पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोबाईल नंबर, ई-मेल माहीत आहे का? निवडणूक प्रतिज्ञापत्रात केला उल्लेख

What Is PM Modi Mobile Number: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी रुद्राक्ष कन्वेंशन सेंटरमध्ये पोहचले. त्यांनी कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र दिला. तसेच प्रत्येक बुथवर मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा 370 मतदान जास्त करण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोबाईल नंबर, ई-मेल माहीत आहे का? निवडणूक प्रतिज्ञापत्रात केला उल्लेख
pm narendra modiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 11:22 AM

गूगल सर्चमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल शोधला जातो. आता नरेंद्र मोदी यांनी स्वत: त्यांचा नंबर आणि ई-मेल दिला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. पंतप्रधानांनी सलग तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. या निवडणूक अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात नरेंद्र मोदी यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक आणि ई-मेल शेअर केला आहे. तसेच त्यात संपत्तीचा उल्लेख केला आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, मोदी यांच्या संपत्तीत 2014 ते 2019 च्या दरम्यान 52 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिज्ञापत्रात मोबाईल क्रमांक 89XXXXXX24 दिला आहे. तसेच त्यांचा ई मेल आयडी narendramodi@narendramodi.in दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याकडे तीन कोटी रुपयांची जमा राशी आहे. त्यात जवळपास 53,000 रुपये रोकड आहे. तसेच गेल्या पाच वर्षांत त्यांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. 2018-19 मध्ये त्यांचे उत्पन्न 11 लाख रुपये होते. ते 2022-23 मध्ये 23.5 लाख रुपये झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर एकही घर नाही किंवा त्यांच्या स्वत:ची कारसुद्धा नाही. त्यांच्याजवळ 4 सोन्याच्या अंगठ्या आहेत. त्यांची किंमत 2 लाख रुपये इतकी आहे.

पंतप्रधानांनी दिला 370 चा मंत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी रुद्राक्ष कन्वेंशन सेंटरमध्ये पोहचले. त्यांनी कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र दिला. तसेच प्रत्येक बुथवर मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा 370 मतदान जास्त करण्याचे आवाहन केले. काश्मीरमधून कलम 370 हटवल्यामुळे प्रत्येक बुथवर 370 मतदान जास्त होईल, असे प्रयत्न करण्याचे मोदी यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

काशीतील लोकांचे मानले आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदार संघातील (काशी) लोकांचे आभार मानले आहे. आपल्या कार्यकाळात झालेल्या योजनांची माहिती त्यांनी दिली. तसेच तिसऱ्या कार्यकाळात काशीमधील लोकांच्या विकासासाठी अथक प्रयत्न सुरु ठेवणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्ज भरला त्यावेळी त्यांच्यासोबत गृहमंत्री अमित शाह आणि एनडीए सरकार असलेले राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित होते.

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.