वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांचा अहवाल पाठवा, थेट पीएमओकडून आदेश
पूजा खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी यूपीएससीकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले. त्या कोट्यातून त्यांना नोकरी मिळाली. परंतु वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेताना अपंगत्व प्रमाणपत्र दिले नाही. मग यूपीएससी परीक्षा देतानाच त्यांना अपंगत्व आला होते का? असा प्रश्न आहे.
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांचे कारनामे दिल्लीपर्यंत पोहचले आहेत. प्रक्षिणार्थी असताना गाडी, कॅबिन, गाडीवर अंबर दिवा, अधिकाऱ्यांना धमकवणे असे प्रकार पूजा खेडकर यांनी केले होते. त्यांचे हे सर्व प्रकार गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. त्यानंतर यूपीएससी परीक्षेत मुलाखतीत महाराष्ट्रासंदर्भातील प्रश्नांची उत्तरे आली नव्हती. तसेच या परीक्षेसाठी दिलेले दिव्यांग प्रमाणपत्र आणि उत्पन्न जास्त असताना घेतलेले क्रिमिलेअर प्रमाणपत्र या सर्व प्रकाराची माहिती माध्यमांमधून समोर येत आहे. यामुळे या प्रकरणाची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे. या प्रकरणात अहवाल पाठवण्याचे आदेश पीएमओने दिले आहे.
पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवला अहवाल
प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्या सर्व प्रकरणाची दखल थेट पीएमओ कार्यालयाने घेतली. पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल पाठवा, असे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पंतप्रधान कार्यालयाने दिला आहे. थेट पीएमओ कार्यालयाने अहवाल मागवल्याने आता पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. पूजा खेडकर यांचे दिव्यंग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासले जाण्याची शक्यता आहे.
एमबीबीएससाठी ओबीसी कोट्यातून प्रवेश
पूजा खेडकर यांनी पुण्यातील काशिबाई नवले मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतली आहे. त्यासाठी सन २००७ मध्ये त्यांनी ओबीसी भटक्या जमाती ३ या कोट्यातून प्रवेश घेतला. विशेष म्हणजे वडील आयएएस अधिकारी असताना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र या प्रवेशासाठी त्यांनी जोडले. त्यावेळी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी उत्पन्न मर्यादा साडेचार लाख होती.
अशी ही कमाल
पूजा खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी यूपीएससीकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले. त्या कोट्यातून त्यांना नोकरी मिळाली. परंतु वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेताना अपंगत्व प्रमाणपत्र दिले नाही. मग यूपीएससी परीक्षा देतानाच त्यांना अपंगत्व आला होते का? असा प्रश्न आहे.
पूजा खेडकर यांनी खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासनचा बोर्ड लावला. तसेच त्या गाडीला अंबर दिवा लावला. यासह विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयएएस पूजा खेडकर यांच्या कारवर 27 हजार 400 रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. तो दंड त्यांनी आता भरला आहे.