Mann Ki Baat: ओमिक्रॉनच्या विरोधात कसं लढायचं?, द्विसूत्री काय?; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली ‘मन की बात’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षीच्या शेवटच्या मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओमिक्रॉनपासून बचाव करण्यासाठी देशवासियांना सल्लाही दिला.

Mann Ki Baat: ओमिक्रॉनच्या विरोधात कसं लढायचं?, द्विसूत्री काय?; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली 'मन की बात'
prime minister narendra
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 11:33 AM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षीच्या शेवटच्या मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओमिक्रॉनपासून बचाव करण्यासाठी देशवासियांना सल्लाही दिला. स्वयं सतर्कता आणि शिस्त यामुळेच आपण ओमिक्रॉनवर मात करू शकतो, असा कानमंत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशावासियांना दिला.

‘मन की बात’ चा आज 84 वा कार्यक्रम होता. 2021मधील ही शेवटची मन की बात होती. या मन की बातमधून पंतप्रधानांनी ओमिक्रॉनपासून ते तामिळनाडूतील हेलिकॉप्टर अपघातावरही भाष्य केलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावरही त्यांनी भाष्य केलं. देशात ओमिक्रोन व्हेरिएंट आला आहे. त्याचा अभ्यास आपले संशोधक करत आहेत. या व्हेरिएंटचा रोज नवा डेटा त्यांना मिळत आहेत. त्यावरून संशोधक काही सूचनाही देत आहेत. ओमिक्रॉनविरोधात लढायचं असेल तर स्वयं सतर्कता आणि स्वयं शिस्त या दोन गोष्टीचं पालन करा. हीच ओमिक्रॉन विरोधातील ही मोठी शक्ती आहे. आपली सामूहिक शक्तीच कोरोनाचा पराभव करेल, असं मोदी म्हणाले.

जनशक्तीमुळेच कोरोना पराभूत

आपल्या जनशक्तीमुळेच आपण कोरोनाचा पराभव करू शकलो आहे. जनशक्तीची ताकद आणि सर्वांच्या प्रयत्नामुळेच आपण 100 वर्षात आलेल्या या सर्वात मोठ्या महामारीशी आपण सामना करू शकलो, असं त्यांनी सांगितलं. तसेच नवं वर्ष चांगलं घालवण्यासाठी संकल्प करण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

वरुण सिंग प्रेरणादायी

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूत हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू पावलेले कॅप्टन वरुण सिंग यांचं स्मरण केलं. वरुण सिंग यांना यंदाच शौर्य पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी त्यांनी त्यांच्या शिक्षकाला एक चिठ्ठी लिहिली होती. एवढ्या मोठ्या पदावर पोहोचल्यानंतरही वरुण सिंग आपलं मूळ विसरले नव्हते. त्यांची ही चिठ्ठी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अशीच आहे. एका जरी विद्यार्थ्याला मी प्रेरणा देऊ शकलो तर ही खूप मोठी गोष्ट असेल असं त्यांनी या चिठ्ठीत म्हटलं आहे. मात्र, त्यांनी केवळ एका विद्यार्थ्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला प्रेरित केलं आहे. भलेही पत्रातून ते विद्यार्थ्यांबाबत बोलत असतील, पण त्यांचा हा संदेश आपल्या संपूर्ण समाजासाठी आहे. साधारणपासून असाधारण बनण्याचा त्यांनी जो मंत्र दिला आहे. तो महत्त्वाचा आहे, असं मोदी म्हणाले.

संबंधित बातम्या:

PM Modi Mann ki Baat Live : 100 वर्षातील सर्वात मोठ्या महामारीचा सामना देशानं समर्थपणे केला: नरेंद्र मोदी

केंद्रात मोदींचे सुशासन, राज्यात ठाकरेंचे कुशासन; भाजप नेते जावडेकरांचा हल्लाबोल

काय सांगता ? महाराष्ट्र अग्रिमन अधिनिर्णय प्राधिकरणाच्या निर्णयामुळे शेतकरीही गेले चक्रावून, हळद म्हणे…

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.