Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

POK भारताचा आहे एक इंच ही जागा जाऊ देणार नाही, संसदेत काय म्हणाले अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत बोलताना काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. अमित शाह म्हणाले की, काँग्रेस अजूनही कलम ३७० हटवण्याचा निर्णय चुकीचे असल्याचे म्हणत आहे. काँग्रेस सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाला देखील चुकीचा ठरवत आहे. अमित शाह यांनी पीओकेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

POK भारताचा आहे एक इंच ही जागा जाऊ देणार नाही, संसदेत काय म्हणाले अमित शाह
Amit shah
Follow us
| Updated on: Dec 11, 2023 | 8:05 PM

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत बोलताना काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. शहा म्हणाले की, काँग्रेस अजूनही कलम ३७० हटवण्याला चुकीचे म्हणत आहे. काँग्रेस सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाला देखील योग्य मानत नाही. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा मोदी सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने वैध मानला आहे. निकाल देताना CJI DY चंद्रचूड म्हणाले होते की, भारतात विलीन झाल्यानंतर जम्मू-काश्मीरला अंतर्गत सार्वभौमत्वाचा अधिकार नाही. कलम ३७० ही तात्पुरती तरतूद होती.

नेहरुंंच्या निर्णयामुळे विलिनीकरणारा उशीर – शाह

अमित शाह यांनी राज्यसभेत सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील लोकांचे हक्क 3 कुटुंबांनी रोखले आहेत. पीओके भारताचा आहे, तो कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. भारताची एक इंचही जमीन आम्ही जाऊ देणार नाही, असेही ते म्हणाले. कलम 370 बाबत ते म्हणाले की याने अलिप्ततावादाला बळ दिले आहे. पुन्हा एकदा नेहरूंचा उल्लेख करून ते म्हणाले की, नेहरूंनी अर्धे काश्मीर सोडले. तसेच नेहरूंच्या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरच्या विलीनीकरणाला उशीर झाला.

दहशतवादी हल्ले कमी झाले – शाह

दहशतवादी हल्ले ७० टक्क्यांनी कमी झाली आहे. चार वर्षात दगडफेकीच्या एकही घटना घडलेली नाही. घुसखोरीच्या घटना देखील कमी झाल्या आहेत. २८१ दहशतवादी जम्मू-काश्मीर सोडून पळून गेले आहेत. दहशतवाद्यांना पैसा पुरवणाऱ्यांवर आम्ही कारवाई केली आहे. १५० कोटींची संपत्ती यामध्ये जप्त करण्यात आली आहे. १०० कोटींची संपत्ती फ्रीज केली आहे.

काँग्रेसवर अमित शाह यांची टीका

कलम 370 इतर कोणत्याही राज्यात का लागू करण्यात आले नाही, असा प्रश्न अमित शहा यांनी उपस्थित केला. जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर पाठवण्यास विलंब का झाला, असा सवालही त्यांनी केला. नेहरूंनी पीओकेचा मुद्दा यूएनमध्ये का नेला?

काँग्रेसवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, काँग्रेस कोणत्याही चांगल्या कामाचे समर्थन करत नाही. जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या तरुणांच्या हातात आमच्या सरकारने लॅपटॉप दिल्याचे गृहमंत्री म्हणाले. आपण निर्णय घेऊ शकतो, पळून जाऊ शकत नाही. इतिहास 370 चा निर्णय लक्षात ठेवेल.

आम्ही सर्जिकल स्ट्राईल आणि एअर स्ट्राईक करुन उत्तर दिले आहे. दहशतवाद्यांबद्दल आमच्या मनात कोणतीही संवेदनशीलता नाही. आम्ही जे केले ते युवकांसाठी केले आहे. हा फक्त काश्मीरचा प्रश्न नव्हता. हा १३० कोटी लोकांचा प्रश्न होता. काश्मीरसाठी ज्यांनी बलिदान दिले आहे, त्या प्रत्येकांची आत्मा आज संतुष्ट झाली असेल. कोर्टाच्या निर्णयाचे आज मी सगळ्या जनतेकडून स्वागत करतो.

'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.
खोक्याला वनविभागाच्या कोठडीत जबर मारहाण, अंगावर वळ अन्... फोटो व्हायरल
खोक्याला वनविभागाच्या कोठडीत जबर मारहाण, अंगावर वळ अन्... फोटो व्हायरल.
मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण उद्यापासून... हवामान खात्यानं काय म्हटलं?
मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण उद्यापासून... हवामान खात्यानं काय म्हटलं?.
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा.
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.