Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेमानंद महाराज यांच्या पदयात्रेला विरोध पडला महागात, भक्तांनी घेतला गांधीगिरीने असा बदला, थेट साष्टांग दंडवत करत मागितली माफी

Premanand Maharaj Padyatra Controversy: प्रेमानंद महाराज यांच्या पदयात्रेस विरोध करणाऱ्या लोकांच्या विरोधात वृंदावनमधील लोकांनी मोर्चा उघडला. त्यांनी आपल्या दुकानांच्या समोर एक बोर्ड लावला. त्या बोर्डावर एनआरआय ग्रीन सोसायटीच्या सदस्यांना सामान मिळणार नसल्याचे म्हटले.

प्रेमानंद महाराज यांच्या पदयात्रेला विरोध पडला महागात, भक्तांनी घेतला गांधीगिरीने असा बदला, थेट साष्टांग दंडवत करत मागितली माफी
Follow us
| Updated on: Feb 17, 2025 | 1:51 PM

Premanand Maharaj Padyatra Controversy: वृंदावनमधील प्रस‍िद्ध संत प्रेमानंद महाराज यांचे देशात नाही तर विदेशातही भक्त आहेत. बॉलीवूडमधील कलाकार असो की उद्योजक त्यांच्या दर्शनासाठी येत असतात. प्रेमानंद महाराज रोज वृंदावनमधील छटीकरा रोड असलेल्या श्रीकृष्ण शरणम निवासस्थापासून श्री राधाकेली कुंजपर्यंत पदयात्रा काढत होते. त्यांच्या या पदयात्रेस एनआरआय ग्रीन सोसायटीमधील काही जणांनी विरोध केला. पदयात्रेमुळे लोकांना त्रास होत असल्याचे एनआरआय ग्रीन सोसायटीने म्हटले. त्यानंतर प्रेमानंद महाराजांनी पदयात्रा स्थगित केली. त्यानंतर वृंदावनमधील प्रेमानंद महाराजांच्या भक्तींनी एनआरआय ग्रीन सोसायटीच्या लोकांना गांधीगिरीच्या मार्गातून धडा शिकवला.

लोकांनी शिकवला धडा

प्रेमानंद महाराज यांच्या पदयात्रेस विरोध करणाऱ्या लोकांच्या विरोधात वृंदावनमधील लोकांनी मोर्चा उघडला. त्यांनी आपल्या दुकानांच्या समोर एक बोर्ड लावला. त्या बोर्डावर एनआरआय ग्रीन सोसायटीच्या सदस्यांना सामान मिळणार नसल्याचे म्हटले. एनआरआय ग्रीन सोसायटीच्या विरोधात संपूर्ण वृंदावनमध्ये विरोध वाढू लागला. लोकांचा हा विरोध पाहून सोसायटीचे अध्यक्ष प्रेमानंद महाराजांना शरण आले. त्यांनी साष्टांग दंडवत घालत माफी मागितली. काही काही युट्युबरच्या प्रभावाखाली येऊन विरोध केला. आता आम्हाला खूप पश्चातापही होत आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले प्रेमानंद महाराज?

प्रेमानंद महाराज यांनी सांगितले की, आम्ही कोणाच्या विरोधात नाही. आमचे काम सर्वांना सुखी करणे हे आहे. आमच्या पदयात्रेमुळे कोणाला त्रास होत आहे, हे समजल्यावर त्या मार्गावरुन पदयात्रा स्थगित केली. मार्ग बदलला. सोसायटीचे अध्यक्ष माफी मागू इच्छिता. पण त्यांना समोर येण्याचे धाडस होत नाही? या प्रश्नावर संत प्रेमानंद महाराज म्हणाले, अरे नाही, नक्की या. त्या लोकांपर्यंतही आमची प्रार्थना पोहोचवा. आम्ही तुमचे कधीही नुकसान करू शकत नाही. सर्वांना आनंद देण्यासाठी आम्ही आलो आहोत. आम्ही कोणाला विरोध करू शकत नाही.

Premanand Maharaj Padyatra Controversy

संत प्रेमानंद महाराज यांची प्रकृती अस्वस्थ्य असल्याने आणि मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने पदयात्रा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली होती. त्यानंतर पदयात्रेची वेळ बदलून पदयात्रेचा मार्ग बदलला होता.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.