Pm Narendra Modi | G20 शिखर संमेलनासाठी नरेंद्र मोदी रोमला रवाना, 12 वर्षांत पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानांचा दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या विशेष विमानाने युरोप दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यात G-20 आणि COP 26 परिषदांमध्ये पंतप्रधान सहभागी होतील.

Pm Narendra Modi | G20 शिखर संमेलनासाठी नरेंद्र मोदी रोमला रवाना, 12 वर्षांत पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानांचा दौरा
PM Narendra Modi
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 10:12 AM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या विशेष विमानाने युरोप दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यात G-20 आणि COP 26 परिषदांमध्ये पंतप्रधान सहभागी होतील. सुमारे 9 तास 10 मिनिटे हवाई प्रवास केल्यानंतर पंतप्रधानांचे विशेष विमान रोमच्या लिओ नार्डो दा विंची आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरेल. विमानतळावरुन अर्धा तास रस्त्याने प्रवास केल्यानंतर पंतप्रधान हॉटेल वेस्टिन एक्सेलसियर येथे पोहोचतील.

हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर अवघ्या साडेतीन तासांनी पंतप्रधान मोदींची पहिली भेट युरोपीय परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन यांच्याशी होईल. यानंतर पंतप्रधान मोदी आपल्या हॉटेलमधून थेट पियाजा गांधी येथे जातील आणि तेथे असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला आदरांजली वाहतील. यानंतर पंतप्रधान मोदी आपल्या हॉटेलमध्ये परततील तेथून ते इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांची भेट घेण्यासाठी पलाझो चिगी येथे जातील. कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात, कॉन्सिलिझिओन सभागृहात भारतीय समुदायाच्या लोकांना मोदी भेटतील.

पंतप्रधान मोदी पोप फ्रान्सिस यांची भेट घेणार

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान सकाळी व्हॅटिकनला रवाना होतील जिथे पंतप्रधान मोदी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतील. अर्ध्या तासाच्या या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोपचे कार्डिनल सेक्रेटरी ऑफ स्टेट पिट्रो पॅरोलिन यांची भेट होणार आहे. पोप आणि त्यांचे कार्डिनल सेक्रेटरी ऑफ स्टेट यांची भेट घेऊन पंतप्रधान मोदी हॉटेलमध्ये परततील. त्यानंतर लगेचच पंतप्रधान G-20 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी रोमा कन्व्हेन्शन सेंटरला जातील. पंतप्रधान प्रथम G-20 शिखर परिषदेतील स्वागत समारंभात सहभागी होतील आणि त्यानंतर जागतिक जागतिक अर्थव्यवस्था, जागतिक आरोग्य या विषयावरील पहिल्या सत्रात सहभागी होतील.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. अलीकडच्या काही दिवसांपासून फ्रान्सचा अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासोबतचा तणाव पाहता मोदी-मॅक्रा यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेणार आहेत. पुढील वर्षी इंडोनेशियामध्ये G20 होणार आहे, त्यानंतर भारत 2023 मध्ये पहिल्यांदा G20 चे आयोजन करणार आहे. यानंतर पंतप्रधान सलग तिसरे राष्ट्रप्रमुख म्हणून सिंगापूरच्या पंतप्रधानांची भेट घेतील.

त्याच दिवशी संध्याकाळी G-20 परिषदेतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी पंतप्रधान जाणार आहेत. यानंतर G-20 परिषदेत सहभागी राष्ट्रप्रमुखांसोबत पंतप्रधान मोदींचे डिनर होईल. या कार्यक्रमांदरम्यान पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यासह अनेक राष्ट्रप्रमुखांना भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

स्पेनच्या पंतप्रधानांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात ट्रेवी फाउंडेशनला भेट देऊन होईल. यानंतर रोमा कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित G-20 परिषदेच्या दुसऱ्या सत्रात पीएम मोदी पुन्हा एकदा हवामान बदल आणि पर्यावरणावरील चर्चेत सहभागी होतील. दुसरे सत्र संपल्यानंतर पंतप्रधान मोदी स्पेनच्या पंतप्रधानांशी पंधरा मिनिटांची बैठक घेणार आहेत. मोदी आणि जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांच्यात जवळपास अर्ध्या तासाची चर्चा होण्याची शक्यता आहे. यानंतर पंतप्रधान मोदी सप्लाय चेनवर स्वतंत्रपणे आयोजित केलेल्या जागतिक परिषदेत सहभागी होतील. यानंतर पंतप्रधान आपला इटली दौरा संपवून ब्रिटनमधील ग्लासगो येथे रवाना होतील.

(Pm Narendra modi Visit Italy UK G20 summit Full Schedule)

हे ही वाचा :

जम्मू काश्मीर: डोडा जिल्ह्यात मिनीबस दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु!

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ सुरुच, नव्या कोरोनाबळींचा आकडा सातशेपार

भारताचे मोठे यश; 5000 किमीचा पल्ला असलेल्या अग्नि-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.