पंतप्रधानांनी कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले, पण अमेरिकेत मान्यताच नाही, नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह?
covaxin या लसीला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेकडून ( WHO) मान्यता मिळालेली नाही. शिवाय, अमेरिकेच्या अन्न-औषध प्रशासनानेही ही लस स्वीकारलेली नाही.
नवी दिल्ली: पंतप्रधान मोदी ( PM Narendra Modi ) आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन ( Jo Biden ) 24 सप्टेंबरला अमेरिकेची राजधानी वॉग्शिंटन इथं भेटणार आहेत. बायडन सत्तेवर आल्यानंतर ही पहिली वेळ असेल, जेव्हा बायडन आणि मोदी एकमेकांना भेटतील. 22 सप्टेंबरच्या रात्री मोदी अमेरिकेत दाखल होती. व्हाईट हाऊसकडून ( White House ) मोदींच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे. मात्र, या दौऱ्यात अडथळा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला कारण, पंतप्रधान मोदींनी घेतलेली कोव्हॅक्सिनची लस. ( covaxin ) या लसीला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेकडून ( WHO) मान्यता मिळालेली नाही. शिवाय, अमेरिकेच्या अन्न-औषध प्रशासनानेही ही लस स्वीकारलेली नाही. त्यामुळे या दौऱ्यावर आता प्रश्नचिन्हं निर्माण झालं आहे. (Prime Minister Modi’s visit to the US depends on the approval of covaxin WHO )
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा कशासाठी?
अमेरिकेत क्वाड देशांची बैठक होणार आहे. यामध्ये भारत-अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया आणि जापानचे पंतप्रधान सामील होतील. या दौऱ्यात तालिबान, चीन आणि कोरोनावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यानंतर 25 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या सत्राला संबोधित करतील.
मोदींसाठी अमेरिकी दौऱ्यात अडचणी कशा तयार होतील?
ICMR म्हणजेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि भारत बायोटेकने मिळून कोव्हॅक्सिन ही कोरोना लस बनवली. ही संपूर्ण भारतीय बनावटीची लस आहे. या लसीला भारतात आपात्कालिन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने या लसीला अद्याप मान्यता दिलेली नाही. कोव्हॅक्सिनच्या वापराला WHO ने मान्यता द्यावी अशी मागणी वारंवार भारताकडून केली जात आहे. मात्र, WHO मान्यता देण्यास विलंब करत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ज्या लसीला मान्यता दिली आहे, ती लस घेतलेल्यांनाच युरोप वा अमेरिकेत प्रवेश दिला जातो आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौराही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
WHOकडे भारताचा पाठपुरावा
जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हॅक्सिनला मान्यता द्यावी, यासाठी भारताकडून अनेकदा जागतिक आरोग्य संघटनेकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी WHO च्या मुख्य शास्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांची भेट घेऊन चर्चा केली. तर त्याआधीचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर, WHOच्या व्हॅक्सिन विभागाचे संचाल मरिन सिमाओ यांनी भारताशी संपर्क साधला, आणि सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत कोव्हॅक्सिनला मान्यता दिली जाईल असं कळवलं. कोव्हॅक्सिनच्या आपात्कालिन वापराला इराणसह नेपाळ, मेक्सिको,मॉरिशिअस, ब्राझिल, नेपाळ, झिम्बाब्वे, फिलिपिन्स या देशांनी मान्यता दिली आहे.
लवकरच कोव्हॅक्सिनला मान्यता मिळण्याची शक्यता
कोव्हॅक्सिनबाबत जागतिक आरोग्य संघटनेला ट्रायलचा सगळा डेटा पाठवण्यात आला आहे. या डेटावर सध्या आरोग्य संघटनेकडून अभ्यास सुरु आहे. लवकरच जागतिक आरोग्य संघटना सकारात्मक निर्णय घेईल अशी आशा नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी व्यक्त केली.