VIDEO: संत ज्ञानेश्वरांपासून ते गांधीजींपर्यंत अनेकांवर रामानुजाचार्यांच्या विचारांचा प्रभाव: राष्ट्रपती रामनाथ कोविंद

शंभर वर्षांपूर्वी संत रामानुजाचार्य यांनी दिलेली समतेची शिकवण आजही लागू पडते. संत रामानुजाचार्य शंभर वर्षाहून अधिककाळ जगले. या काळात समतेची पेरणी करण्यासाठी ते हैदराबादपासून उत्तर भारतापर्यंत आणि उत्तर भारतापासून पंजाब ते नेपाळपर्यंत प्रवास केला.

VIDEO: संत ज्ञानेश्वरांपासून ते गांधीजींपर्यंत अनेकांवर रामानुजाचार्यांच्या विचारांचा प्रभाव: राष्ट्रपती रामनाथ कोविंद
संत ज्ञानेश्वरांपासून ते गांधीजींपर्यंत अनेकांवर रामानुजाचार्यांच्या विचारांचा प्रभाव: राष्ट्रपती रामनाथ कोविंद
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 5:33 PM

हैदराबाद: शंभर वर्षांपूर्वी संत रामानुजाचार्य (Sant Ramanujacharya) यांनी दिलेली समतेची शिकवण आजही लागू पडते. संत रामानुजाचार्य शंभर वर्षाहून अधिककाळ जगले. या काळात समतेची पेरणी करण्यासाठी ते हैदराबादपासून (hyderabad) उत्तर भारतापर्यंत आणि उत्तर भारतापासून पंजाब ते नेपाळपर्यंत प्रवास केला, असं सांगतानाच आसामच्या शंकरदेवांपासून ते संत ज्ञानेश्वरांपर्यंत आणि गुरु नानकांपासून महात्मा गांधींपर्यंत अनेकांवर रामानुजाचार्यांच्या शिकवणीचा प्रभाव होता, असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांनी केलं. राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते रामानुजाचार्य यांच्या सोन्याच्या पुतळ्याचे अनावर्ण करण्यात आलं. त्यानंतर झालेल्या समारंभात त्यांनी हे प्रतिपादन केलं. भारताच्या गौरवशाही इतिहासात भक्ती आणि समानतेचे वाहक म्हणून रामानुजाचार्य यांच्याकडे पाहिलं जातं. रामानुजाचार्यांची ही भूमी भक्ती भूमी आहे. समता भूमी आहे. तसेच भारताची संस्कार भूमी असून द्वैत भूमीही आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

रामानुजाचार्य 100 हून अधिक वर्ष जगले. त्यांनी लोकांमध्ये समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी श्रीरंगम, कांचीपूरम, तिरुपती, जगन्नाथ पुरी, ब्रदीनाथ, वाराणासी, मथुरा, काशी, अयोध्या, गया आणि नेपाळच्या मुक्तीनाथपर्यंत प्रवास केला. त्यांचं तत्त्वज्ञान आजही लागू होतं. ते कालातीत आहे. त्यांनी अलवारच्या संतपरंपरेला बौद्धिक आधार दिला. अलवार संत हे मागास जातीत जन्मले होते. त्यांनी या संतांच्या वचनांना वेदप्रमाणे प्रतिष्ठा दिली. भक्ती सर्व जातीभेदापेक्षावर आहे. देवाची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे. ईश्वराच्या भक्तीसाठी पुजाऱ्याची गरज नाही, असं त्यांनी ठासून सांगितलं. त्यांनी भक्तीद्वारेच मुक्तीचा मार्ग दाखवला, असं राष्ट्रपती कोविंद म्हणाले.

अंबडवे आणि रामनगर माझ्यासाठी तिर्थस्थळ

आपल्या परंपरेत समता भावालाच ज्ञानाचं मुख्य केंद्र मानलं आहे. समदर्शी होणं ही रामानुजाचार्यांची विशेषता होती. काल मी महाराष्ट्रात होतो. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजोळी होतो. आज या पवित्र कार्यक्रमाला आहे. बाबासाहेबांच्या कुटुंबाने कबीरपंथाचा स्वीकार केला होता. त्यांचं गाव अंबडवे. तर रामानुजाचार्यांच्या स्थळाचं नाव रामनगर आहे. समतेवर आधारीत भक्तीच्या आदर्शाचं स्मरण करून देणारी ही दोन्ही स्थळं माझ्यासाठी पवित्र तिर्थस्थळच आहे, असं त्यांनी सांगितलं.

गांधींवर प्रभाव

गांधीजींवर रामानुजाचार्यांचा प्रभाव होता. 1923 मध्ये तुरुंगात असताना गांधीजींनी रामानुजाचार्यांच्या पुस्तकाचा अभ्यास केला होता. आसाममधील शंकरदेवांपासून ज्ञानेश्वरांपर्यंत ते गुरु नानाकांवरही रामानुजाचार्यांचा प्रभाव होता. विवेकानंद यांनीही रामानुजाचार्यांची शिकवण अंगिकारण्यास सांगितलं आहे, असं सांगतानाच आज संविधान आपल्या व्यवस्थेचा आधार आहे. पूर्वी मंदिर आणि मठाकडे संस्कृती होती. तेव्हाही रामानुजाचार्यांनी त्यात जनतेचा सहभाग करून घेतला, असं त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

Valentine Day : मध्य प्रदेशात शिवसेना कार्यकर्त्यांचा प्रेमवीरांना इशारा! ‘कुछ करते दिखे बाबू-सोना, तर तोड देंगे शरीर का कोना-कोना’

Hijab Row: इंशा अल्लाह! एक दिवस एक हिजाबी पंतप्रधान होईल; ओवैसी

Goa Election 2022 : गोव्याच्या विधानसभेसाठी उद्या मतदान, 40 जागांसाठी भाजप, काँग्रेससह राजकीय पक्षांनी लावला जोर

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.