13 वर्षांपासून मौन, 10 फूट खोल खड्ड्यात तपश्चर्या, मौनी बाबांनी महाकुंभात भू-समाधी का घेतली?
Mauni Baba Mahakumh: महाकुंभमेळ्यात परमहंस पीठाधीश्वर शिवयोगी ऊर्फ मौनी बाबा यांनी 57 वी भूसमाधी घेतली. चेंगराचेंगरीसारखी दुसरी घटना पुन्हा घडू नये, या इच्छेसाठीच मौनी बाबांनी भू-समाधी घेतली. महाराज शिवयोगी 13 वर्षांपासून मौन पाळत आहेत. म्हणून लोक त्यांना मौनी महाराज या नावाने हाक मारतात.

Mauni Baba Mahakumh: आज आम्ही तुम्हाला एका अशा बाबांविषयी माहिती सांगणार आहोत, जे महाराज 13 वर्षांपासून मौन पाळत आहेत. भू-समाधीच्या माध्यमातून महाकुंभात पुन्हा अशी दु:खद घटना घडू नये, अशी त्यांची इच्छा आहे. या बाबांनी महाकुंभ परिसरातील सेक्टर-6 मधील आपल्या छावणीत त्यांनी समाधी घेतली आहे. हे बाबा नेमके कोण आहेत, याविषयी पुढे विस्ताराने जाणून घेऊया. तसेच त्यांच्याविषयी तुम्हाला अनेक आश्चर्यकारक गोष्टी कळू शकतील. पुढे विस्ताराने वाचा.
मौनी अमावास्येला प्रयागराज महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने दु:खी झालेल्या परमहंस पीठाधीश्वर शिवयोगी मौनी महाराज यांनी भूसमाधी घेतली आहे. शिवयोगी मौनी महाराज यांनी ही भूसमाधी 10 फूट खोल खड्ड्यात 3 तास घेतली. भूमी समाधी पूर्वी मौनी बाबांनी विधिवत पूजा केली.
मौनी बाबांनी शुक्रवारी रात्री भू-समाधी घेतली. त्यांनी आतापर्यंत 55 हून अधिक वेळा भूसमाधी घेतली आहे. त्यांचे हे 57 वे समाधी स्थळ आहे. मौनी बाबा म्हणाले की, प्रयागराज महाकुंभाच्या घटनेने ते खूप व्यथित झाले आहेत. भू-समाधीच्या माध्यमातून महाकुंभात पुन्हा अशी दु:खद घटना घडू नये, अशी त्यांची इच्छा आहे. महाकुंभात जगभरातून लोक येत आहेत. कुणालाही त्रास होऊ नये म्हणून मी पृथ्वीच्या आत तपश्चर्या करीन, असं ते म्हणालेत.
महाकुंभ परिसरातील सेक्टर-6 मधील आपल्या छावणीत त्यांनी समाधी घेतली आहे. मौनी बाबांच्या छावणीत रुद्राक्षाच्या माळांच्या माध्यमातून द्वादश ज्योतिर्लिंगाचे रूप तयार करण्यात आले आहे. महाकुंभात प्रथमच मौनी बाबांनी 7 कोटी 51 लाख रुद्राक्ष रत्नांसह 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना केली आहे. प्रत्येक ज्योतिर्लिंग 11 फूट उंच, 9 फूट रुंद आणि 7 फूट जाड आहे.
13 वर्ष मौन व्रतावर
महाराज शिवयोगी 13 वर्षांपासून गप्प आहेत, म्हणून लोक त्यांना मौनी महाराज या नावाने हाक मारतात. प्रतापगडच्या पट्टी भागात त्यांचा जन्म झाला. येथेच शिक्षण झाले. त्यानंतर उदरनिर्वाहासाठी ते मुंबईला गेले. मग संसारिक जीवनापासून वैतागून त्यांनी संन्यास घेतला.
1989 मध्ये मौन पाळले
मौनी महाराज अमेठीतील बाबूगंज येथील सागरा आश्रमाचे प्रमुख आहेत. 1989 मध्ये महाराजांनी राष्ट्रकल्याणाच्या भावनेने आणि भगवान शंकराचे दर्शन घेण्याच्या इच्छेने मौन पाळले. भगवान शंकराच्या मौन आणि पूजेची प्रक्रिया 2002 पर्यंत सुरू होती. तेव्हापासून सर्वजण त्यांना मौनी महाराज या नावाने ओळखू लागले.