AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, तक्रारदार पोलीस अधिकाऱ्याची सुप्रीम कोर्टात धाव, इंटर्वेन्शन याचिका दाखल

परमबीर सिंग यांच्या या याचिकेसंदर्भात भीमराव घाडगे यांनी इंटर्व्हेन्शन याचिका दाखल केली आहे. (Parambir Singh Bhimrao Ghadage)

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, तक्रारदार पोलीस अधिकाऱ्याची सुप्रीम कोर्टात धाव, इंटर्वेन्शन याचिका दाखल
परमबीर सिंग
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 5:41 PM

नवी दिल्ली: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी वेळी बाजू ऐकूण घेण्यासाठी पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी देखील सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. भीमराव घाडगे यांनी आज ही याचिका दाखल केली. परमबीर सिग यांनी काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेत आपल्या विरोधात अनेक प्रकरणात चौकशी सुरू आहे. गुन्हा दाखल आहे, या सर्व प्रकरणाची महाराष्ट्र सोडून इतर राज्यात चौकशी करावी आणि प्रकरण चालवावीत, अशी मागणी केली आहे. परमबीर सिंग यांच्या या याचिकेसंदर्भात भीमराव घाडगे यांनी इंटर्व्हेन्शन याचिका दाखल केली आहे. (Police Inspector Bhimrao Ghadage file intervention petition against Parambir Singh in Supreme Court)

आमचं म्हणणं ऐकून घ्या

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात लवकरच सुनावणी होणार आहे. त्या प्रकरणी आता पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी सुप्रीम कोर्टात इंटर्व्हेन्शन याचिका दाखल करत त्यांची बाजू ऐकण्याची मागणी केली आहे. परमबीर सिग यांची याचिका ऐकताना आपल्याला ही ऐकण्यात यावं , अस त्यांचं म्हणणं आहे.

दुसऱ्या राज्यात सुनावणी आणि चौकशीला विरोध

भीमराव घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्या विषयी सुरु असलेल्या प्रकरणांची दुसऱ्या राज्यात चौकशी करण्यास देखील विरोध दर्शवला आहे. सिंग यांची चौकशी महाराष्ट्रात झाली पाहिजे असं त्यांचं मत आहे.

परमबीर सिंग यांच्यावर नेमका आरोप काय?

परमबीर सिंग यांच्या पत्नी यांचं इंडिया बुल्समध्ये कार्यालय आहे. तिथे हजारो कोटी गुंतवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांचा मुलगा रोहन हा सिंगापूरमध्ये एक मोठा व्यवसाय चालवतो. तिथे देखील भ्रष्टाचाराचे पैसे गुतंवण्यात आले आहेत, असा आरोप भीमराज घाडगे यांनी केला आहे.

परमबीर सिंग यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्या रकमेची वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक केली. परमबीर सिंग यांच्या कुटुंबियांनी वेगवेगळ्या व्यवसायात त्या पैशांची गुंतवणूक केली, असा धक्कादायक आरोप अकोल्याच्या पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी केला आहे.

विशेष म्हणजे या पोलीस अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी याबाबतचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनाही पत्र पाठवले होते. त्यानंतर काल रात्री उशिरा याबाबत अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे.

जातीवाचक शिवीगाळ केल्याचा दावा

त्यासोबतच परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलिस अधिकाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही भीमराज घाडगे यांनी यात म्हटलं आहे. यामध्ये पराग मनेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर या चार पोलीस उपायुक्तांच्या डझनभर पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे, असा दावा भीमराज घाडगे केला आहे. तसेच परमबीर सिंग यांच्याविरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल होणार असल्याचे बोललं जात आहे. त्यात भ्रष्टाचारासह जातीवाचक शिवीगाळ आणि अन्य काही गंभीर प्रकरणांचा समावेश आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्यासह तब्बल 27 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध हा गुन्हा दाखल केला गेला आहे.

संबंधित बातम्या:

परमबीर सिंग यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला, अकोल्याच्या पोलीस अधिकाऱ्याचा गंभीर आरोप

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, पोलीस अधिकाऱ्याकडून पहिला गुन्हा दाखल

(Police Inspector Bhimrao Ghadage file intervention petition against Parambir Singh in Supreme Court)

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.