मुस्लिम राष्ट्रात 27 एकर परिसरात भव्य हिंदू मंदिर, पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्धघाटन
Narendra Modi Update | भारतातील अनेक कारागीरही अबुधाबीमध्ये मंदिरांच्या बांधकामात गुंतलेले आहेत. या मंदिराची उंची 108 फूट आहे. यामध्ये 40 हजार घनमीटर संगमरवरी आणि 180 हजार घनमीटर वाळूचा खडक वापरण्यात आला आहे. त्याच्या बांधकामासाठी सुमारे 700 कोटी रुपये खर्च केले जात आहेत.
नवी दिल्ली, दि.1 4 फेब्रुवारी 2024 | अयोध्येत भव्य दिव्य राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. त्यानंतर आता मुस्लिम राष्ट्र असलेल्या संयुक्त अरब अमीरात (UAE) मध्ये भव्य मंदिर उभे राहिले आहे. 27 एकर परिसरात उभारण्यात आलेले हे मंदिर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारी 2024 रोजी या मंदिराचे उद्धघाटन करणार आहेत. यावेळी त्यांनी भव्य सभाही होणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी भारतीय अधिकारी कामाला लागले आहेत. बीएपीएस स्वामीनारायण संस्थानकडून हे मंदिर उभारण्यात आले आहे.
BAPS स्वामीनारायण संस्थेने उभारले मंदिर
पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 फेब्रुवारी रोजी अबू धाबीमधील शेख जायद स्टेडियममध्ये भारतीय जनसमुदायासाठी सभा घेणार आहेत. त्यानंतर 14 फेब्रुवारी रोजी UAE ची राजधानी दुबईत BAPS स्वामीनारायण संस्थानकडून उभारण्यात आलेल्या मंदिराचे उद्धघाटन करणार आहे. यासंदर्भात BAPS स्वामीनारायण संस्थेकडून प्रेस रिलीज दिले गेले आहे. त्यात म्हटले आहे की, “धार्मिक परिसराच्या निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे. परम पावन महंत स्वामी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारी 2024 रोजी मंदिराचे उद्घाटन करणार आहे. परंतु पंतप्रधानांच्या युएईमधील कार्यक्रमाची अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
असे असणार मंदिर
2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचा पायभारणी समारंभ झाला होता. 27 एकरमध्ये पसरलेल्या हे मंदिर ‘वैश्विक सद्भाव’ म्हणून ओळखले जाणार आहे. 2015 मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी अबू धाबी दौऱ्यावर आले होते, त्यावेळी मंदिरास जमीन देण्याचे आश्वासन युएई सरकारने दिले होते. आता 27 एकर जमिनीवर गुलाबी बलुआ दगड आणि सफेद संगमरमरचा वापर करुन मंदिर उभारले गेले आहे. 55,000 वर्ग मीटरमध्ये हे मंदिर झाले आहे.
वैदिक वास्तुकलेचा वापर
पश्चिम आशियातील हे सर्वात मोठे हिंदू मंदिर बांधण्यात आले आहे. त्यासाठी वैदिक वास्तुकलेचा वापर करण्यात आला आहे. मंदिरासाठी कोरीव काम आणि शिल्पेही भारतातच बनवली गेली आहेत. तसेच भारतातील अनेक कारागीरही अबुधाबीमध्ये मंदिरांच्या बांधकामात गुंतलेले आहेत. या मंदिराची उंची 108 फूट आहे. यामध्ये 40 हजार घनमीटर संगमरवरी आणि 180 हजार घनमीटर वाळूचा खडक वापरण्यात आला आहे. त्याच्या बांधकामासाठी सुमारे 700 कोटी रुपये खर्च केले जात आहेत.