PM Modi Kedarnath Visit: चार धाम देवस्थान बोर्ड बरखास्त होणार? उद्या मोदी मोठी घोषणा करण्याची शक्यता
चार धाम देवस्थान बोर्डावर पुरोहित समाजाने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. बोर्डाच्या स्थापनेमुळे चार धामसह अन्य 51 मंदिरांचे नियंत्रण राज्य सरकारकडे आले. उत्तराखंडमध्ये- केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री आणि बद्रीनाथ हे चार धाम आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी केदारनाथला भेट देणार आहेत. मात्र, पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी तेथील पुजारी (पुरोहित) आणि पंडा समाजाने पंतप्रधानांच्या दौऱ्याला विरोध केला होता. चार धाम देवस्थान बोर्डावर पुरोहित समाजाने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. बोर्डाच्या स्थापनेमुळे चार धामसह अन्य 51 मंदिरांचे नियंत्रण राज्य सरकारकडे आले. उत्तराखंडमध्ये- केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री आणि बद्रीनाथ हे चार धाम आहेत. जानेवारी 2020 मध्ये त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या सरकारने चार धाम देवस्थान बोर्डाची स्थापना केली. (PM Visit to Kedarnath announcement on Chaar Dham Board likely)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संतप्त पुजाऱ्यांचे मन वळवण्यासाठी मुख्यमंत्री धामी यांना पुजाऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे. देवस्थान बोर्ड बरखास्त करण्यासाठी मी स्वतः पंतप्रधानांशी बोलणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पुजाऱ्यांना सांगितले आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत मंडळ विसर्जित होईल, असे सांगितले जात आहे.
Election 2022: पंतप्रधान मोदींच्या केदारनाथल दौऱ्यावर पुजार्यांचा विरोध !#PMModi #Election2022 #BJP #Uttarakhand #BJP https://t.co/z5ka0XZzmC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 3, 2021
गेल्या चार महिन्यांपासून देवस्थान बोर्ड विरोधात आंदोलन सुरू आहे. यामुळेच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांना मोदींच्या भेटीच्या एक दिवस आधी केदारनाथला पुजार्यांशी भेट घेऊन, बंद खोलीत जवळपास सात तास पुजार्यांशी चर्चा केली. उत्तराखंडमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणिक आहे. निवडणिकुच्या पार्श्वभूमीवर हा विरोध भाजपसाठी चिंतेची बाब आहे.
चार धाम देवस्थान बोर्ड बरखास्त करण्याबाबत उघडपणे सांगितले गेले नाही. मात्र, ज्या पद्धतीने मुख्यमंत्री धामी यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी केदारनाथला भेट दिली आणि त्यानंतर पुजाऱ्यांशी चर्चा केली, यावरून स्पष्ट होत आहे की दिल्लीत भाजप नेतृत्वाशी चर्चेाकरूनच भेटीचा निर्णय घेण्यात आला.
Related News