स्वत:ला पेटवून घेण्याची धमकी देत होता पोलीस कर्मचारी, गर्लफ्रेंडने काडी पेटवली आणि…
अनैतिक संबधातून काय होऊ शकते याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. एकाच पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. पण हे प्रेमसंबंधातून वाद इतका टोकाला गेला की एक धक्कादायक घटना घडली. पोलीस याची चौकशी करत आहे.
बंगळुरू : कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलला त्याच्याच गर्लफ्रेंडने पेटवून दिले. जखमी अवस्थेत पोलिसाला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्याचा मृत्यू झाला. संजय असे मृत व्यक्तीचे नाव असून राणी या होमगार्डसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. दोघेही बंगळुरू येथील बसवानगुडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
गर्लफ्रेंडची समजूत काढण्याचा करत होता प्रयत्न
राणी संजयपासून काही दिवसांपासून दूर राहू लागली होती. संजयने दुसऱ्या व्यक्तीसोबत फोनवर बोलताना पाहिले. संजय राणीची समजूत घालण्यासाठी गेला असता दोघांमध्ये वाद झाला. तिने समेट करण्यास नकार दिल्यास स्वत:ला पेटवून घेण्याची धमकी संजयने दिली आणि त्यानंतर स्वत:वर पेट्रोल ओतून घेतले. त्याचवेळी राणीने माचिसची काडी पेटवली आणि त्याला पेटवून दिले. नंतर परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून राणीने पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि संजयला दुचाकीवरून व्हिक्टोरिया रुग्णालयात नेले. मात्र गुरुवारी पहाटे संजयचा मृत्यू झाला.
संजयचे होते विवाहबाह्य संबंध
संजयच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की राणीने त्याला जाणूनबुजून आग लावली, परिणामी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वतःचे कुटुंब असूनही संजयचे राणीसोबत संबंध होते. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.