Ramnath Kovind: राष्ट्रपती कोविंद बांग्लादेशच्या दौऱ्यावर, ‘विजय दिवस’ सोहळ्यात विशेष निमंत्रित

राष्ट्रपतींच्या तीन दिवसीय दौऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती कोविंद यांच्या यात्रेदरम्यान द्विपक्षीय संबंधावर चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतींसोबत त्यांची पत्नी, मुलगी तसेच वरिष्ठ अधिकारी दौऱ्यात सहभागी आहेत.

Ramnath Kovind: राष्ट्रपती कोविंद बांग्लादेशच्या दौऱ्यावर, ‘विजय दिवस’ सोहळ्यात विशेष निमंत्रित
राष्ट्रपती कोविंद बांग्लादेशच्या दौऱ्यावर
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 8:07 PM

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद तीन दिवसांच्या बांग्लादेशच्या दौऱ्यावर आहेत. बांग्लादेशची राजधानी ढाकामध्ये आयोजित 50 व्या विजय दिवस सोहळ्याला राष्ट्रपती हजेरी लावणार आहेत. राष्ट्रपतींच्या तीन दिवसीय दौऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती कोविंद यांच्या यात्रेदरम्यान द्विपक्षीय संबंधावर चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतींसोबत त्यांची पत्नी, मुलगी तसेच वरिष्ठ अधिकारी दौऱ्यात सहभागी आहेत.

राष्ट्रपतींचा कार्यक्रम दृष्टीक्षेपात

• हजरत शाहजाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन • राष्ट्रपती कोविंद यांना बांग्लादेशच्या तिन्ही सैन्यदलाकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ • राष्ट्रीय स्मारकाला भेट, पुष्पचक्र अर्पण • बांग्लादेशचे जनक शेख रहमान यांच्या स्मारकाला भेट • बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीनांसोबत वार्तालाप • काली मंदिराच्या पुनर्निर्माण कामाचे लोकार्पण

तिन्ही दलांचा ‘गार्ड ऑफ ऑनर’

बांग्लादेशचे राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल हमीद यांनी ढाक्याच्या हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रपती कोविंद यांचे स्वागत केले. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वागतावेळी बांग्लादेश सैन्याच्या तिन्ही दलाच्या जवानांनी गार्ड ऑफ ऑनर दिला. राष्ट्रपतींचा ताफा राजधानी ढाक्याच्या नजीक स्थित राष्ट्रीय स्मारकाच्या दिशेने मार्गस्थ झाला. बांग्लादेश मुक्ती संग्रामात धारातीर्थी पडलेल्या शहीदांना पुष्पचक्र अर्पण करणार आहेत. बांग्लादेशचे जनक शेख मुजीबुर रहमान यांच्या स्मारकाला भेट देण्याचा कार्यक्रम राष्ट्रपतींच्या दौऱ्यात समाविष्ट आहेत.

पंतप्रधानांसोबत वार्तालाप

बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत राष्ट्रपती कोविंद द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. राष्ट्रपती कोविंद यांच्या भेटीप्रित्यर्थ आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमातही पंतप्रधान शेख हसीना सहभागी होणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद भेटीच्या प्रित्यर्थ बांग्लादेशच्या राष्ट्रपतींना भेट देणार आहेत.बांग्लादेश युद्धात वापरण्यात आलेले रशिया निर्मित टी-55 टँक आणि मिग- 21 विमानांची प्रतिकृती भेट देणार आहेत.

काली मंदिराला भेट

राष्ट्रपती कार्यालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रपती कोविंद काली मंदिराला भेट देण्याची शक्यता आहे. राजधानी ढाक्याच्या मध्य भागात स्थित काली मंदिराच्या पुनर्निर्मित कामाचे उद्घाटन व पाहणी राष्ट्रपतींच्या हस्ते केली जाणार आहे.

पाकचे आत्मसमर्पण

1971 मध्ये पाकिस्तानविरोधी लढाईतील विजयाचे प्रतीक म्हणून विजय दिवस साजरा केला जातो. भारतीय सैन्याच्या निकराच्या लढाईत पाकिस्तानने आत्मसमर्पण केले होते आणि भारताच्या सहयोगातून बांग्लादेश स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली.

इतर बातम्या

Pune : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर, दौऱ्यात कोणती मोठी घोषणा?

Harbhajan singh : हरभजन सिंह या पार्टीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा, हर्भजनचा तो फोटो तुफान व्हायरल

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.