पाडलेल्या अवैध मदरशाच्या जागी बांधले जाणार पोलीस स्टेशन, धामी सरकारची दंगलखोरांवर धडक कारवाई
हल्द्वानीच्या बनफूलपुरा भागात पोलिसांकडून जोरदार कारवाई सुरु आहे. दंगलखोर घरे सोडून पळून गेली आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्री धामी यांनी दिला आहे.पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात शांतता आहे.
Haldwani Update : उत्तराखंडमधील हल्दवानी भागात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. अवैध मदरसा पाडल्याने या भागात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली आहे. ज्यामध्ये बरेच पोलीस जखमी झाले होते. यावेळी 6 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर उत्तराखंड पोलिसांनी 5 हजार अज्ञात दंगलखोरांविरोधात गुन्हा दाखल केला होता, आता सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडीओ क्लिप पाहून लोकांना ताब्यात घेतले जात आहेत. अनेकाचा कसून शोध सुरू आहे. परिसरात शांतता राखण्यासाठी उत्तराखंड पोलिसांसह निमलष्करी दलाचे जवान ही तैनात करण्यात आले आहेत. या ठिकाणी फ्लॅग मार्च देखील काढण्यात आला. आता हल्दवानी प्रकरणी सीएम पुष्कर सिंह धामी यांनी मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, हल्दवानीमध्ये ज्या ठिकाणी बेकायदा बांधकामे हटवण्यात आली होती त्या ठिकाणी आता पोलीस ठाणे बांधण्यात येणार आहे.
दंगलखोरांना सीएम धामींचा इशारा
दंगलखोरांना स्पष्ट इशारा देत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, ‘हल्द्वानीच्या बनभूलपुरा येथे ज्या ठिकाणी अतिक्रमण हटवण्यात आले आहे त्या ठिकाणी आता पोलिस स्टेशन बांधले जाईल. देवभूमीत शांततेशी खेळणाऱ्या कुणालाही सोडले जाणार नाही, हा आमच्या सरकारचा भ्रष्ट आणि दंगलखोरांना स्पष्ट संदेश आहे. उत्तराखंडमध्ये अशा बदमाशांना स्थान नाही.’
सीएम धामी म्हणाले की, हल्दवानी हिंसाचारात सहभागी असलेल्या कोणत्याही दंगलखोराला सोडणार नाही. या घटनेत सहभागी असलेल्या प्रत्येक दंगलखोराला अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. बेकायदा अतिक्रमणांविरोधातील मोहीम केवळ हल्दवानीमध्येच नव्हे तर संपूर्ण उत्तराखंडमध्ये तीव्र केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. जिकडे अतिक्रमण सापडेल. तेथे कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. ही मोहीम आता थांबणार नाही.
दुसरीकडे हिंसाचारानंतर, पोलिसांनी त्या सर्व घरांना चिन्हांकित केले आहे ज्यातून पोलीस प्रशासनावर दगडफेक होत होती आणि 8 फेब्रुवारी रोजी पेट्रोल बॉम्बने हल्ले केले जात होते. निमलष्करी दलांसह पोलिसांची पथके अशा सर्व घरांवर सातत्याने छापे टाकून आरोपींना अटक करत आहेत.
पोलिसांच्या कारवाईनंतर अनेकांचे पलायन
हा छापा टाळण्यासाठी सुमारे 300 घरांमध्ये राहणाऱ्या लोकांनी घरांना कुलूप लावून कुटुंबासह पलायन केले आहे. दंगलीच्या रात्रीपासूनच त्याच्या फरार होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने 8 फेब्रुवारीच्या रात्री गुपचूप आपल्या कुटुंबासह बनभूलपुरा भाग सोडला आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये किंवा यूपीच्या जिल्ह्यांमध्ये पळून गेले आहेत. आता पोलीस त्या आरोपींचे लोकेशन ट्रेस करत असून छापा टाकण्यासाठी पोलीस पथके पाठवत आहेत.
अनेकांची शस्त्रे परवाना रद्द
हल्दवणीच्या दंगलखोरांवर पोलीस-प्रशासनाची कारवाई सुरूच आहे. नैनिताल जिल्ह्याच्या डीएम वंदना यांनी पोलिसांच्या गुप्तचर अहवालानंतर बनभुलपुरा भागात जारी केलेले 120 शस्त्र परवाने रद्द केले आहेत. तसेच, परिसरात जारी करण्यात आलेल्या इतर परवान्यांची गांभीर्याने चौकशी करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. बनफूलपुरा परिसरात राहणाऱ्या असामाजिक घटकांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.