Bihar Crime: हुंड्यासाठी पत्नी आणि मुलांची विष पाजून हत्या, बिहारमधील अमानुष घटनेने सर्वत्र खळबळ

घटनेनंतर पीडिताच्या कुटुंबीयांनी सासरच्या आठ लोकांविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे. हुंड्याची मागणी करीत हत्या केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून अन्य दोन आरोपींचा पोलीस घेत आहेत.

Bihar Crime: हुंड्यासाठी पत्नी आणि मुलांची विष पाजून हत्या, बिहारमधील अमानुष घटनेने सर्वत्र खळबळ
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 6:56 PM

नालंदा : हुंड्यासाठी पत्नी आणि दोन मुलांना विष पाजून त्यांची हत्या केल्याची अमानुष घटना बिहारमधील नालंदा येथे घडली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. हत्येनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गुड्डू पासवान असे फरार आरोपीचे नाव आहे.

हुंड्यावरुन पती-पत्नीत दररोज वाद व्हायचे

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत चकियापार गावात गुड्डू पासवान आपल्या कुटुंबासोबत राहतो. त्याला तीन वर्षाचा मुलगा आणि एक वर्षाची मुलगी अशी दोन मुले आहेत. याप्रकरणी पीडितेच्या सासूला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिची चौकशी पोलीस करीत आहेत. गुड्डू आणि त्याच्या पत्नीमध्ये हुंड्यावरुन दररोज वाद होत होते. याच वादातून गुड्डूने आपल्या पत्नीला आणि दोन निष्पाप मुलांना विष पाजले. यात त्या तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

सासरच्या आठ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल

घटनेनंतर पीडिताच्या कुटुंबीयांनी सासरच्या आठ लोकांविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे. हुंड्याची मागणी करीत हत्या केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून अन्य दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस अनेक संभाव्य ठिकाणी धाडी टाकत आहेत.

कायदे कडक करण्याची आवश्यकता

सरकारने हुंडाबळी रोखण्यासाठी हुंडा प्रतिबंध कायदा आणला. या कायद्यानुसार हुंडा दिल्यास किंवा घेतल्यास 5 वर्षे कारावास आणि 15 हजार रुपये दंडाची तरतूद आहे. मात्र सरकारने कितीही कायदे आणले तरी अनेक ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागात हुंडा प्रथेला चाप बसला नाही. आजही हुंड्यासाठी निष्पाप महिलांचे प्राण जात असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सरकारने कायदे आणखी कडक करण्याची गरज आहे. (Poisoning of wife and children for dowry in Bihar)

इतर बातम्या

TET Exam scam | आरोपी घोटाळा करताना वापरायची ही Modus operandi.. ; पोलिसांनी उघड केली माहिती

Video : आरओ वॉटर प्लांटवरून भाजपा-काँग्रेस कार्यकर्ते भिडले, तळेगावातील प्रकार

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.