Bengal Violence: बंगालमध्ये राजकीय हिंसाचार सुरूच, मेदिनीपूरमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या, तृणमूलवर आरोप

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपासून राजकीय हिंसाचारा झालेली सुरूवात काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. शनिवारी पूर्व मिदनापूरमध्ये एका महिन्यात दुसऱ्यांदा हत्येची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी याच जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्याची हत्या झाली होती, ज्यासाठी, तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याला अटक करण्यात आली.

Bengal Violence: बंगालमध्ये राजकीय हिंसाचार सुरूच, मेदिनीपूरमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या, तृणमूलवर आरोप
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 12:33 PM

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपासून राजकीय हिंसाचारा झालेली सुरूवात काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. शनिवारी पूर्व मिदनापूरमध्ये एका महिन्यात दुसऱ्यांदा हत्येची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी याच जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्याची हत्या झाली होती, ज्यासाठी, तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याला अटक करण्यात आली. कालच्या घटनेसाठी पुन्हा तृणमूल काँग्रेसवर भाजप कार्यकर्त्याच्या हत्येचा आरोप करण्यात आला आहे.  (Political violence in West Bengal, BJP worker again beaten to death, allegations against TMC for lynching death)

कालची घटना पूर्व मेदिनीपूरच्या बासुदेव बेरिया भागात घडली. भास्कर बेरा नावाच्या स्थानिक भाजप कार्यकर्त्याला तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी जंगलात नेले आणि काठीने बेदम मारहाण केली, असा आरोप केला जातोय. भाजपचे जिल्हाध्यक्ष चंदन मैती यांनी मोहम्मदपूर येथे दिवंगत नेत्याच्या कुटुंबासोबत उभे राहून दोषींना अटक करण्याची मागणी केली.

काही दिवसांपूर्वी उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इटाहारमधील राजग्राम गावात भाजपचे युवा नेते मिथुन घोष यांची काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरासमोर गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येमागे तृणमूल काँग्रेसच्या समाजकंटकांचा हात असल्याचा आरोप भाजपने केला होता. मात्र, तृणमूल काँग्रेसने हा आरोप फेटाळून लावला आहे.

“तृणमूलने खुनाच्या राजकारणात विश्वास ठेवत नाही”

तृणमूल काँग्रेसचा खुनाच्या राजकारणात विश्वास ठेवत नाही, असं तृणमूल नेते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला समाजात शांतता आणि एकोपा प्रस्थापित करण्याच्या सूचना दिल्या असून त्यांच्या सूचनांचे पालन करतो. लोकांनी आम्हाला मतदान केले आहे, त्यांचा विश्वास जिंकणे हे आमचे कर्तव्य आहे. लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी आम्हाला लोकांना मारण्याची गरज नाही. भाजप नेहमीच इतरांना दोष देते.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या घटनांचा सीबीआय (CBI) तपास करत आहे. या प्रकरणी आतापर्यंत तीन डझनाहून अधिक गुन्हे दाखल झाले असून, हायकोर्टात स्टेटस रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने याप्रकरणी सीबीआयला पुन्हा अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत.

हे ही वाचा-

गडचिरोलीमध्ये 26 नक्षलवादी ठार; वळसे पाटलांनी केले पोलिसांचे कौतुक, पहा काय म्हणाले गृहमंत्री?

MP: पंतप्रधान मोदींच्या स्वागतापूर्वी राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह 110 मंत्री, आमदारांचा RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य

राजकारण पेटलेः 93 च्या दंगलीत बाळासाहेबांचा पुढाकार नसता तर मुंबईत हिंदू जिवंत नसता, आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार बोलणार नाहीत का, चंद्रकांत पाटलांचा सवाल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.