Prashant Kishor: प्रशांत किशोर यांचा काँग्रेससाठी नवा फॉर्म्युला, रोडमॅपमुळे काँग्रेसचे कमबॅक होणार?; वाचा स्पेशल रिपोर्ट

Prashant Kishor: काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या नेत्यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीला प्रशांत किशोरही उपस्थित होते. यावेळी प्रशांत किशोर अर्थात पीके यांनी 2024मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा अॅक्शन प्लान दिला आहे.

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांचा काँग्रेससाठी नवा फॉर्म्युला, रोडमॅपमुळे काँग्रेसचे कमबॅक होणार?; वाचा स्पेशल रिपोर्ट
प्रशांत किशोर यांचा काँग्रेससाठी नवा फॉर्म्युला, रोडमॅपमुळे काँग्रेसचे कमबॅक होणार?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 12:46 AM

नवी दिल्ली: काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या (congress) नेत्यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीला प्रशांत किशोरही उपस्थित होते. यावेळी प्रशांत किशोर  (prashant kishor) अर्थात पीके यांनी 2024मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा अॅक्शन प्लान दिला आहे. यावेळी पीके यांनी काँग्रेस नेत्यांसमोर एक सादरीकरणही दिलं आहे. काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी खुद्द पीके मैदानात उतरणार आहेत. काँग्रेसचं गेलेलं वैभव परत आणण्यासाठीचा हा अॅक्शन प्लान आहे. काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठीचा रोडमॅप प्रशांत किशोर यांनी सादर केल्याने काँग्रेस खरोखरच सत्तेत कमबॅक करेल का? असा सवाल केला जात आहे. पीके यांनी 2014मध्ये भाजपसाठी त्यानंतर तृणमूल काँग्रेससाठी काम केलं होतं. आज हे दोन्ही पक्ष यशस्वी ठरले असून सत्तेत आहेत. त्यामुळे पीके यांचा हा फॉर्म्युला काँग्रेस स्वीकारणार काय? असा प्रश्नही केला जात आहे. पीकेंनी सादर केलेला हा रोडमॅप नक्की काय आहे त्यावर टाकलेला हा प्रकाश.

370 जागांवर फोकस करा

प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेतृत्वाला वास्तववादी फॉर्म्युला दिला आहे. त्यांनी काँग्रेसला 543 ऐवजी निवडक जागांवर फोकस करण्याचा सल्ला दिला आहे. ज्या जागांवर काँग्रेसची स्थिती पूर्वीपासूनच मजबूत आहे. त्याच जागांवर फोकस करण्याचा सल्ला पीकेंनी दिला आहे. 543 जागांपैकी 365 ते 370 जागांवर उमेदवार देण्याचा सल्ला पीकेंनी दिला आहे. असं केल्यास पक्षाचा फायदाच होईल. तसेच उरलेल्या 173 ते 180 जागा मित्र पक्षांना सोडाव्यात. पीकेंनी काही जागाही निवडल्या आहेत. थेट भाजपशी मुकाबला असणाऱ्या किंवा एनडीएतील घटक पक्षाशी काँग्रेसचा सामना असणाऱ्या या जागा आहेत.

यूपी-बिहार- ओडिशात एकला चलो प्लान

ज्या राज्यात काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. त्याच राज्यात काँग्रेसने अधिक लक्षव केंद्रीत केलं पाहिजे. या राज्यात काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढवल्या पाहिजे. त्यात गुजरात, पंजाब, हिमाचल, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, हरियाणा, दिल्ली आणि उत्तराखंडचा समावेश आहे. या राज्यात काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढवल्या पाहिजेत. त्याशिवाय पक्षाने बिहार, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश आणि ओडिशासारख्या राज्यात स्वबळावर निवडणुका लढवल्या पाहिजेत. त्यामुळे काँग्रेसला या राज्यात आपला जनाधार परत मिळविता येईल, असं पीके यांनी म्हटलं आहे.

बंगाल, महाराष्ट्र आणि तामिळनाडूत आघाडी

ज्या राज्यात प्रादेशिक पक्षांची स्थिती मजबूत आहे, त्या ठिकाणी आघाडी करून निवडणुका लढवल्या पाहिजेत, असा सल्लाही देण्यात आला आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत प्रादेशिक पक्षांचा दबदबा असल्याने या राज्यात काँग्रेसने आघाडी करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत काँग्रेस सत्तेत आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची राष्ट्रवादीसोबत निवडणुकीत आघाडी होती. निवडणुकीनंतर या दोन्ही पक्षांनी शिवसेनेसोबत आघाडी केली. तर तामिळनाडूत काँग्रेसने निवडणुकीआधी आणि नंतरही डीएमके सोबत आघाडी केली होती. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने टीएमसीसोबत आघाडी करावी. डाव्यांसोबत जाऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

