व्हॅक्सीन दिल्या आहेत. मोदींच्या नेतृत्वात भारताचे परराष्ट्र धोरणाचा उद्देश देशाला जगात तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून प्रस्थापित करणं आहे. जगात भारताला आघाडीवर ठेवणं आहे. म्हणूनच भारताने जी-20 समीटचं पुनरुज्जीवन केलं आहे.