Prashant Kishor : तूर्तास तरी राजकीय पक्ष काढण्याचा कोणताही इरादा नाही! पदयात्रेतून प्रशांत किशोर पुढची दिशा ठरवणार
Prashant Kishor in Bihar : बिहारमध्ये नव्या विचाराची आणि प्रयत्नांची गरज आहे, असं प्रशांत किशोर म्हणाले आहेत.
बिहार : प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी अखेर पाटणामध्ये पत्रकार परिषद घेत आपल्या राजकीय (Bihar Politics) वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. तूर्तास तरी प्रशांत किशोर कोणताही नवा राजकीय पक्ष काढण्याच्या तयारी नाहीत. त्यांनी स्वतःच नव्या राजकीय पक्ष काढण्याच्या चर्चांना पूर्णविराम लावलाय. नवा पक्ष काढण्याऐवजी ते भारतभर फिरुन संपूर्ण राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार आहे. यासोबत ते 17 ते 18 हजार लोकांसोबत आधी चर्चा करतील. ही लोकं कोण आहेत, हे देखील प्रशांत किशोर यांच्या टीमनं निश्चित केलं आहे. लोकांशी चर्चा करण्याच्या निमित्ताने प्रशांत किशोर पदयात्रा करणार आहेत. लोकांशी चर्चा केल्यानंतर प्रशांत किशोर ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान आपली पुढील दिशा ठरवणार आहेत. पाटणा येथील पत्रकार परिषदेमध्ये (Prashant Kishor Press Conference) बोलताना त्यांनी ही माहिती दिली, 2 ऑक्टोबरपासून तीन हजार किलोमीटर पदयात्रेला प्रशांत किशोर सुरुवात करतील. त्यानंतर लोकांशी चर्चा करुन गरज वाटली, तर ते नवा राजकीय पक्ष स्थापन करतील, असंही म्हणालेत. पण ही पार्टी प्रशांत किशोर यांची नसेल, असंही सांगण्यात आलं आहे.
बिहारमध्ये कुणासाठी काम?
बिहारमध्ये नव्या विचाराची आणि प्रयत्नांची गरज आहे, असं प्रशांत किशोर म्हणाले आहेत. बिहारमध्ये पुढचा काही काळ प्रशांत किशोर राहणार आहेत. बिहारमध्ये ते वेगवेगळ्या लोकांच्या गाठीभेटी घेतील. त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. कायदा आणि सुशासनासाठी बिहारमधील लोकांची मतं नेमकी काय आहेत, त्यांना काय अपेक्षित आहे, या समजून घेण्याचा प्रयत्न प्रशांत किसोर यादरम्यानच्या काळात करणार आहेत.
लालू आणि नितीश यांच्यावर निशाणा
प्रशांत किशोर यांनी यावेळी नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला. लालू प्रसाद यादव यांची पंधरा वर्ष तर नितीश कुमार यांनी 17 वर्ष बिहारमध्ये राज्य केलं. लालूंच्या काळात सामाजिक सुव्यवस्था होती, असं सांगितलं जायचं. तर नितीश कुमार यांच्या काळात सुशासन आणि विकास झाल्याचं सांगितलं जातं. जर खरंच असं आहे, तर मग गेल्या 30 वर्षानंतरही बिहार इतका मागासलेला का आहे, असा सवाल प्रशांत किशोर यांनी उपस्थित केलाय. निती आयोगाच्या अहवालात प्रत्येक वेळी बिहास गरीब आणि मागासलेला असल्याचं अधोरेखित होताना पाहायला मिळतं. हे चित्र बदलण्याची गरज असल्याचं मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलंय.