PM Modi: जेव्हा नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधानांचा हात हातात घालून खुर्ची दाखवली!
दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक भेट झाल्याचे फोटोंवरून जाणवते. मोदी आणि देवेगौडांची अतिशय मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे ही समजते. फोटोमध्ये दिसते की पंतप्रधान मोदी देवेगौडांना खुर्चीवर बसण्यासाठी आमंत्रित करत आहेत. दोन्ही नेते एकमेकांचा हात धरून चांगल्या गप्पा मारत वेळ घालवताना दिसून येत आहे.
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी भारताचे माजी पंतप्रधान आणि राज्यसभा खासदार एच डी देवेगौडा (H D Devegowda) यांची संसदेत (Parliament) भेट घेतली. “आज संसदेत आपले माजी पंतप्रधान श्री देवेगौडा जी यांच्याशी ग्रेट भेट झाली,” पंतप्रधान मोदींनी ट्विट केले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ही भेट झाली. 29 नोव्हेंबरपासून दिल्लीत हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. दरम्यान, ट्विटरवर लोकांनी खासदार देवेगौडा यांच्या भेटीच्या वेळेचे पंतप्रधान मोदींचे हावभाव, आदरयुक्त वागणूक आणि देहबोलीचे कौतुक केले.
दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक भेट झाल्याचे फोटोंवरून जाणवते. मोदी आणि देवेगौडांची अतिशय मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे ही समजते. फोटोमध्ये दिसते की पंतप्रधान मोदी देवेगौडांना खुर्चीवर बसण्यासाठी आमंत्रित करत आहेत. दोन्ही नेते एकमेकांचा हात धरून चांगल्या गप्पा मारत वेळ घालवताना दिसून येत आहे.
ट्विटरवर अनेकांनी फोटोंचे कौतुक केले, काहींनी दोन नेत्यांच्या भेटीसाठी अभिनंदन केले तर काहींनी शुभेच्छा आणि आशीर्वादही दिले.
Priceless picture of the day ❤️ Respect & amicable can be seen towards a senior.
— Md Nadeem Ahmad Faiz?? (@nadeemafaiz) November 30, 2021
देवेगौडा आणि मोदींचे जुने नाते
एच डी देवगौडा हे जून 1996 ते एप्रिल 1997 पर्यंत भारताचे पंतप्रधान होते. सध्या ते कर्नाटकमधून राज्यसभेवर खासदार आहेत. ते जनता दल (सेक्युसर) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील आहेत.
देवेगौडा यांनी भारतात लादलेल्या आणीबाणीविरुद्ध लढा दिला होता. नंतर ते 1994 मध्ये जनता दलात सामील झाले, जे नंतर भारतीय जनता पक्ष बनले. कर्नाटकात जनता दलाला बळ देणारे ते प्रमुख व्यक्ती होते. 1999 मध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली तेव्हा काही नेते भाजपमध्ये सामील झाले, जे कर्नाटकातील काही नेते देवेगौडा यांच्या जनता दल (सेक्युलर) मध्ये सामील झाले. त्यामुळे जरी आता ते एकत्र नसतील, पण देवेगौडा आणि नरेंद्र मोदी यांचे जनता दलापासूनचे जुने संबंध आहेत आणि ते संबंध अजूनही शाबुत आहेत, हेच या फोटोंवरून जाणवते.
ही पहिली वेळ नाही, पंतप्रधान मोदींनी इतर नेत्यांसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. अलीकडेच, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबतचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या फोटोंमध्ये, पीएम मोदींनी योगी आदित्यनाथ यांच्या खांद्यावर हात ठेवला होता आणि दोन्ही नेते काही चर्चा चाललीये, असं फोटोंमध्ये दिसत होते, ज्यावर देशभरात राजकीय चर्चांना उधान आले होते.
इतर बातम्या