माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेवर निवड, राष्ट्रपतींकडून शिफारस
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या शिफारसीनुसार माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई (Former CJI Ranjan Gogoi) यांची राज्यसभेवर निवड झाली आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या शिफारसीनुसार माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई (Former CJI Ranjan Gogoi) यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. राष्ट्रपती नामनिर्देशीतील खासदार म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपतींना राज्यसभेच्या एकूण 12 खासदारांची निवड करण्याचा अधिकार असतो. यापैकी एक जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी राष्ट्रपतींनी रंजन गोगोई यांची निवड केली आहे (Former CJI Ranjan Gogoi).
President Ram Nath Kovind nominates former Chief Justice of India Ranjan Gogoi to the Rajya Sabha. pic.twitter.com/zCDrFCqdou
— ANI (@ANI) March 16, 2020
माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई कोण आहेत?
रंजन गोगोई यांची 3 ऑक्टोबर 2018 रोजी यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते 17 नोव्हेंबर 2019 रोजी निवृत्त झाले.
माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही कर्तव्य बजावले आहे. 2012 नंतर गोगोई यांनी सर्वोच न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहिले.
सरन्यायाधीश बनणारे रंजन गोगोई हे ईशान्य भारतातील पहिली व्यक्ती आणि पहिले आसामी नागरिक आहेत. गोगोई यांचे वडील केशब चंद्र गोगोई हे 1982 साली आसामचे मुख्यमंत्री होते.
12 जानेवारी 2018 रोजी भारताच्या इतिहास पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली. त्या चार न्यायाधीशांमध्ये रंजन गोगोईही होते. न्यायालयातील प्रकरणांच्या वाटपावरुन या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषदेतून खंत व्यक्त केली होती.