Video : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संत रविदास यांना अभिवादन,नवी दिल्लीत कीर्तनात सहभाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज नवी दिल्ली (Navi Delhi) येथे संत गुरु रविदास विश्रामधाम मंदिराला (Shri Guru Ravidas Vishram Dham Mandir) भेट दिली.

Video : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संत रविदास यांना अभिवादन,नवी दिल्लीत कीर्तनात सहभाग
नरेंद्र मोदी संत रविदास जयंती कार्यक्रमात सहभागी
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 12:49 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज नवी दिल्ली (Navi Delhi) येथे संत गुरु रविदास विश्रामधाम मंदिराला (Shri Guru Ravidas Vishram Dham Mandir) भेट दिली. नरेंद्र मोदी यांनी संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त त्यांना दिल्लीतील करोल बाग येथील श्री गुरु रविदास विश्राम धाम मंदिरात दर्शन घेतलं. नरेंद्र मोदी यांनी यानिमित्तानं देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.गुरु रविदास जयंती उत्सव हा पंजाबमधील (Punjab) अनसूचित जाती प्रवर्गातील मागासवर्गीय बांधवांसाठी महत्त्वाचा मानला जातो. पंजाबच्या एकूण लोकसंख्येपैकी 30 टक्के समाज संत रविदास यांच्या विचारांना मानतो. संत रविदास जयंतीमुळं पंजाबमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखांमध्येही बदल करण्यात आला होता. नरेंद्र मोदी यांनी काल ट्विट करुन रविदास जयंतीनिमित्त करोल बागेतील मंदिरात उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं होतं.

नरेंद्र मोदी यांचं ट्विट

नरेंद्र मोदी शबद किर्तनात सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत रविदास जंयतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शबद किर्तनात सहभाग घेतला. नवी दिल्ली येथील श्री गुरु रविदास विश्राम धाम मंदिरातील आयोजित कार्यक्रमात नरेंद्र मोदी सहभागी झाले. यावेळी उपस्थित महिला आणि भाविकांची विचारपूस देखील मोदी यांनी केली.

पंजाबमध्ये 20 तारखेला मतदान

उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा, उत्तराखंड सोबत पंजाबमध्ये देखील विधानसभा निवडणूक जाहीर झालीय. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 14 फेब्रुवारीला मतदान होणार होतं. मात्र, काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पार्टीनं निवडणूक आयोगाकडे मतदानाची तारीख बदलण्याची मागणी केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगानं पंजाबमध्ये मतदान 20 फेब्रुवारी रोजी घेण्याचं जाहीर केलं होतं. पंजाबच्या निवडणुकीच्या निमित्तानं आजची नरेंद्र मोदी यांची भेट महत्त्वाची ठरणार आहे.

इतर बातम्या:

देवेंद्रजी 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे, अमृता फडणवीसांची किचनमध्ये ‘कल्ला’कारी

VIDEO : NSA Ajit Doval यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न,सुरक्षा रक्षकांनी संशयिताला ताब्यात घेतलं

PM Narendra Modi visit Shri Guru Ravidas Vishram Dham Mandir in Delhi on Saint Raividas Birth Anniversary

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.