रामलल्लाच्या मंचावरून काय होती मोदींची भूमिका?; सरसंघचालक भागवतांचा काय होता हेतू?

राजा राम, हे सर्व समावेशी आहेत. समद्रष्टा आहेत. समष्टिबोध असलेले आहेत. राजा राम कुणालाही कमी लेखत नाही. तो गांधीही आहे आणि संघही आहे. तो साधूतही आहे आणि गृहस्थांमध्येही आहे. जातींना तोडून तो रामज्योतीने लोकांना एका धाग्यात ओवून राजकारणात विजयाचं आणखी एक उत्तरकांड लिहील.

रामलल्लाच्या मंचावरून काय होती मोदींची भूमिका?; सरसंघचालक भागवतांचा काय होता हेतू?
Narendra Modi Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 23, 2024 | 2:08 PM

नवी दिल्ली | 23 जानेवारी 2023 : भारत राममय आहे आणि राम मोदीमय. त्याचं कारण असं की 22 जानेवारीला किंवा त्या आधी जी प्रभू रामाची चर्चा झालीय आणि होत आहे, त्यात मोदी हे सुद्धा केंद्रबिंदू आहेत. रामाचं प्रकट होणं गंगेच्या आगमनासारखं असेल तर मोदी त्याचे भगीरथ आहेत. भगीरथ गंगेला मिळवल्याशिवाय राहत नाही. निरंतर पुढे जात असते… आपल्या लक्ष्याच्या दिशेने. मोदींचा विचार आणि तयारी तशीच आहे. राम मंदिराच्या प्रांगणातून देशाशी संबोधित करताना मोदींनी त्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

मोदींनी आपल्या भाषणात अनेक गोष्टींचा उल्लेख केला. राम वाद नाही, तर सर्व गोष्टींवर उत्तर असणारा नायक आहे. आग नाही, ऊर्जास्त्रोत आहेत, असं मोदी म्हणाले. मोदींनी त्यांच्या भाषणातून तमामा मतदारांना कर्तव्याचा बोध आणि महत्त्व सांगितलं. जातींमध्ये विभागलेल्या देशाला त्याचं महानपण सांगितलं. आपण संकुचित नाही, छोटे नाहीत, असंही स्पष्ट केलं. तर, चंद्रावर जो झेंडा फडकवायचा आहे त्यात हजारो वर्षाची परंपरा आणि संस्कृतीचा बोध आणि अभिमान असायला हवा, असं त्यांनी आजच्या तरुण भारताला सांगितलं. विकासाचे आकडे आणि सामाजिक कल्याणाची गीतावली ऐकवून देशासाठी हेच मंदिर उद्या विकसित भारताचं साक्षीदार होणार असल्याचं म्हटलं आहे. आजच्या काळावर कटाक्ष टाकून हीच भारताची वेळ आहे. हीच योग्य वेळ. हीच योग्य वेळ आहे, असं मोदींनी ठासून सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीला केवळ रामाची प्राण प्रतिष्ठा करताना दिसत नाही. राम मंदिर आणि संप्रदायाला ते प्रतिष्ठा मिळवून देतात. संविधानाच्या पहिल्या प्रतीमधील रामापासून ते राम कसे सर्वांचे आहेत याचा उल्लेख त्यांच्या भाषणातून येतो. मोदी म्हणतात ही प्रतिष्ठा विजयाची नाही, तर विनयाचीही आहे. हा क्षण परिपक्वतेच्या अनुभूतीचा आहे. रामाची प्रतिष्ठा वसुधैव कुटुंबकम आणि विश्वात्माची प्रतिस्थापना आहे. ही प्रतिष्ठा भारतीय संस्कृती, मानवीय मूल्य, आदर्शांचीही प्रतिष्ठा आहे आणि आज जगाला त्याची गरज आहे.

मोदी यांच्या भाषणातील याच सूत्राचं प्रतिबिंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातही दिसलं. भागवत हे मोदींना तपस्वी म्हणतात. मात्र, त्याचवेळी देशालाही तप करण्याची गरज आहे, याचा सल्लाही भागवत देतात. या तपासाठी भागवत हे समन्वय, करुणा आणि संयमाचं व्रत धारण करण्याचं आवाहनही करतात. हे विनाकारण झालेलं नाही. त्यांनी आपल्या भाषणात महात्मा गांधी यांच्या संदेशाचं स्मरण केलं आहे. राम सर्वांचे असल्याचं सांगितलं. समता आणि समरसतेवर भर दिला.

मन की बात

मोदींचे भाषण आणि सरसंघचालकांच्या संदेशाला समजून घेण्यासाठी थोडं मागे जायला हवं. 2014मध्ये मोदी जेव्हा पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून भाजपचं प्रचार अभियान राबवत होते, तेव्हा नारा होता मोदी सरकारचा. एका छोट्या राज्यातून आलेल्या मुख्यमंत्र्याकडे आपलं स्वत:चं एक मॉडेल होतं. त्याच अधारे ते लोकांकडे मतं मागत होते. हे मॉडल रामबाण ठरलं आणि मोदी 2014मध्ये पंतप्रधान झाले. पाच वर्षानंतर म्हणजे 2019मध्ये मोदी पुन्हा विजयी झाले तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, येणारी पाच वर्ष ही भारतीय जनमानसाच्या आकांक्षा आणि स्वप्नांचा काळ असेल.

