AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्णयाची शक्यता

देशात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढत आहे. पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेद्र मोदी (PM Modi) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी (CM) संवाद साधणार आहेत.

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्णयाची शक्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 9:26 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढत आहे. पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेद्र मोदी (PM Modi) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी (CM) संवाद साधणार आहेत. याबाबत उच्चपदस्थ अधिकारी सुत्रांकडून माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी बारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सवांद साधणार आहेत. देशात वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होणार आहे. हळूहळू पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढत असून, मंगळवारी एका दिवसात देशात 2,483 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा हा 4,30,62,569 वर पोहोचला असून, सध्या स्थितीत देशात 15,636 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत आज होणाऱ्या व्हीसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रविवारी झालेल्या मन की बातमध्ये मोदींनी जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले होते.

मृत्यूचा आकडा वाढला

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने मंगळवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 2,483 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील थोडे वाढले आहे. केरळमध्ये कोरोनामुळे 47 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर पंजाबमध्ये चार आणि दिल्लीमध्ये एक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे एकूण 5,23,622 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आजच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. या व्हीसीमध्ये कोरोना संदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच कोरोना रुग्णांची वाढती संख्या पहाता पुन्हा एकदा मास्कची सक्ती होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी मन की बातमधून देशातील जनतेशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. तसेच कोरोनाला आळा घालण्यासाठी आवश्यक त्या सर्व कोरोना नियमाचे पालन करावे असे देखील म्हटले होते.