मुस्लीम शासकांच्या काळातील अपवित्र नावं बदलणार; प्रज्ञासिंह ठाकूर यांचा नामांतराला पाठिंबा

मुस्लीम प्रशासकांच्या काळातील सर्व अपवित्र नावं आम्ही बदलणार आहोत," असं प्रज्ञासिंह ठाकूर त्यांनी म्हटंलय. (Pragya singh Thakur name changing)

मुस्लीम शासकांच्या काळातील अपवित्र नावं बदलणार; प्रज्ञासिंह ठाकूर यांचा नामांतराला पाठिंबा
प्रज्ञासिंह ठाकूर
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 11:29 AM

भोपाळ : आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेत असलेल्या भोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Pragya singh Thakur) नामांतराच्या मुद्द्यावरुन चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. “मुस्लीम प्रशासकांच्या काळातील सर्व अपवित्र नावं आम्ही बदलणार आहोत,” अस त्यांनी म्हटंलय. त्या भोपाळमध्ये एका कार्यक्रमात बोलत होत्या. (Pragya singh Thakur said that we will change the name of Controversial places)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यानंतर आता भाजपचे अनेक नेते नामकरणाला जाहीरपणे पाठिंबा देत आहेत. मध्य प्रदेशमधील नेत्यांनी भोपाळमधील अनेक पर्यटनस्थळांचे नामांतर करण्याची मागणी केली आहे. प्रज्ञासिंह ठाकूर यांनीसुद्धा मुस्लीम प्रशासकांच्या काळातील काही नावं अपवित्र असल्याचं म्हटलं आहे. तसेच, त्यांच्या काळातील सर्व वादग्रस्त नावं बदलणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

उमा भारती यांच्या प्रस्तावाला पाठिंबा

भाजप नेत्या उमा भारती यांनी उत्तर प्रदेशच्या भोपाळमधील हलाली डॅमचं नाव बदलण्याची मागणी केली होती. या मागणीला घेऊन त्यांनी बैरसियाचे भाजप आमदार विष्णु खत्री यांना एक पत्र लिहलं होतं. या पत्रात त्यांनी उत्तर प्रदेशच्या पर्यटन आणि संस्कृती मंत्र्यांशी चर्चा करुन हलाली डॅमचं नाव बदलण्यास कारवाई करण्याची विनंती केली होती. हलाली डॅमचा परिसर आणि या जागेला दिलेल्या नावामुळे विश्वासघात झाल्याची आठवण होते असे उमा भारती म्हणाल्या होत्या. उमा भारती यांच्या या मागणीला प्रज्ञासिंह ठाकूर यांनी  पाठिंबा दिला आहे.

हलालपुरा बस स्टॅण्ड, लालघाडी, इस्लामनगरची नावं बदला

प्रज्ञा ठाकूर यांनी उमा भारती यांच्या हलाली डॅमच्या नामांतरला पाठिंबा दिला आहे. तसेच त्यांनी हलालपुरा बसस्थानक, लालघाडी आणि इस्लाम नगर या भागांची नावंसुद्धा बदलावीत अशी मागणी केली आहे. ही नावं मुस्लीम शासकांच्या अत्याचाराची आणि दहशतीची निशाणी आहेत. त्यामुळे त्यांना बदलण्यात यावं आणि या ठिकाणांना क्रांतीकारकांची नावं द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, नामांतराचे समर्थन करताना, एखाद्या जागेल्या कुणाचे नाव दिल्यास त्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव जनतेवर पडतो. लालघाटी येथे राणीच्या मुलांची हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर हा घाट लाल झाला होता. याच कारणामुळे या जागेचं नाव लालघाटी ठेवण्यात आलेलं आहे. भोपाळमधील काही ठिकाणांच्या नावामागील इतिहास खूपच अपवित्र आहे. त्यामुळे मुस्लीम प्रशासकांच्या काळात रक्तरंजित इतिहास असणाऱ्या सर्व ठिकाणांची नावं आम्ही बदलणार आहोत, असं प्रज्ञासिंग ठाकूर म्हणाल्या.

संबंधित बातम्या :

साध्वी प्रज्ञा आता ‘शूद्रांवर’ घसरल्या, नव्या वादाला तोंड फुटलं

Pragya Thakur | खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भर कार्यक्रमात भोवळ

प्रज्ञा सिंह यांनी स्वतःची शूद्र म्हणून कायदेशीर नोंद करावी, सचिन खरात यांचे आव्हान

(Pragya singh Thakur said that we will change the name of Controversial places)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.