मोदींचा पहिल्या ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कारानं गौरव होणार! 24 एप्रिलला मुंबईत पुरस्काराचं वितरण

PM Modi to Get Mangeshkar Award : राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्यांना या पुरस्कारानं सन्मानित केला जाणार आहे. मोदींनी देशाप्रती केलेलं काम पाहून त्यांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

मोदींचा पहिल्या 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कारानं गौरव होणार! 24 एप्रिलला मुंबईत पुरस्काराचं वितरण
मंगेशकर पुरस्कारानं होणार नरेंद्र मोदी यांचा गौरवImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 10:39 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा पहिल्या वाहिल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं (Lata Dinanath Mangeshkar Award) गौरव करण्यात येणार आहे. दिवगंत लता मंगेशकर यांची बहीण उषा मंगेशकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. 24 एप्रिल रोजी या पुरस्काराचं वितरण करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुंबईत येणार आहेत. मुंबईतल्या (Mumbai) षण्मुखानंदमध्ये पुरस्कार वितरणाचा सोहळा पार पडणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. उषा मंगेशकरांच्या हस्तेच या पुरस्काराचं वितरण करण्यात येईल. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्यानं राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्यांना या पुरस्कारानं सन्मानित केला जाणार आहे. मोदींनी देशाप्रती केलेलं काम पाहून त्यांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. मोदींसोबत क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनाही यावेळी गौरवण्यात येणार आहे.

मोदीसोबत आणि कुणाकुणाचा गौरव?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन यांनाही लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. हृदयनाथ मंगेशकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

लतादीदी आणि मोदी- बहीण भावाचं नातं

मोदी पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा लता मंगेशकर यांनी व्यक्त केली होती. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना लता मंगेशकर यांनी एक वक्तव्य केलेलं. एक भाषणात लता मंगेशकर यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. 15 वर्षांपूर्वी मंगेशकर रुग्णालयाचं उद्घाटनही नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. तेव्हापासून लता मंगेशकर आणि नरेंद्र मोदी यांच्यात बहीण भावाचं नातं निर्माण झाल्याचीही आठवण हृदयनाथ मंगेशकरांनी यावेळी सांगितली.

अखेरचा निरोप

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर नरेंद्र मोदी मुंबईत अंत्यदर्शनासाठी आले होते. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर मोदींनी दुःख व्यक्त केलं होतं. त्यानंतर मोदींनी लोकसभेत आणि राज्यसभेत बोलतानाही लता मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबीयांच्या योगादानाबद्दल महत्त्वपूर्ण वक्तव्य केलेली होती.

इतर बातम्या :

1.2 कोटींचं पॅकेज घेणारा अवलिया! amazonकडून कोट्यवधीचं पॅकेज घेणारा IIT लखनौचा एकमेव विद्यार्थी

Trikut ropeway: 2000 फुटावर अडकले! रोपवे दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, आतापर्यंत किती जणांना वाचवलं?

Tina Dabi: मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या टीना डाबीच्या IAS होण्यापासून चर्चेत येण्यापर्यंतचा किस्सा

पाहा व्हिडीओ :

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.