पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणासीतून लढणार; 28 महिलांनाही उमेदवारी; भाजपची पहिली यादी जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणासीतून लढणार आहेत, अशी घोषणा भाजपकडून करण्यात आली. भाजपच्या पहिल्या यादीत 34 केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांची नावे आहेत. दोन माजी मंत्र्यांनाही तिकीट देण्यात आलं आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही तिकीट देण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणासीतून लढणार; 28 महिलांनाही उमेदवारी; भाजपची पहिली यादी जाहीर
Follow us
| Updated on: Mar 02, 2024 | 6:50 PM

नवी दिल्ली | 2 मार्च 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणासीतून लढणार आहेत, अशी घोषणा भाजपकडून करण्यात आली. भाजपच्या पहिल्या यादीत 34 केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांची नावे आहेत. दोन माजी मंत्र्यांनाही तिकीट देण्यात आलं आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही तिकीट देण्यात आलं आहे. 28 महिलांना यावेळी लोकसभेचं तिकीट देण्यात आल्याची घोषणाही भाजपचे महासचिव विनोद तावडे यांनी केली आहे. भाजपने पहिल्या यादीत सोशल इंजिनिअरींगवर भर दिला आहे.

भाजपचे महासचिव विनोद तावडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष वैजंत पांडा आणि माध्यम प्रमूख अनिल बलोनी यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील 195 उमेदवारांची यादी आज घोषित करण्यात येत असल्याचं विनोद तावडे यांनी सांगितलं. या यादीत एकूण 34 केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांना तिकीट देण्यात आलं आहे. पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव आहे. मोदींना वाराणासीतून उमेदवारी देण्यात आली आहे. तर अमित शाह हे गांधीनगरमधून लढणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही लोकसभा निवडणूक लढणार आहेत. अंदमान निकोबारमधून विष्णू पडारे, अरुणाचल प्रदेश वेस्टमधून किरण रिजीजू, अरुणाचल ईस्टमधून तापीर गांवता निवडणूक लढणार आहेत.

कोणत्या राज्यात किती उमेदवार

भाजपच्या पहिल्या यादीत विविध राज्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र, महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. पहिल्या यादीत उत्तर प्रदेशातील 51, पश्चिम बंगालमधील 26, मध्यप्रदेशातील 24, गुजरातमधील 15, राजस्थानमधील 15, केरळमधील 12, तेलंगनातील 9, आसाममधील 14, झारखंडमधील 11, छत्तीसगडमधील 11, दिल्लीतील 5, जम्मू-काश्मीरमधील दोन, उत्तराखंडमधील तीन, अरुणाचल प्रदेशातील दोन, गोवा, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबारमधील प्रत्येकी एका उमेदवाराचं नाव आहे.

हेमा मालिनी यांना तिकीट

प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी मथुरा लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना मध्यप्रदेशातील विदिशातून तिकीट देण्यात आलं आहे. अभिनेता मनोज तिवारी यांना उत्तर पूर्व दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी यांचं तिकीट कापण्यात आलं आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.