युक्रेनमध्ये ठार झालेल्या नवीनच्या कुटुंबीयांचं मोदींकडून सांत्वन; पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक

युक्रेनच्या खारक्यीवमध्ये रशिया आणि युक्रेनदरम्यान झालेल्या गोळीबारात शेखरप्पा ग्यानगौडा नवीन या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. परराष्ट्र मंत्रालयानेच याबाबतची माहिती दिली आहे.

युक्रेनमध्ये ठार झालेल्या नवीनच्या कुटुंबीयांचं मोदींकडून सांत्वन; पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक
युक्रेनमध्ये ठार झालेल्या नवीनच्या कुटुंबीयांचं मोदींकडून सांत्वन
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 6:39 PM

नवी दिल्ली: युक्रेनच्या खारक्यीवमध्ये रशिया आणि युक्रेनदरम्यान (Russia Ukraine war) झालेल्या गोळीबारात शेखरप्पा ग्यानगौडा नवीन (Naveen Shekharappa)  या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू (Indian Student Death) झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. परराष्ट्र मंत्रालयानेच याबाबतची माहिती दिली आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन याच्या कुटुंबीयांना फोन करून त्यांचं सांत्वन केलं. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी नवीनचा मृतदेह लवकरात लवकर भारतात आणणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकार अलर्ट झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. काही वेळातच या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीला सर्व वरिष्ठ मंत्री आणि संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नवीन हा कर्नाटकाचा रहिवासी आहे. तो एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाला आहे. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी तो युक्रेनला आला होता. त्याचे वडील शेखर गौडा यांच्या सांगण्यानुसार, नवीनने वडिलांसोबत सकाळी फोनवर चर्चा केली होती. रोज दिवसातून दोन ते तीन वेळा वडिलांशी फोनवरून बोलायचा. त्याप्रमाणे आज सकाळीही त्याने वडिलांशी संवाद साधला. पण दुपारी त्याच्या मृत्यूचीच बातमी आली.

किराणा आणायला गेला अन्

खारक्यीवच्या बंकर्समध्ये इतर विद्यार्थ्यांसोबत तो आश्रयाला होता. पण किराणा सामान संपले म्हणून तो किराणा आणण्यासाठी बाहेर पडला आणि त्याचा रशियन फौजांच्या गोळीचा बळी पडला.

पार्थिव आणणार

या घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नवीनच्या वडिलांशी फोनवरून संवाद साधला. त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केली. तसेच या दु:खाच्या प्रसंगी आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं सांगत धीरही दिला. हा फार मोठा आघात आहे. ईश्वर नवीनला शाश्वत शांती प्रदान करो. त्यांच्या कुटुंबीयांना दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो. नवीनचं पार्थिव भारतात आणण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न केला जाईल. परराष्ट्र मंत्रालायच्या अधिकाऱ्यांशी आमची चर्चा सुरू आहे, असं बोम्मई यांनी सांगितलं.

मोदींची उच्चस्तरीय बैठक

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीनच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचं सांत्वन केलं. तसेच मोदींनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. काही वेळातच या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीला सर्व वरिष्ठ मंत्री आणि संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

संबंधित बातम्या:

Big Breaking : युक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

युक्रेनमधून भारतात आलेले विद्यार्थी भावनिक, अनेकांच्या डोळ्यात पाणी; व्हायरल फोटो तुम्ही पाहिले का ?

भारतीयांना तात्काळ युक्रेन सोडण्याचं फर्मान, रशिया युक्रेनमधील युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.