Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी यांनी मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी वायनाडमध्ये त्यांच्या पहिल्याच निवडणुकीत बंपर विजय मिळवून भाऊ राहुल गांधी यांचा विक्रम मोडला आहे. प्रियांका गांधी 4 लाखांहून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत.

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी यांनी मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 9:27 PM

वायनाड पोटनिवडणुकीचा निकाला ही जाहीर झाला आहे. प्रियंका गांधी यांनी सुमारे 4 लाख मतांची आघाडी घेऊन प्रियंका गांधी यांनी त्यांचे भाऊ राहुल गांधी यांच्या विजयाच्या फरकाला मागे टाकले आहे. राहुल गांधी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 3,64,422 मतांनी विजय मिळवला होता. राहुल गांधी यांनी 6,47,445 मते मिळवून मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी भाऊ राहुल गांधी यांच्यापेक्षा जास्त मते मिळवली आहेत. केरळमधील वायनाड पोटनिवडणूक त्यांनी ४ लाखांहून अधिक मतांनी जिंकलीये. प्रियंका गांधी यांनी या विजयाबद्दल वायनाडच्या जनतेचे आभार मानले.

प्रियंका गांधी यांनी X वर प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. मी खात्री करून घेईन की कालांतराने, तुम्हाला हा विजय खरोखरच तुमचा विजय वाटेल आणि तुम्ही ज्या व्यक्तीला तुमचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले आहे ती तुमच्या आशा आणि स्वप्ने समजून घेऊन तुमच्यासाठी लढेल. संसदेत तुमचा आवाज होण्यासाठी मी उत्सुक आहे.

राहुल गांधी यांनी रायबरेलीची जागा निवडल्याने वायनाडची जागा रिक्त झाली होती. यानंतर प्रियांका गांधी वाड्रा यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.  9.52 लाख मतांपैकी प्रियंका गांधी यांना सुमारे सहा लाख मते मिळतील, असा अंदाज स्थानिक काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला होता.

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, ‘आमच्या नेत्या प्रियंका गांधीजींना वायनाड पोटनिवडणुकीत लवकर आघाडी मिळणे हा मतमोजणीच्या दिवशी आश्चर्यकारक पहिला ट्रेंड आहे. वायनाडचे लोक आज निश्चितच मोठ्या फरकाने विजय मिळवणार आहेत आणि प्रियांका जी दणदणीत विजयासह संसदेत पदार्पण करतील.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.