पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हनुमानजींच्या 108 फूट प्रतिमेचे अनावरण

नवी दिल्ली : चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. तर आज हनुमानाची जयंती असून आजचा दिवस चांगला मानला जातो. त्यामुळे सकाळपासूनच देशभरातील हनुमान मंदिरांमध्ये मोठी गर्दी होत आहे. आज शहरांमध्येही मिरवणुका काढण्यात येणार असून, त्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मात्र आजच्या दिवसावरून महाराष्ट्रात चांगले रणकंदन माजले असून […]

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हनुमानजींच्या 108 फूट प्रतिमेचे अनावरण
हनुमान जयंतीच्या औचित्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 108 फूट उंच मूर्तीचे अनावरणImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 12:12 PM

नवी दिल्ली : चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. तर आज हनुमानाची जयंती असून आजचा दिवस चांगला मानला जातो. त्यामुळे सकाळपासूनच देशभरातील हनुमान मंदिरांमध्ये मोठी गर्दी होत आहे. आज शहरांमध्येही मिरवणुका काढण्यात येणार असून, त्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मात्र आजच्या दिवसावरून महाराष्ट्रात चांगले रणकंदन माजले असून शिवसेना विरोधात भाजप असे चित्र रंगले आहे. त्यामुळे हनुमान चालीसा वाचनावरून सुरू झालेला वाद काही करता कमी होताना दिसत नाही. अमरावतीचे आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्यावरून सध्या राज्यात महाराष्ट्रात चांगलाच वाद रंगलेला आहे. यादरम्यान गुजरातमधील मोरबी येथे हनुमान जयंतीच्या औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 108 फूट उंच हनुमानाच्या मूर्तीचे (Hanuman statue) अनावरण केले. हे अनावरण आज सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले.

जनतेला शुभेच्छा

आज हनुमानाची जयंतीच्या औचित्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा त्यांनी ट्विटरवरून दिल्या आहेत. आपल्या ट्विट संदेशात मोदी म्हणाले की, हनुमान जयंतीचा हा मंगल प्रसंग भगवान हनुमानाची दयाबुद्धी आणि समर्पणाचे स्मरण करण्याचा दिवस आहे. कोरोनाशी सुरु असलेल्या लढ्यात हनुमंताचे आशीर्वाद मिळावेत अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली. हनुमानाचे जीवन व त्यांचे आदर्श आपणा सर्वांना सदैव प्रेरणा देत राहो अशी सदिच्छा व्यक्त केली. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी गुजरातमधील मोरबी येथे भगवान हनुमानाच्या 108 फूट उंच मूर्तीचे अनावरण केले. त्याचबरोबर पीएमओच्या म्हणण्यानुसार, भगवान हनुमानाशी संबंधित चार धाम प्रकल्पांतर्गत हनुमानाची मूर्ती देशाच्या चारही दिशांना बसवली जाणार असून त्याचे कामही सुरू झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच या मालिकेतील पहिली मूर्ती 2010 मध्ये उत्तर दिशेला म्हणजेच शिमला येथे स्थापित करण्यात आली होती, असेही सांगण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Navneet Rana Hanuman Chalisa : अमरावतीत हनुमान चालीसाच्या पठणाला सुरुवात, नवनीत राणांची सहकुटुंब ‘हनुमान जयंती’

चांगभलं रं देवा चांगभलं, दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेस सुरुवात

MNS Hanuman Chalisa : खालकर चौकातल्या हनुमान मंदिराबाहेर भजनाचा कार्यक्रम, संध्याकाळी राज ठाकरे करणार महाआरती

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.