Goa CM Pramod Sawant : गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा प्रमोद सावंत, विश्वजीत राणेंनीच मांडला प्रस्ताव!
गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांची नियुक्ती करण्यात आलीय. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) भाजपनं दमदार विजय मिळवल्यानंतर गोव्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण असा सवाल विचारला जात होता. त्यातच विश्वजीत राणे (Vishwajit Rane) यांनी काही काळ यात रंगत निर्माण केली होती. मात्र, आता गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांची नियुक्ती करण्यात आलीय. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मुख्यमंत्री निवडीसाठी पर्यवेक्षक म्हणून आलेले भाजप नेते नरेंद्र सिंह तोमर यांनी प्रमोद सावंत यांच्या नावाची घोषणा केली. त्यावेळी भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते.
गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंतांच्या नावाची घोषणा
Live from BJP Headquarters – Panaji https://t.co/2g1naDBtYY
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) March 21, 2022
विश्वजीत राणेंकडून सावंतांच्या नावाचा प्रस्ताव
महत्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरु असताना विश्वजीत राणे यांनीही आपली दावेदारी केल्याने मुख्यमंत्रीपदाचा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे निकालाला दहा दिवस उलटून गेले तरी गोव्यात भाजपला सरकार स्थापन करता आलेलं नाही. या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सावंत आणि राणे यांना दिल्लीला बोलावून घेतलं होतं. या दोन्ही नेत्यांनी सावंत आणि राणेंशी मॅरेथॉन चर्चा केल्यानंतर आज अखेर सावंत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे विश्वजीत राणे यांनीच आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सावंत यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि तो एकमतानं मंजूर करण्यात आल्याचं नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलं.
सावंतांनी मोदी, शाहांचे मानले आभार
I want to thank PM Narendra Modi and Union HM Amit Shah to have given me the opportunity to work as the CM of Goa for next 5 years. I am glad that the people of Goa have accepted me. I’ll do everything possible to work for development of the state: Goa CM-designate Pramod Sawant pic.twitter.com/QJDFNbRK1U
— ANI (@ANI) March 21, 2022
कोण आहेत डॉ. प्रमोद सावंत?
- माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याची मुख्यमंत्री राहिलेल्या मनोहर पर्रिकरांनंतर डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा
- 2019 साली डॉ. प्रमोद सावंत यांच्या पहिल्यांदाच गोव्याचं मुख्यमंत्रीपद आलं
- गोव्याच्या साखळी मतदारसंघातून आमदार
- प्रमोद सावंत आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्यांना डॉक्टर म्हणून काही काळ प्रॅक्टिसही केली आहे.
- डॉ. प्रमोद सावंत पर्रिकर सरकारच्या काळात विधानसभेचे अध्यक्षही राहिलेले आहेत.
- डॉ. प्रमोद सावंत यांची पत्नी सुरक्षणा सावंत याही भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत.
- डॉ. प्रमोद सावंत यांचं वय 48 वर्ष आहे. त्यांचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी झाला.
- महाराष्ट्रातील टिळक विद्यापीठातून डॉ. प्रमोद सावंत यांनी पदवी घेतली आहे.
- डॉ. प्रमोद सावंत हे गोवा राज्याचे चौदावे मुख्यमंत्री आहेत.
इतर बातम्या :