लेबनॉनवरील हल्ल्यादरम्यान पंतप्रधान मोदींचा इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना फोन

इस्रायल आणि लेबनॉन या दोन देशांमधील संघर्ष वाढला आहे. कारण लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजुबुल्लाहवर इस्रायलकडून हल्ले सुरु आहेत. हिजबुल्लाहचा प्रमुख देखील इस्रायलने ठार केला आहे, त्यामुळे इस्रायल आणि हिजबुल्लाहमधील संघर्ष वाढलाय. या दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना फोन केला आहे.

लेबनॉनवरील हल्ल्यादरम्यान पंतप्रधान मोदींचा इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना फोन
Follow us
| Updated on: Oct 01, 2024 | 5:32 PM

जगात सध्या इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात संघर्ष सुरु आहे. लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर इस्रायलने हल्ला करत त्याना उद्धवस्त केले आहे. इतकंच नाही तर या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख देखील मारला गेला आहे. त्यानंतर मुस्लीम देश आक्रमक झाले आहे. असं असलं तरी इस्रायलकडून हिजबुल्लाहवर हल्ले सुरुच आहे. या हल्ल्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून ही माहिती दिलीये.

मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले, ‘पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी पश्चिम आशियातील अलीकडच्या घडामोडींवर चर्चा केली. ते म्हणाले की, आपल्या जगात दहशतवादाला स्थान नाही. प्रादेशिक तणाव कमी करणे आणि सर्व ओलिसांची सुरक्षित सुटका सुनिश्चित करणे महत्वाचे आहे. शांतता आणि स्थिरता लवकरात लवकर पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.’

भारत पश्चिम आशियातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. कारण पश्चिम आशियात एक कोटीहून अधिक लोकं राहतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यात पॅलेस्टीनच्या राष्ट्राध्यक्षांची देखील भेट घेतली होती. तेथे अस्थिरता निर्माण झाली तर भारताच्या समस्या देखील वाढू शकतात. अनेकदा भारताला या भागातून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी विशेष मोहीम राबवावी लागते. भारत आपल्या गरजेच्या ६० टक्के तेल या भागातून खरेदी करतो. त्यामुळे या भागात जर अस्थिरता निर्माण झाली तर तेलाच्या किमतींवर परिणाम होतो.

Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.