10 वर्ष सत्तेत राहिलेला पक्ष आणि पीएम मोदी हे म्हणू शकत नाही की, ग्राऊंड लेव्हलला त्यांचे सर्वच प्रयत्न फळाला आले आहेत. गॅस कनेक्शनपासून ते शौचालयांपर्यंत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो की आरोग्यांच्या सुविधा असोत, धान्यापासून ते अंत्योदय असो, वेगाने धावणाऱ्या रेल्वे गाड्या, नवीन विमानतळं, मोठ्या योजना असो वा जागतिक पातळीवरील प्रतिनिधीत्व, सरकारकडे आपल्या कामांची मोठी यादी आहे. देशातील प्रत्येक राज्यात, प्रत्येक कानाकोपऱ्यात, मग तिथे भाजप सत्तेत असो वा नसो मोदींच्या नावाने शिलान्यास झालेले आहेत.

अशा प्रकारे राज्याच्या मॉडेलपासून सुरू झालेल्या या कहानीला आधीच्या पाच वर्षात बेसिक गोष्टी आणि पुढील पाच वर्षांच्या स्वप्नांच्या विस्ताराचा कोट घालण्यात आला आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतून स्वत: सांगितलं की, राम भव्य मंदिरात स्थापित झाले आहेत, आता पुढे काय?… मोदी आणि भागवत याचीच रुपरेषा कालच्या कार्यक्रमात सांगताना दिसत होते.

राम आणि राज्याचा विस्तार

राम प्रतिष्ठापनेतून काम सुरू आहे. विरोधक मात्र घेरलेले आहेत. विरोधक आधीपासूनच विस्कळीत आहेत. त्यांच्यातील सामंजस्य आणि सामर्थ्याचे प्रयत्न म्हणजे वाळूत काढलेल्या किल्ल्यासारखे आहेत. कधी लाट येईल आणि त्यांचा किल्ला उद्ध्वस्त होईल हे सांगता येत नाही. राम नामाच्या पुढे कोणताही दुसरा नॅरेटिव्ह टिकू शकत नाही. मोदी आता हा नॅरेटिव्ह सर्वसमावेशी बनवत आहेत. भागवत यांच्या म्हणण्यालाच दुजोरा देत आहेत.

राम भारताचं विधान आहे, विचार आहे. चेतना आहे, प्रताप आहे. नियती आणि नीतीही आहे, असं मोदी सांगतात. मोदींच्या या विधानाकडे रामराज्याच्या घोषणेच्या रुपात पाहिलं जाऊ शकतं. पण हे लोकभेतील 272 जागांच्या बहुमतापेक्षा अधिक मोठं स्वप्न आहे. दुसऱ्यावेळेपेक्षा मोठं आहे. तिसऱ्यावेळी अधिक ज्यादा जागा मिळाव्यात ही मोदी सरकारची अंतर्निहित भावना आहे. ही भावना सत्यात उतरवणं तितकं सोपं नाही, या भावनेत रामाहून मोठा राजा राम आहे.

राजा राम, हे सर्व समावेशी आहेत. समद्रष्टा आहेत. समष्टिबोध असलेले आहेत. राजा राम कुणालाही कमी लेखत नाही. तो गांधीही आहे आणि संघही आहे. तो साधूतही आहे आणि गृहस्थांमध्येही आहे. जातींना तोडून तो रामज्योतीने लोकांना एका धाग्यात ओवून राजकारणात विजयाचं आणखी एक उत्तरकांड लिहील. राजा राम, मर्यादा पुरुषोत्तम आहेतच, पण विरोधकांच्या कोणत्याही आक्षेपाला निरस्त करण्याचा रामबाण उपायही आहेत.

भाजपासाठी, मोदींसाठी आणि या वर्षी विजयादशमीला शताब्दी वर्षात प्रवेश करणाऱ्या संघासाठी चमत्कारीक आकडा गाठणारा विजय मिळवणं अधिक आवश्यक आहे. प्रभू रामाने देशाचा मूड सेट केलाय. या रामात आता राष्ट्राला जोडायचं आहे. वैश्विक दृष्टीकोण असेल तरच राष्ट्र जोडलं जाईल. इतिहासाच्या गाठी सोडताना अनेक देश इतिहासातील समस्या सोडवताना अधिकच गुरफटून गेलेत. समस्येत अडकलेत, असं मोदी सांगतात. मोदींनी मांडलेला हा दार्शनिक भाव सत्यच आहे. मोदींना या इतिहासातील गाठी तोडायच्या आहेत, सोडायच्या आहेत. तेच भागवत यांनाही करायचं आहे. या गाठी सोडवताना गुरफटलो नाही तर जनतम मोठं होईल. बहुमत मोठं मिळेल.

ही मोदींच्या रामराज्यावर आधारित राजधर्माची रुपरेखा आहे. पुढची निवडणूक याच प्रत्यंचेवरून पार पडणार आहे.

Non Stop LIVE Update
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?.
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?.
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.