Praveen Nettaru : गरज पडल्यास युपीतला “एनकाऊंटर” पॅटर्न कर्नाटकातही, भाजप नेत्याच्या हेत्येनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

गरज पडल्यास कर्नाटकातही योगी मॉडेल लागू केले जाईल, म्हणजेच उत्तर प्रदेशातला एनकाऊंटर पॅटर्न आता कर्नाटकातही येणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

Praveen Nettaru : गरज पडल्यास युपीतला एनकाऊंटर पॅटर्न कर्नाटकातही, भाजप नेत्याच्या हेत्येनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
गरज पडल्यास युपीतला "एनकाऊंटर" पॅटर्न कर्नाटकातही, भाजप नेत्याच्या हेत्येनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधानImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 9:06 PM

कर्नाटक : कर्नाटकातील भाजप नेते प्रवीण नेत्तारू (BJP Pravin Nettaru Murder) यांच्या हत्येनंतरचा गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. या हत्येमुळे पक्षाचे कार्यकर्ते (BJP Leaders) संतप्त झाले असून आपल्याच राज्य सरकारला घेराव घालत आहेत. सीएम बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांच्या कारवाईवर आणि भूमिकेवरही ते समाधानी नाहीत. त्यांना अधिक कडक कारवाई करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या सगळ्या विरोधादरम्यान आता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मोठे वक्तव्य केले आहे. गरज पडल्यास योगी मॉडेल राज्यातही लागू केले जाऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. सीएम योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशातील परिस्थितीला साजेसे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे कर्नाटकात वेगवेगळ्या प्रकारे परिस्थिती हाताळली जाते. गरज पडल्यास कर्नाटकातही योगी मॉडेल लागू केले जाईल, म्हणजेच उत्तर प्रदेशातला एनकाऊंटर पॅटर्न आता कर्नाटकातही येणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

योगींच्या कठोर निर्णयांमुळे साधारणा झाल्याची चर्चा

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की आम्ही आवश्यक ते सर्व पाऊल उचलणार आहोत. जर आपल्याला अधिक कठोर व्हायचे असेल तर आपली पावले डगमगणार नाहीत. सध्या प्रवीण यांच्या हत्येनंतर कर्नाटकात राजकारण तापत आहे. भाजपच्या आमदार-खासदारांनाही विरोध होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपचे जे कार्यकर्ते कर्नाटकात योगी मॉडेलबद्दल बोलले आहेत, ते तिथल्या बुलडोझरच्या राजकारणाने खूप प्रभावित आहेत, त्यांना विकास दुबेचा एन्काउंटरही आठवतो. या सर्व घटनानंतर योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा कठोर प्रशासक म्हणून अशीच तयार झाली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या कठोर बाण्यामुळेच तिथला कायदा आणि सुव्यवस्था सुधारल्याचेही सांगण्यात येत आहे.

भाजप नेत्यांना हवं उत्तर प्रदेश मॉडेल

आता कर्नाटकातील भाजप नेत्यांनाही असाच आदर्श हवा आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. योगी मॉडेलपेक्षा कठोर निर्णय घ्यावा लागला तर ते घ्यायला मागेपुढे पाहणार नाहीत, असेही ते सांगत आहेत.

कशी झाली हत्या?

कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात मंगळवारी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव प्रवीण नेत्तारू यांची निर्घृण हत्या करण्यात आली. दिवसभर काम केल्यानंतर प्रवीण हे दुकान बंद करून घरी परतत असताना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. तपासादरम्यान प्रवीण य़ांनी कन्हैया लाल यांच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला. या हत्येत पीएफआयचे कनेक्शनही समोर येत आहे. राज्यात पीएफआयवर बंदी घालण्याची मागणी होत आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.