मुलीनं धाव घेतली त्यावेळेस टोळकं तिच्या बापावर वार करत होतं, भाजप नेत्याच्या हत्येचा थरारक घटनाक्रम

ज्यांची हत्या झाली ते राजकीयदृष्ट्या वयाने तरुण होते. पण विचारसरणीची लढाई खून, हत्येपर्यंत आलीय. पश्चिम बंगाल, केरळमध्ये अशा राजकीय हत्यांचं सत्र थांबताना दिसत नाहीय. त्यातली भाजप नेत्याची ज्या पद्धतीनं हत्या केली गेलीय, ते अंगावर काटा आणणारं आहे.

मुलीनं धाव घेतली त्यावेळेस टोळकं तिच्या बापावर वार करत होतं, भाजप नेत्याच्या हत्येचा थरारक घटनाक्रम
रणजित श्रीनिवास आणि के.एस.शान यांची हत्या
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 10:43 AM

फक्त केरळच नाही तर दोन राजकीय हत्यांनी देश हादरुन गेलाय. ह्या दोन्ही हत्या चोवीस तासाच्या अंतरानं घडलेल्या आहेत. त्या ज्या पद्धतीनं घडल्यात, त्यानं अंगावर काटा उभा रहातो. आधी एसडीपीआय नेत्याची हत्या केली गेली. (Kerala Political Killings) तिचा बदला म्हणून भाजपच्या राज्य सचिवाची हत्या करण्यात आली. ज्यांची हत्या झाली ते राजकीयदृष्ट्या वयाने तरुण होते. पण विचारसरणीची लढाई खून, हत्येपर्यंत आलीय. पश्चिम बंगाल, केरळमध्ये अशा राजकीय हत्यांचं सत्र थांबताना दिसत नाहीय. त्यातली भाजप नेत्याची ज्या पद्धतीनं हत्या केली गेलीय, ते अंगावर काटा आणणारं आहे.

मुलीसमोर हत्या भाजपचे राज्य सचिव (BJP Leader killed) होते रणजित श्रीनिवास. त्यांची आई मंदिरात गेलेली होती आणि ते स्वत: लहान मुलीला ट्युशनला सोडून घरी परतले होते. सकाळची वेळ होती. त्याच वेळेस दहा एक जणांचं एक टोळक्यानं त्यांना घरात गाठला आणि त्यांच्यावर सपासप वार केले, चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या. त्याच वेळेस त्यांची मुलगी धावत आली तर हल्लेखोरांनी तिच्यावरही तलवार रोखली. पत्नी मदतीसाठी आली तर तिलाही शस्त्रानं धमकावलं गेलं. मुलीच्या समोरच हल्लेखोरांनी रणजित श्रीनिवास यांचा जीव घेतला. मुलीकडे वडीलांची रक्ताच्या थारोळ्यातली अवस्था बघत रहाण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता. अनेक गंभीर जखमी झाल्यानं शेवटी रणजित श्रीनिवास यांचा जीव गेला. विशेष म्हणजे त्याच दिवशी ते ओबीसी मोर्चाच्या बैठकीसाठी कोचीला जाणार होते. पण त्याआधीच त्यांची हत्या झाली. श्रीनिवास यांनी 2016 साली भाजपच्या तिकिटावर आमदारकीची निवडणूक लढवली होती. एका सामान्य कुटूंबातून आलेल्या रणजित श्रीनिवास यांचं आता कुठे राजकीय करिअर सुरु झालं होतं. पण ते बहरण्याच्या आधीच संपलं.

रणजित श्रीनिवासची हत्या का? ह्या प्रश्नाचं उत्तर आदल्या दिवशी जी घटना घडली त्यात आहे. दोन्ही घटना ह्या केरळच्या अल्लफुजा जिल्ह्यातल्या आहेत. शनिवारी रात्री SDPI चे जनरल सेक्रेटरी के.एस. बाईकवरुन जात होते. (SDPI Leader Killed) ही घटना आहे मन्नाशेरीतली आहे. त्याच वेळेस एका कारनं त्यांच्या बाईकला धडक दिली आणि ते जागेवर कोसळले. त्यानंतर कारमधून एक टोळकं खाली उतरलं आणि खाली पडलेल्या के.एस. शानवर हल्ला केला. त्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्याही चेहऱ्यावर गंभीर जखमा केल्या गेल्या. नंतर त्यांना आधी लोकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि नंतर कोचीला हलवलं, तिथं रात्री 11.30pm ला मृत घोषीत करण्यात आलं. SDPI (Social Democratic Party of India) ही PFI (Popular Front of India) ची राजकीय शाखा आहे. शान हे अवघ्या 39 वर्षांचे होते तर रणजित श्रीनिवास हे 45 वर्षांचे.

हे सुद्धा वाचा:

दुष्काळात तेरावा : सोयाबीनसह आठ शेतीमालाच्या वायद्यांवरही निर्बंध, काय होणार दरावर परिणाम?

Mumbai Water Taxi: नव्या वर्षात मुंबईकरांना गिफ्ट, जानेवारी पंतप्रधानांच्या हस्ते वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन!

Nashik Omicron| कळते पण वळत नाही; दुसरा डोस फक्त 40 टक्के लोकांनीच घेतला, धास्ती प्रशासनाला

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.