G20 Summit मध्ये दिसणार UPI ची ताकद, पाहुण्यांना वॉलेटमध्ये दिले जाणार 1000 रुपये

G-20 Summit 2023 : भारतात येणाऱ्या पाहुण्यांना सरकार एक हजार रुपये खर्च करण्यासाठी देणार आहे. यूपीआयच्या माध्यमातून त्यांना ते पैसे खर्च करता येणार आहे.

G20 Summit मध्ये दिसणार UPI ची ताकद, पाहुण्यांना वॉलेटमध्ये दिले जाणार 1000 रुपये
Follow us
| Updated on: Sep 07, 2023 | 12:24 PM

G20 India Summit : G20 परिषदेसाठी अनेक मोठ्या देशांचे नेते आणि अधिकारी भारतात येत आहे. त्यांच्यासोबत शिष्टमंडळ आणि इतर अनेक लोकही दिल्लीत पोहोचले आहेत. आता जेव्हा हे लोक दिल्लीत फिरायला जातील तेव्हा ते UPI द्वारे पेमेंट सहज करू शकतील. जसे सामान्य भारतीय प्रत्येक लहान-मोठ्या खरेदीसाठी या डिजिटल पेमेंट सोल्यूशनचा वापर करतात. यासाठी त्यांना सरकारकडून UPI ​​वॉलेटमध्ये 1,000 रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाणार आहे.

UPI ने देशामध्ये कॅशलेस व्यवहारात खूप वेगाने बदल केला आहे. ऑगस्ट महिन्यात UPI च्या माध्यमातून देशात 10 अब्जाहून अधिक व्यवहार झाले आहेत. आता भारत सरकारला हे डिजिटल पेमेंट सोल्यूशन एक जागतिक साधन बनवायचे आहे. त्यामुळे, त्याला G20 च्या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. त्यामुळे सुमारे 1,000 परदेशी पाहुण्यांना UPI चा अनुभव घेण्याची संधी मिळेल.

एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, UPI चा अनुभव घेण्यासाठी सरकार परदेशी प्रतिनिधींना आणि सहभागींना त्यांच्या वॉलेटमध्ये 500 ते 1000 रुपयांची प्रारंभिक शिल्लक देईल. हे सर्व लोक त्यांच्या फोनवरून वेगवेगळ्या ठिकाणी UPI पेमेंट करू शकतील. UPI ला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने या उपक्रमासाठी 10 लाख रुपयांचे बजेट ठेवले आहे.भा

भारताने UPI विकसित केले आहे. किरकोळ पेमेंटच्या बाबतीत याने अनेक विक्रम केले आहेत. आता भारताची इच्छा आहे की जगातील इतर देश देखील या फिनटेक सोल्यूशनचा भाग बनू शकतात.

UPI अनेक देशांमध्ये लोकप्रिय

भारतात यशस्वी झाल्यानंतर UPI आता परदेशातही पोहोचत आहे. श्रीलंका, फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती आणि सिंगापूर यांनी UPI च्या वापरासाठी भारतासोबत करार केला आहे. हे सर्व देश स्वस्त, सुलभ आणि सोपे पेमेंट टूल वापरण्यास उत्सुक आहेत. दुसरीकडे, या वर्षाच्या सुरुवातीला अर्थ मंत्रालयाने परदेशातून भारतात येणाऱ्या पर्यटकांना UPI पेमेंट करण्याची परवानगी दिली आहे. ते भारतातील प्रवासादरम्यान UPI ने ​​पेमेंट करू शकतात.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.