कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लसीकरणाबाबत पंतप्रधानांनी बोलावली बैठक, पुढील रणनिती ठरणार

कोरोना लसीकरणाबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 मार्च रोजी महत्वाची बैठक बोलावली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लसीकरणाबाबत पंतप्रधानांनी बोलावली बैठक, पुढील रणनिती ठरणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 10:28 PM

नवी दिल्ली : कोरोनाचा दिवसेंदिवस वाढणारा प्रादुर्भाव आणि कोरोना लसीकरणाबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 मार्च रोजी महत्वाची बैठक बोलावली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. त्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लसीकरणावर चर्चा होणार आहे. ही बैठक 17 मार्च रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.(PM Narendra Modi convened a meeting of all CM on the backdrop of corona)

भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 26 हजार 291 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 कोटी 13 लाख 85 हजार 339 वर पोहोचली आहे. आजच्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 85 दिवसांत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी 20 डिसेंबर रोजी एका दिवसात 26 हजार 624 रुग्ण आढळून आले होते.

24 तासात महाराष्ट्रात 15 हजार 51 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. मागील 24 तासात महाराष्ट्रात एकूण 15 हजार 51 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीय. याशिवाय 10 हजार 671 रुग्ण उपचारानंतर बरे झालेत, तर 48 रुग्णांचा मृत्यू झालाय. यासह राज्यातील एकूण सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 30 हजार 547 इतकी झालीय. राजधानी मुंबईत मागील 24 तासात (15 मार्च सायंकाळी 6 वाजेपर्यंत) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,063 आहे. आजवर बरे झालेले एकूण रुग्ण 3 लाख 18 हजार 642 इतके आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर 92 टक्के आहे. मुंबईत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 14 हजार 582 इतकी आहे. सध्या येथे रुग्ण दुपटीचा दर 165 दिवस आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात आजही 15 हजारांच्या घरात कोरोना रुग्ण सापडलेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नवी नियमावली जाहीर केलीय. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ही नवी नियमावली जारी करण्यात आलीय. नव्या नियमावलीनुसार लग्न सोहळ्यात फक्त 50 लोकांना परवानगी असेल. ही नवी नियमावली 31 मार्च 2021 पर्यंत लागू राहणार आहे.

सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी कायम

सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी कायम आहे. सर्व सिनेमागृह, हॉटेल, रेस्टॉरंट यांना 50 टक्क्यांच्या क्षमतेनं खुली असतील, त्यासाठी राज्य सरकारनं मुभा दिलीय. पण त्यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक नियम पाळावे लागणार आहे. मास्क नसल्यास ग्राहकांना हॉटेलमध्ये प्रवेश मिळणार नाही. तसेच तापमान यंत्राने तपासणी केली असता तापमान प्रमाणापेक्षा जास्त आढळल्यास त्यालाही प्रवेश मिळणार नाही.

अशी आहे राज्य सरकारची नवी नियमावली?

>>सर्व सिनेमागृह, हॉटेल, रेस्टॉरंट हे 50 टक्क्यांच्या क्षमतेनं खुली असतील. >>मास्क घातलेले नसल्यास सिनेमागृह, हॉटेल, रेस्टॉरंट प्रवेश मिळणार नाही. >>तापमान यंत्रणानं तपासणी केल्यानंतर कोणाला ताप असलेलं आढळल्यास त्यांना प्रवेश देण्यात येणार नाही. >>प्रत्येक ठिकाणी हँड सॅनिटायझर ठेवणे आवश्यक आहे. >>सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना बंदी कायम >>जर एखाद्यानं या नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधितांकडून दंडही वसूल केला जाणार >>तसेच लग्न समारंभात 50 लोकांनाही परवानगी असेल. तसेच या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधातही कारवाई करण्यात येणार >>अंत्यविधीसाठी 20 जणांनाच परवानगी असेल. तसेच तिथल्या स्थानिक प्रशासनानं याची खातरजमा करावी, जास्त लोक आढळल्यास कारवाई होणार >> होम क्वारंटाईन व्यक्तींवर शासनाचा कोरोना स्टॅम्प असणं आवश्यक

संबंधित बातम्या :

Aurangabad Lockdown : औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, शहरातील हॉटेल्स बुधवारपासून बंद!

Mumbai Pune Corona Report : मुंबई, पुण्यात रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ, लॉकडाऊन नको असेल तर काळजी घ्या!

PM Narendra Modi convened a meeting of all CM on the backdrop of corona

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.