विरोधी पक्षांशी समन्वय

यावेळी त्यांनी काँग्रेसला इतर विरोधी पक्षांशी चांगला समन्वय ठेवण्याचा सल्ला दिला आहे. कोणत्याही विरोधी पक्षासोबत काँग्रेसने निवडणूक लढवलीच पाहिजे असं नाही. पण निवडणूक निकालानंतर सर्व पर्याय उघडे ठेवले पाहिजे. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांची एकी झाली पाहिजे. त्या एकीच्या मध्यवर्ती काँग्रेस असला पाहिजे. काँग्रेसने स्वत:ला प्रबळ करून सत्तेत वापसी केली पाहिजे. काँग्रेसने सत्ता मिळवल्यास इतर प्रादेशिक पक्ष त्यांच्यासोबत येतील. प्रादेशिक पक्षांना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी आगामी लोकसभा आणि सहा राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगली कामगिरी करावी लागेल. त्याशिवाय जे पक्ष एनडीएमध्ये नाहीत त्यांच्याशीही काँग्रेसने समन्वय ठेवायला हवा. केसीआर, जगनमोहन रेड्डी आणि बीजेडी सारख्या पक्षांचा त्यात समावेश आहे.

काऊंटर विचारधारा हवी

भाजप नेहमीच राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर आक्रमक असतो. त्यामुळे भाजपला काऊंटर करण्यासाठीचा आराखडाही पीकेंनी काँग्रेसला दिला आहे. भाजपला पराभूत करायचे असेल तर काँग्रेसकडे एक मजबूत विचारधारा हवी. भाजपच्या अति राष्ट्रवादाला छेद देणारी ही विचारधारा असावी, असं पीकेंनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भाजपवर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्याऐवजी किंवा टीका करण्याऐवजी काँग्रेसने राष्ट्रवादाची स्वतंत्र परिभाषा तयार केली पाहिजे. जेणेकरून भाजपकडून कोणतीही कोंडी होणार नाही.

भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही काऊंटर प्लान तयार केला जात आहे. हिंदुत्वाच्या नावावर केवळ पन्नास टक्के लोक भाजपच्यासोबत आहे. तर उरलेले 50 टक्के लोक भाजपच्या सोबत नाहीये. त्यांना आपल्यासोबत आणण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले पाहिजे. काँग्रेसची छवी हिंदूविरोधी पक्ष अशी झाली आहे. ही प्रतिमा तोडण्याचं काम केलं पाहिजे. भाजपच्या विरोधात लढण्यासाठी सर्व लोकशाही धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र आलं पाहिजे. काँग्रेस खऱ्या अर्थाने ही ताकद आहे. अनेक पराभव होऊन सुद्धा काँग्रेसच आज राष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहे. त्यामुळे सर्वात जुना असलेला हा पक्षच भाजपला टक्कर देऊ शकतो.

मोदींच्या कल्याणकारी योजनांना पर्याय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणकारी योजनांवर काँग्रेसने आपला स्वतंत्र नॅरेटिव्ह तयार केला पाहिजे. मोदी सरकारच्या स्किमच्या लाभार्थ्यांनी भाजपला सर्वाधिक मतदान केल्याचं दिसून येत आहे. पीएम आवास योजना, उज्ज्वला योजना, शौचालय, जनधन, मुद्रा योजना, किसान सन्मान निधी, फ्रि राशनचा लाभ भाजपला मिळाला आहे. भाजपच्या या प्रचाराला सशक्त पर्याय देण्याची गरज आहे. मोदी सरकार सध्या ज्या कल्याणकारी स्कीम राबवत आहेत. त्यापेक्षा मोठ्या स्किम काँग्रेसला जाहीर कराव्या लागतील, असंही या रोडमॅपमध्ये नमूद केलं आहे.

काँग्रेसच्या संरचनेत बदल

पीकेंच्या रणनीतीनुसार काँग्रेनसे आपली संरचना बदलायला हवी. काँग्रेस फुल टाईम अध्यक्ष असावा, तळागाळापर्यंत संघटन पोहोचवण्यासाठी सक्रिय झालं पाहिजे. ज्या ठिकाणी भाजपशी थेट मुकाबला आहे, अशा राज्यात काँग्रेसने फोकस केला पाहिजे. या राज्यातील मतदार आणि कार्यकर्त्यांना कॅडर बनवण्यावर भर देण्यात आला आहे. या बैठकीनंतर पीके हे गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुका आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत काम करतील हे स्पष्ट झालं आहे.

संबंधित बातम्या:

Prashant Kishor: काँग्रेसने महाराष्ट्रात शिवसेनेसोबत आघाडी ठेवावी की ठेवू नये?; प्रशांत किशोर यांचा काँग्रेस हायकमांडला सल्ला काय?

Uttarakhand : गैरहिंदूंना चार धाम यात्रा करता येणार नाही? सीएम पुष्कर धामी यांचा फतवा!

Abu salem case : गँगस्टर अबू सालेमच्या सुटकेबाबत सरकार 2030 मध्ये विचार करेल, केंद्रीय गृह मंत्रालयाचे सर्वोच्च न्यायालयात उत्तर

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...